कोट्यवधी रुपये कमावणाऱ्या अनन्या पांडेनं परिधान केले इतके स्वस्त कपडे, पाहा फोटो

Spread the love

​क्युट आणि स्टायलिश लुक

अभिनेत्री अनन्या पांडे काही दिवसांपूर्वी मुंबईतील अंधेरी परिसरात दिसली होती. यावेळेस तिचा क्युट आणि स्टायलिश लुक पॅपराजीने कॅमेऱ्यामध्ये कैद केला. या अभिनेत्रीनं पिवळ्या रंगाचे स्वेटशर्ट परिधान केलं होतं. शॉर्ट लेंथ, जूल नेकलाइन आणि फुल स्लीव्ह्ज असे या स्वेटशर्टचे डिझाइन होतं. या नियॉन पिवळ्या रंगाच्या स्वेटशर्टवर निळ्या रंगाने ‘ADORABLE’ हा शब्द लिहिण्यात आलाय. तर काळ्या रंगाच्या डेनिम शॉर्ट्सवर अनन्याने हे स्वेटशर्ट घातलं होतं.

(हिना खानच्या ‘या’ स्वस्त ड्रेससमोर फिका पडला जान्हवी कपूरचा ग्लॅमरस लुक)

​स्वेटशर्टची किंमत

स्टायलिश लुक मिळावा यासाठी अनन्याने स्नीकर्स, पांढऱ्या रंगाची पर्स आणि काळ्या रंगाचे मास्क घातलं होते. आता आपण स्वेटशर्टचं फॅशन आणि किंमत जाणून घेऊया. अनन्याचे हे आउटफिट ‘ONLY’ ब्रँडचं आहे. हे ब्रँड स्टायलिश स्ट्रीट स्टाइल कपड्यांसाठी प्रसिद्ध आहे. अधिकृत वेबसाइटवर नमूद करण्यात आलेल्या माहितीनुसार अनन्याच्या या स्वेटशर्टची किमत दोन हजार २९९ रुपये एवढी आहे. तुम्हाला हे स्वेटशर्ट आवडले आहे का? तुम्ही देखील आपल्या वॉर्डरोबमध्ये या नियॉन स्वेटशर्टचा समावेश करू शकता.

(सारा अली खानने परिधान केला होता ‘हा’ वजनदार लेहंगा, नेटकऱ्यांनी म्हटलं…)

​अनन्याला आवडतात बजेट फ्रेंडली कपडे

अनन्याच्या वॉर्डरोबमध्ये बजेट फ्रेंडली कपड्यांचे शानदार कलेक्शन आहे. आता या फोटोमधील अनन्याचे हे पिवळ्या रंगाचे स्वेटशर्ट पाहा. अभिनेत्रीचं हे क्युट स्वेटशर्ट ‘Lazy Oaf’ ब्रँडचे आहे.

(अनुष्का शर्मा ‘या’ क्लोदिंग ब्रँडची आहे मालकीण, स्वस्त किंमतीत मिळतात मस्त स्टायलिश कपडे)

मिळालेल्या माहितीनुसार, या स्वेटशर्टची किंमत अमेरिकेतील चलनानुसार ६५ डॉलर्स एवढी होती, म्हणजे भारतीय चलनानुसार या स्वेटशर्टची किंमत जवळपास ४ हजार ७०० रुपये एवढी होते. तुम्ही देखील हे आउटफिट ऑनलाइन स्टोअरमधून खरेदी करू शकता.

(दीपिका पादुकोणच्या स्टाइलवर भारी पडली २ मुलांची आई असलेल्या शिल्पा शेट्टीची ‘ही’ फॅशन)

​अनन्याला स्वेटशर्ट परिधान करणं आहे पसंत

अनन्या पांडेला स्वेटशर्ट लव्हर म्हटलं तर चुकीचे ठरणार नाही. या अभिनेत्रीचा डेनिम शॉर्ट्सपासून लेगिंग्स, जीन्स आणि स्वेटशर्ट ड्रेसमधील स्टायलिश अवतार देखील पाहायला मिळाला आहे. तिच्याकडे वेगवेगळ्या शेड्सपासून ते डिझाइनमधील स्वेटशर्टचं शानदार कलेक्शन आहे. तिला आतापर्यंत एकापेक्षा एक कमाल स्वेटशर्ट लुकमध्ये पाहिलं गेलंय.

(ऐश्वर्यापासून ते करीनापर्यंत; अभिनेत्रींच्या या ५ अतरंगी लुकवर चाहत्यांनी दर्शवली नापसंती)

तुम्ही देखील आपल्या वॉर्डरोबमध्ये सहजरित्या स्वेटशर्टचा समावेश करू शकता. ऑनलाइन स्टोअर किंवा एखाद्या स्टायलिश कपड्यांच्या दुकानामध्येही तुम्हाला हे आउटफिट सहजरित्या मिळेल. या पोषाखामुळे कोणालाही कूल आणि स्टायलिश लुक मिळू शकतो.

(वेट लॉसनंतर शहनाज गिलचं ‘स्टाइल’ टशन सुरूच, एकापेक्षा एक ग्लॅमरस फोटो करतेय शेअर)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *