कोणत्या महिलांना असतो प्रीमॅच्युअर डिलिव्हरीचा धोका व यावर उपाय काय?

Spread the love

गरोदरपणातील स्त्रीची सगळ्यात मोठी भीती म्हणजे तिला वाटत असते की आपली प्रीमॅच्युअर डिलिव्हरी (premature delivery) तर होणार नाही ना? प्रीमॅच्युअर डिलिव्हरी म्हणजे मुदतपूर्व डिलिव्हरी होय. सामान्यत: स्त्रीची डिलिव्हरी हि 9 महिन्यांमध्ये होते. मात्र अनेक स्त्रिया अशा असतात ज्यांची काही शारीरिक समस्यांमुळे डिलिव्हरी हि 9 महिन्यांआधीच होते. या स्थितीमध्ये बाळाची शारीरिक स्थिती गंभीर असण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणूनच कोणत्याही स्त्रीला प्रीमॅच्युअर डिलिव्हरीचा धोका वाटता असतो.

गुल पनाग (gul panag) या नावाजलेल्या अभिनेत्रीला सुद्धा प्रीमॅच्युअर डिलिव्हरीला सामोरे जावे लागले होते. मात्र तिने या स्थितीमध्ये धीर दाखवला आणि आपल्या मुलाला सांभाळले. आज आपण या लेखातून जाणून घेऊया की का स्त्रियांना प्रीमॅच्युअर डिलिव्हरीला सामोरे जावे लागते आणि अशा काय गोष्टी असतात ज्या करून स्त्रिया प्रीमॅच्युअर डिलिव्हरी रोखू शकतात.

प्रीमॅच्युअर डिलिव्हरी म्हणजे काय?

प्रीमॅच्युअर डिलिव्हरी हि गोष्ट गरोदरपणाशी संबधित असते. सामान्यत: गरोदर स्त्री ९ महिन्यांनंतर बाळाला जन्म देते, पण काही स्त्रिया या ९ महिन्यांआधी किंवा ३७ व्या आठवड्याआधीच बाळाला जन्म देतात. याच स्थितीला प्रीमॅच्युअर डिलिव्हरी (preterm labour) असे म्हणतात. डिलिव्हरी डेटच्या ३ आठवड्याआधी प्रसूती झाली तर त्याला सुद्धा प्रीमॅच्युअर डिलिव्हरी असेच म्हणतात. यात एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे ज्या महिलांना प्रीमॅच्युअर डिलिव्हरी होणार आहे त्याची लक्षणे आधीच दिसू लागतात आणि त्यामागे काही कारणे सुद्धा आहेत. चला ते सगळं सुद्धा जाणून घेऊया.

(वाचा :- प्रेग्नेंसीमध्ये ‘या’ हेल्दी व एनर्जी ड्रिंक्सनी करा शरीरातील पाण्याची कमतरता दूर!)

प्रीमॅच्युअर डिलिव्हरीची लक्षणे

जेव्हा डिलिव्हरी डेटच्या आधी स्त्रीच्या शरीरातली पिशवी फाटते तेव्हा ते सगळ्यात पहिलं आणि खात्रीशीर लक्षण असतं की त्या स्त्रीला प्रीमॅच्युअर लेबरचा धोका आहे. हे लक्षण दिसल्यास योनीतून मोठ्या प्रमाणावर पाणी निघू लागतं आणि अशावेळी स्त्रीला आपत्कालीन वैद्यकीय सहायतेची गरज भासू शकते. प्रीमॅच्युअर डिलिव्हरीच्या अन्य लक्षणामध्ये वजाइनल डिस्‍चार्ज जास्त होणे, वजाइनल डिस्‍चार्जच्या प्रकारात बदल दिसणे, पोट आणि पेल्विकच्या भागात दाबसदृश्य स्थिती वाटणे, वारंवार पोटात दुखू लागणे यांसारख्या लक्षणांचा समावेश आहे. या शिवाय कमरेत वेदना होणे, पोटाच्या खालच्या भागात दुखू लागणे यांसारख्या त्रासामुळे पोटात गॅस झाल्यासारखे सुद्धा वाटते. सोबतच ताप, मळमळ, उलटी यांसारखी लक्षणे दिसल्यास समजून जावे कि त्या गरोदर स्त्रीचे प्रीमॅच्युअर डिलिव्हरी होणार आहे.

(वाचा :- नॉर्मल डिलिव्हरी हवी असल्यास ९व्या महिन्यात जरुर खा ‘हे’ पदार्थ!)

प्रीमॅच्युअर डिलिव्हरीची कारणे

प्रीमॅच्युअर लेबरची अनेक कारणे सुद्धा आहेत ज्यामुळे गरोदर स्त्रीला या स्थितीला सामोरे जावे लागते. प्रसूतीच्या आधी केलेल्या काही गोष्टीच प्रीमॅच्युअर लेबरला कारणीभूत ठरत्ता. त्यापैकी काही प्रमुख कारणे आम्ही तुम्हाला सांगतो आहोत. पहिली प्रीमॅच्युअरडिलिव्हरी झाली असले तर पुन्हा हि स्थिती उद्भवू शकते. गर्भामध्ये जुळे किंवा त्यापेक्षा अर्भके असणे, पहिल्या मुलाच्या ६ ते ७ महिन्यांनंतर लगेच दुसरी गर्भधारणा होणे, धुम्रपान, मद्यपान आणि गायनेकोलोजिस्‍टच्या सल्ल्याशिवाय औषधे घेतल्याने सुद्धा प्रीमॅच्युअर डिलिव्हरी होऊ शकते. गरोदर स्त्रीचे वजन जास्त वाढणे देखील यामागचे महत्त्वपूर्ण कारण आहे. उच्च रक्त दाब आणि मधुमेहासारख्या समस्या सुद्धा प्रीमॅच्युअर लेबरला कारणीभूत ठरतात.

(वाचा :- प्रेग्नेंसीमध्ये का व कधी येते स्तनांवर खाज? जाणून घ्या यावरील उपाय!)

प्रीमॅच्युअर डिलिव्हरीवर उपचार

जेव्हा प्रीमॅच्युअर डिलिव्हरीची लक्षणे दिसतात तेव्हा लगेच गरोदर स्त्रीला हॉस्पिटलमध्ये मॉनिटरिंगसाठी दाखल करावे. ज्या प्रकरणात नॉर्मल डिलिव्हरी करण्यात समस्या असते, त्यावेळी सिजेरियन ऑपरेशन केलं जातं. जर प्रीमॅच्युअर डिलिव्हरीमुळे बाळाला नुकसान होण्याची शक्यता वाटली तर गरोदर स्त्रीला औषधे दिली जातात. प्रसुतीमध्ये उशीर होण्यासाठी गरोदर स्त्रीला टोकोलिटिक्‍स किंवा मॅग्‍नीशियम सल्‍फेट दिलं जातं. यामुळे प्रीमॅच्युअर डिलिव्हरी काही प्रमाणात पुढे ढकलली जाऊ शकते. मात्र हा उपाय प्रत्येक स्त्रीच्या शारीरिक स्थितीनुसार काम करतो.

(वाचा :- प्रेग्नेंसीमध्ये मांसाहाराची इच्छा नाही? मग जाणून घ्या शाकाहाराचे लाभ व ५ खास पदार्थ!)

प्रीमॅच्युअर डिलिव्हरी कशी रोखावी?

स्त्री स्वत: काही प्रमाणात काळजी घेऊन प्रीमॅच्युअर डिलिव्हरी रोखू शकते. जसे कि गरोदरपणाचा काळ सुरु झाला की कोणत्याही प्रकारचे संक्रमण होणार नाही याची सर्वप्रथम काळजी घ्यावी. अतिशय जास्त प्रमाणात स्वच्छता राखावी. सतत साबणाने हात धुवावेत. कमी शिजलेले मांस वा मच्छी अजिबातच खाऊ नये. सेक्स करताना कंडोमचा वापर आवर्जून करावा. शक्य तितका कमी ताण घ्यावा कारण प्रीमॅच्युअर डिलिव्हरी होणाऱ्या स्त्रियांमध्ये ताण तणावाचे प्रमाण सर्वाधिक आढळले आहे.

(वाचा :- प्रेग्नेंसीमध्ये फक्त ‘या’ पद्धतीनेच करा पनीरचं सेवन!)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *