कोबी आणि मटारची पौष्टिक भाजी, जाणून घ्या सोपी रेसिपी

Spread the love

How to make: कोबी आणि मटारची पौष्टिक भाजी, जाणून घ्या सोपी रेसिपी

Step 1: कोबी चिरून घ्या

कोबी बारीक चिरून घ्या आणि एका भांड्यात ठेवा.

Step 2: पॅनमध्ये कोबीसह अन्य सामग्री शिजवून घ्या

पॅनमध्ये तेल गरम करत ठेवा. तेल गरम झाल्यानंतर त्यात मोहरी टाका. यानंतर चिरलेली हिरवी मिरची आणि किसलेले आले देखील मिक्स करा. आता चिरलेला कोबी देखील मिक्स करा आणि चार ते पाच मिनिटांसाठी सर्व सामग्री शिजू द्यावी.

कोबी शिजवून घ्या

Step 3: भाजी चांगली शिजू द्या

यानंतर पॅनमध्ये मटार घालावेत आणि सर्व सामग्री ढवळत राहा. थोड्या वेळाने चवीनुसार मीठही त्यात टाका. आता कढईवर झाकण ठेवा. दोन मिनिटांसाठी भाजी शिजू द्यावी.

कोबीची भाजी

Step 4: टोमॅटोची पेस्ट मिक्स करा

आता त्यात टोमॅटोची पेस्ट मिक्स करा. सर्व सामग्री पाच ते सहा मिनिटांसाठी गॅसच्या मध्यम आचेवर चांगल्या पद्धतीने शिजवून घ्या.

टोमॅटो पेस्ट

Step 5: कोबी – मटारची खमंग भाजी

आता भाजीमध्ये हळद, लाल तिखट, धणे पावडर मिक्स करा. कढईवर पुन्हा झाकण ठेवा. झाकण काढा आणि कढईतील भाजी ढवळून घ्या. दोन मिनिटांनंतर गॅस बंद करावा. आपली कोबी मटारची स्वादिष्ट भाजी तयार झाली आहे.

कोबी मटार भाजी

Step 6: लज्जतदार भाजीच्या रेसिपीचा पाहा संपूर्ण व्हिडीओ

गार्निशिंगसाठी तुम्ही कोथिंबीरचा वापर करू शकता. पोळी किंवा रोटीसोबत या भाजीचा आपल्या कुटुंबीयांसोबत आस्वाद घ्या.

अशी बनवा कोबी आणि वाटाण्याची खमंग भाजी..!


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *