केसगळती, दातदुखी व हाडांच्या दुखण्याने त्रस्त आहात? मग ‘हे’ पदार्थ करतील वेदनेतून सुटका!

Spread the love

आपल्या शरीराला विविध जीवनसत्त्वांची आवश्यकता असते. ही जीवनसत्त्वे शारीरिक कार्ये सुरळीत राखण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान देतात. त्यामुळे वेळोवेळी या जीवनसत्त्वांची शरीराला पूर्तता व्हायला हवी. पण सध्याच्या या धकाधकीच्या आयुष्यात पौष्टिक आणि जीवनसत्त्व युक्त आहार खाण्याकडे आपण कानाडोळा करत आहोत. त्यामुळे जेव्हा शरीरात या जीवनसत्त्वांची कमतरता भासते तेव्हा शरीराची कार्ये बिघडतात आणि विविध समस्या निर्माण होतात. त्यामुळे आपल्या शरीरातील जीवनसत्त्वांची गरज विविध पदार्थांच्या सेवनाने भरून काढणे ही आपली जबाबदारी आहे.

शरीरासाठी अत्यंत आवश्यक असणारे असेच एक जीवनसत्त्व म्हणजे जीवनसत्त्व ‘ड’ अर्थात व्हिटामीन डी (vitamin D) होय. जेव्हा शरीरात ‘ड’ जीवनसत्त्वाची कमतरता भासते तेव्हा शारीरिक थकवा आणि वेदना यांसारख्या समस्या डोके वर काढतात. पण जर तुम्ही योग्य पदार्थांचे सेवन केले तर शरीराची ‘ड’ जीवनसत्त्वाची गरज सहज भरून निघेल आणि तुम्हाला कोणत्या त्रासालाही सामोरे जावे लागणार नाही. आजच्या लेखातून आपण जाणून ‘ड’ जीवनसत्त्वाची पूर्तता करणाऱ्या खास पदार्थांबद्दल!

पुदीना

‘ड’ जीवनसत्त्वाचा सर्वाधिक अज्ञात स्त्रोत कोणता हा प्रश्न तुम्हाला कधी पडला असेल तर त्याचे उत्तर आहे पुदिना! हो मंडळी पुदिना हा ‘ड’ जीवनसत्त्वाचा एक चांगला स्त्रोत आहे पण कोणाला त्याबद्दल माहितीच नाही आहे. असाच अजून एक स्त्रोत मखाना सुद्धा आहे. मखानामध्येही ‘ड’ जीवनसत्त्व आढळते पण खास ‘ड’ जीवनसत्त्वासाठी कोणी मखानाचे सेवन करत नाही. पुदिना मध्ये इतर स्त्रोतांपेक्षा जरी कमी प्रमाणात ‘ड’ जीवनसत्त्व आढळत असले तरी त्याच्या सेवनाने शरीराची ‘ड’ जीवनसत्त्वाची गरज बऱ्यापैकी भरून निघते हे देखील खरे आहे.

(वाचा :- दुधाचे आठवडाभर वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये करा सेवन, दिसतील आश्चर्यकारक फायदे!)

मशरूम

जर तुम्ही शाकाहारी असाल आणि भाज्यांमधील ‘ड’ जीवनसत्त्वाचा एखादा वेगळा स्त्रोत शोधत असाल तर तुमच्यासाठी मशरूम एक उत्तम पर्याय ठरू शकतो. जर तुम्ही दुधापासून तयार होणारे पदार्थ जसे की दही, ताक, तूप, पनीर इत्यादींचे सेवन करता तर आपल्या आहारात मशरूमचा समावेश आवर्जून करा. तुम्हाला एका चांगल्या प्रमाणात ‘ड’ जीवनसत्त्व मिळत जाईल. तज्ज्ञ मंडळी सुद्धा आपल्या डायट प्लानमध्ये ‘ड’ जीवनसत्त्वाची कमतरता भरून काढण्यासाठी मशरूमची शिफारस आवर्जून करतात.

(वाचा :- उतारवयापर्यंत निरोगी व सुदृढ आरोग्य हवंय? मग बहुगुणी कडुलिंबाचा असा वापर करुन बघाच!)

फोर्टिफाइड ऑरेंज ज्यूस

फोर्टिफाइड ऑरेंज ज्यूस बद्दल तुम्हाला फार माहित नसेल पण टेन्शन नका घेऊन आम्ही आहोत न सगळं सांगायला. तर मंडळी फोर्टिफाइड ऑरेंज ज्यूस म्हणजे मार्केटमध्ये मिळणारा संत्र्याचा असा ज्यूस आहे जो तयार करताना त्यात खास ‘ड’ जीवनसत्त्वाची मात्रा टाकली जाते. ज्या लोकांना दूध आणि त्यापासून तयार होणारे पदार्थ आणि मशरूम वगैरे खायला आवडत नाही त्यांनी आवर्जून ‘ड’ जीवनसत्वाच्या पूर्ततेसाठी फोर्टिफाइड ऑरेंज ज्यूसचे सेवन करावे.

(वाचा :- विडाल टेस्ट कोणत्या आजारासाठी व कशी केली जाते?)

अंडी

जर तुम्हाला अंडी खायला आवडत असतील तर मंडळी तुमचा प्रश्नच मिटला कारण जाणकारांनी सुद्धा अंड्याला ‘ड’ जीवनसत्वाचा एक उत्तम स्त्रोत म्हणून घोषित क्ले आहे. ज्यांना ना भाज्या खायला आवडत, ना ज्यांना चिकन मटण खायला आवडत त्यांच्यासाठी अंडी म्हणजे ‘ड’ जीवनसत्वाचा एक उत्तम स्त्रोत आहे. त्यामुळे आता वार कोणताही असो जर तुम्हाला शरीरातील ‘ड’ जीवनसत्वाची गरज भरून काढायची असेल तर आवर्जून रोज अंडी खा.

(वाचा :- लघुशंकेवेळी होणा-या जळजळ-वेदनांची कारणे आणि रामबाण घरगुती उपचार!)

ब्रेकफास्ट सिरेल

ब्रेकफास्ट सिरेल म्हणजे काय या प्रश्नाचे एका वाक्यात उत्तर म्हणजे सकाळी नाश्ता करताना खाल्ला जाणारा धान्यरुपी ब्रेकफास्ट होय. हा सुद्धा ‘ड’ जीवनसत्वाचा एक उत्तम स्त्रोत असून आधुनिक ब्रेकफास्टच्या यादीत या पदार्थाला फार वरचे स्थान आहे. आपल्या भारतात सुद्धा ज्यांना याबद्दल माहिती आहे ते आवर्जून दरोरोज हा पौष्टिक ब्रेकफास्ट करतात. दुध वा अन्य कोणत्या आवडत्या व्हरायटी सोबत तुम्ही याचा आस्वाद घेऊ शकता. मुख्य म्हणजे लहान मुले सुद्धा चवीने हा ब्रेकफास्ट खातात. त्यामुळे जर त्यांच्या शरीरातील ‘ड’ जीवनसत्वाची कमतरता भरून काढायची असेल तर ब्रेकफास्ट सिरेल एक चांगला पर्याय आहे. तर मंडळी अशाप्रकारे यापैकी तुम्हाला आवडलेला स्त्रोत निवडा आणि आजपासूनच ‘ड’ जीवनसत्वाची कमतरता भरून काढण्याच्या कामाला लागा व सुदृढ राहा.

(वाचा :- मृत्युनंतर कोणत्या अवयवात किती तास जीव असतो?)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *