केसगळती रोखण्यासाठी व केसांच्या वाढीसाठी रामबाण आहे ‘हे’ आयुर्वेदिक तेल

Spread the love

​केसांसाठी भृंगराज तेल

भृंगराज ही एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. भृंगराज तेलाचा प्राचीन काळापासून केसांसाठी वापर केला जात आहे. हे तेल केसांच्या आरोग्यासाठी वरदान आहे. या तेलाच्या वापरामुळे टाळूच्या भागातील रक्त प्रवाह वाढण्यास मदत मिळते. ज्यामुळे केसांची योग्य पद्धतीने वाढ होते. तुम्ही घरच्या घरी देखील सहजरित्या भृंगराज तेल तयार करू शकता.

(Natural Hair Care Tips पांढरे झालेले केस पुन्हा काळे होऊ शकतात का? जाणून घ्या माहिती)

​भृंगराज तेल तयार करण्याची विधि

सामग्री:

  • नारळाचे तेल : एक कप
  • भृंगराज पावडर : एक चमचा
  • मेथी दाणे : एक चमचा

(Natural Hair Care या सहा चुकीच्या सवयींमुळे पुरुषांचे केस होतात पातळ, वेळीच द्या लक्ष)

विधी : भांड्यामध्ये एक कप नारळाचे तेल गरम करत ठेवा. तेलामध्ये मूठभर बारीक कापलेली भृंगराजची पाने किंवा एक मोठा चमचा भृंगराज पावडर मिक्स करा. यानंतर तेलात एक चमचा मेथी दाणे टाका आणि मिश्रण जवळपास पाच मिनिटांसाठी गरम करा. तेल गरम झाल्यानंतर गॅस बंद करा आणि मिश्रण थंड होण्यास ठेवून द्या. तेल थंड झाल्यानंतर गाळून घ्या आणि एका बाटलीमध्ये भरा.

​भृंगराज तेलातील औषधी गुणधर्म

भृंगराज तेलातील औषधी गुणधर्मामुळे तुटणाऱ्या केसांची समस्या दूर होण्यास मदत मिळते. भृंगराजमधील नैसर्गिक गुण केसांचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी प्रभावी आहेत. या तेलातील पोषक घटक अधिक वाढवण्यासाठी त्यात एक मोठा चमचा शिकेकाई पावडर मिक्स करा. शिकेकाईतील गुणधर्म टाळूच्या त्वचेवरील अतिरिक्त सीबमचा स्त्राव नियंत्रणात आणण्याचे कार्य करतात. ज्यामुळे केसांची वाढ होण्यास मदत मिळते.

(पहिल्या प्रेग्नेंसीनंतर करीना केसगळतीमुळे होती त्रस्त, ऋजुता दिवेकरने तिला सांगितले हे उपाय)

​केसांना कसे लावायचे भृंगराज तेल

घरात तयार केलेले भृंगराज तेल अर्ध्या मिनिटासाठी गरम करा. यानंतर तेल टाळूवर लावा आणि हलक्या हाताने केसांचा मसाज करा. कमीत कमी २० मिनिटांसाठी केसांचा मसाज करावा. यानंतर तासाभरासाठी तेल केसांमध्ये राहू द्यावे. थोड्या वेळाने हर्बल शॅम्पूने केस स्वच्छ धुऊन घ्या. अशा प्रकारे आठवड्यातून दोनदा भृंगराज तेल लावून केसांचा मसाज करावा. यामुळे केस मजबूत आणि निरोगी राहण्यास मदत मिळेल. सोबत केसगळती तसंच केस तुटण्याच्या समस्येतूनही तुमची सुटका होईल. विशेष म्हणजे या तेलामुळे केसांवर कोणतेही दुष्परिणाम होत नाही.

(केसगळती रोखण्यासाठी करा हा रामबाण उपाय, महिन्याभरात केसांमध्ये दिसेल आश्चर्यकारक फरक)

कोंड्यामुळेही होते केसगळती

NOTE केसांशी संबंधित कोणतेही उपाय करण्यापूर्वी आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *