कृति सेनॉनच्या फिटनेसचे ‘हे’ आहे सीक्रेट, जाणून घ्या तिचं वर्कआउट प्लान

Spread the love

बॉलिवूड अभिनेत्री कृति सेनॉन (Kriti Sanon Fitness) सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह असते. आपल्या स्टायलिश लुकमधील फोटोंव्यतिरिक्त कृति आपल्या चाहत्यांसोबत वर्कआउट (Workout Tips) करतानाचेही फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. कृतिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये ती पाच वेगवेगळ्या प्रकारचे एक्सरसाइज करताना दिसत आहे. या पोस्टमध्ये कृति वेट लिफ्टिंगपासून ते स्ट्रेचिंग व रेजिस्टेंस बँडच्या मदतीने एक्सरसाइज करतेय.
(भुजंगासनाची पारंपरिक पद्धत माहीत आहे? हे ६ लाभही जाणून घ्या)

फिटनेस फ्रीक असणाऱ्या कृति सेनॉनच्या (Kriti Sanon Fitness Secret) सोशल मीडिया अकाउंटवर तुम्हाला अनेक प्रकारचे एक्सरसाइज व्हिडीओ पाहायला मिळतील. दरम्यान शरीर फिट राहण्यासाठी व्यायामासोबत पौष्टिक आहाराचेही सेवन करणं आवश्यक आहे.
(Health Care Tips मधुमेहींनी उत्सवांमध्ये केवळ मिठाईच नव्हे तर ‘या’ गोष्टींपासूनही राहावे दूर)

​लिफ्टिंग- स्ट्रेचिंग एक्सरसाइज

‘मंडे मोटिव्हेशनची आवश्यकता नाही’, असे कॅप्शन कृतिने इन्स्टाग्रावर पोस्ट केलेल्या व्हिडीओसाठी लिहिलं होते. कृति वेट लिफ्टिंगपासून ते स्ट्रेचिंगपर्यंत असे वेगवेगळ्या एक्सरसाइज नियमित करते. दरम्यान स्वत:ला फिट ठेवण्यासाठी आपण आपल्या शरीरानुसार व्यायाम करणं आवश्यक आहे.

(अक्षय-ट्विंकलच्या घराला दिलेली डिंपल यांची पहिली भेट ‘या’ पदार्थामुळे चांगलीच राहिली आठवणीत)

महत्त्वाचे म्हणजे व्यायाम करण्यापूर्वी ट्रेनरकडून सल्ला घेणे आवश्यक आहे. शारीरिक दुखापती टाळण्यासाठी जिम ट्रेनरच्या मार्गदर्शनानुसारच एक्सरसाइज करावेत. नियमित व्यायाम केल्याने आपले शारीरिक तसंच मानसिक आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते.

(सब्जाचे सेवन करण्याची योग्य वेळ आणि पद्धत, जाणून घ्या सविस्तर माहिती)

फिटनेस फ्रीक कृति

​योगासने

कृतिने आसनांचा (Yoga Benefits For Health) सराव करतानाचा फोटो पोस्ट केला होता. ‘आपण आपल्या शरीराची काळजी घेतल्यास, शरीर तुमची काळजी घेईल’, असे कॅप्शन तिनं या फोटोसाठी दिलं होतं. या फोटोमध्ये कृति आसनांचा सराव करण्यापूर्वी ध्यानधारणा करताना दिसत आहे. कृति आपल्या चाहत्यांनाही फिटनेसची काळजी घेण्याचा सल्ला देत असते. या पोस्टमध्ये तिनं लिहिलंय की, ‘फिरायला जा, योग करा, वर्कआउट करा, नृत्य करा, कार्डिओ एक्सरसाइज किंवा आपल्या आवडीनुसार कोणतेही व्यायाम करा परंतु आपल्या शरीराची काळजी घ्या’

(हिवाळ्यात आरोग्य निरोगी राहण्यासाठी कशा पद्धतीने घ्यावी स्वतःची काळजी, जाणून घ्या माहिती)

​कृतिचा फिटनेस मंत्र

कृति सेनॉनचा आवडता वर्कआउट प्रकार म्हणजे Pilates. शरीर फिट ठेवण्यासाठी तुम्ही देखील तुमच्या आवडीचे वर्कआउट एक्सरसाइज करू शकता. ज्यामुळे फिट राहण्यास तुम्हाला मदत मिळू शकते. काही जणांना एरोबिक्स करणं पसंत असते तर काही जणांना डान्स किंवा योगासने, धावणे इत्यादी व्यायाम प्रकार आवडतात.

(चालण्याचा व्यायाम कोणत्या वेळेस करणं आरोग्यास असते अधिक फायदेशीर? जाणून घ्या)

एक्सरसाइजचे भरपूर प्रकार आहेत, पण ते करण्यापूर्वी ट्रेनरचा सल्ला घेणे आवश्यक आहे. तुमच्या शरीराच्या आवश्यकतेनुसारच ट्रेनर तुम्हाला काही व्यायाम प्रकार करण्याचा सल्ला देतात.

(निक्की तांबोळीच्या फिटनेसचे सीक्रेट आहेत ‘हे’ वर्कआउट, पाहा एक्सरसाइजचे व्हिडीओ)

कृतिचा आवडता एक्सरसाइज प्रकार

​नियमित करावा व्यायाम

शरीर फिट ठेवण्यासाठी जिममध्ये जाणं गरजेचं नाही. फिटनेससाठी आवड आणि सवड असणं आवश्यक आहे. ट्रेनरकडून व्यायामांची माहिती घेऊन तुम्ही घरच्या घरीही सोप्या व्यायाम प्रकारांचा सराव करू शकता. नियमित व्यायाम केल्याने आपल्याला शारीरिक तसंच मानसिक लाभ मिळतात. शरीरातील आळस दूर होण्यास मदत मिळते. दिवसभर शरीरामध्ये ऊर्जा टिकून राहते. तसंच शरीरामध्ये सकारात्मक बदलही अनुभवायला मिळतात.

(डोळ्यांचे आरोग्य ते रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यापर्यंत, जाणून घ्या पालकच्या सेवनामुळे मिळणारे लाभ)

NOTE डाएटप्रमाणेच दुसऱ्या व्यक्तींचे वर्कआउट प्लान फॉलो करण्याची चूक करू नये. एक्सरसाइज करण्यापूर्वी ट्रेनरचा सल्ला घ्यावा. शारीरिक दुखापती टाळण्यासाठी ट्रेनरच्या देखरेखी अंतर्गत व्यायाम करावेत.

कृति सेनॉन करतेय चक्रासनाचा सराव
Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *