कोट्यधीश असलेल्या करीना कपूरच्या वॉडरोबमधील स्वस्त व मस्त कपड्यांचे कलेक्शन

Spread the love

​करीना कपूरचा पिवळ्या रंगाचा को-ऑर्ड सेट

करीना कपूर (Kareena Kapoor Fashion) सध्या प्रेग्नेंसी आणि फॅशनमुळे भरपूर चर्चेत आहे. या दिवसांतही तिचा सुपर स्टायलिश अवतार चाहत्यांना पाहायला मिळतो. ही अभिनेत्री स्टाइलसोबतच सध्या कम्फर्टेबल फॅशन कॅरी करणं अधिक पसंत करतेय.

(ख्रिसमस पार्टीसाठी हवाय हटके लुक? फॉलो करा आवडत्या सेलिब्रिटींच्या ‘या’ हेअर स्टाइल)

तिचे नवीन अवतारातील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोमध्ये बेबोने को-ऑर्ड सेट घातल्याचे आपण पाहू शकता. पिवळ्या रंगाच्या या ड्रेसमध्ये बेबो सुंदर दिसतेय.

(ग्लॅमरस नव्हे यावेळेस करीना कपूर क्युट अवतारात दिसली, मॅटर्निटी फॅशन पुन्हा चर्चेत)

​ब्लॉक प्रिंटमुळे आउटफिट दिसतंय सुंदर

या को-ऑर्ड सेटमध्ये लूज पॅटर्न शॉर्ट कुर्ता आणि स्ट्रेट कट पँटचा समावेश होता. कॉटन फॅब्रिकपासून तयार करण्यात आलेल्या या आउटफिटवर मस्टर्ड आणि हिरव्या रंगाचं फ्लोरल ब्लॉक प्रिंट आपण पाहू शकता. यामुळे ड्रेसला आकर्षक लुक मिळाला आहे.

(नववधूने फॉलो केला दीपिका पादुकोणचा वेडिंग लुक, सोशल मीडियावर होतंय कौतुक)

या आउटफिटवर बेबोने (Kareena Kapoor Style) सोनेरी रंगाचे फ्लॅट्स मॅच केले होते. सध्या करीना हेच फुटवेअर आपल्या बहुतांश आउटफिट्सवर मॅच करताना दिसतेय. मेसी बन, नो मेकअप लुक; करीनाचा असा साधा पण कम्फर्टेबल अवतार चाहत्यांना पाहायला मिळाला.

(करीना कपूरचा ड्रेस तर सारा अली खानचा कुर्ता, या अभिनेत्रींच्याही स्टाइलची नुसती चर्चा)

​बजेट फ्रेंडली आउटफिट

करीना कपूरने (Kareena Kapoor-Khan) हा पिवळ्या रंगाचा सुंदर को-ऑर्ड सेट ZARAमधून घेतला होता. ब्रँडच्या अधिकृत वेबसाइटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार, या ड्रेसची किंमत ३ हजार रूपये एवढी आहे. सध्या को-ऑर्ड सेट्स फॅशन ट्रेंडमध्येही आहे.

(Sara Ali Khan ७५ हजार रूपये तर कधी दीड लाख रूपये, सारा अली खान कपड्यांवर करते असा खर्च)

तुम्ही देखील आपल्या वॉर्डरोब कलेक्शनमध्ये या ड्रेसचा समावेश करू शकता. तुम्हाला ऑनलाइन स्टोअरमध्ये अशा पॅटर्नचे आउटफिट सहजरित्या मिळेल.

(करीना कपूरला ‘या’ ग्लॅमरस लुकवरून नेटकऱ्यांनी केलं होतं ट्रोल, म्हणाले…)

​यापूर्वीही परिधान केला होता बजेट फ्रेंडली को-ऑर्ड सेट

यापूर्वीही करीना कपूरचे ‘झारा’ या फॅशन ब्रँडच्याच इंडिगो सेटमधील फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळाले होते. या ड्रेसवरील प्रिंट आणि रंगाव्यतिरिक्त डिझाइन व कट अगदी सेम-टु-सेम पिवळ्या रंगाच्या को-ऑर्ड सेटशीच मिळतेजुळते होते. या ड्रेसवर करीनानं वेलवेट हील्स मॅच केले होते. ज्यामुळे तिला ग्लॅमरस लुक मिळाला होता.

(ऐश्वर्यापासून ते करीनापर्यंत; अभिनेत्रींच्या या ५ अतरंगी लुकवर चाहत्यांनी दर्शवली नापसंती)

करीना कपूरचा हा को-ऑर्ड सेट देखील बजेट फ्रेंडली होता. या ड्रेसची किंमत देखील ३ हजार रूपये एवढी होती. हा ड्रेस देखील ऑनलाइन स्टोअरमधून खरेदी केला जाऊ शकतो.

(करीना कपूरच्या स्टायलिश लुकवर भारी पडली सारा अली खानची ‘ही’ फॅशन)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *