को-स्टारच्या पार्टीमध्ये दीपिका पादुकोणची हजेरी, स्टायलिश पारंपरिक ड्रेस केला होता परिधान

Spread the love

​पारंपरिक ड्रेसला मॉर्डन टच

काही दिवासांपूर्वी अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीच्या घरी पार्टीचे आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीमध्ये दीपिका पादुकोणने देखील हजेरी लावली होती. या पार्टीसाठी अभिनेत्रीने फेस्टिव्ह मूडनुसार पोषाखाची निवड केली. दीपिकाने पांढऱ्या रंगाचा सुंदर शरारा परिधान केला होता. फॅशन डिझाइनर रितिका मीरचंदानीच्या कलेक्शनमधून हा ड्रेस घेण्यात आला होता. या आउटफिटचे वैशिष्ट्य म्हणजे ड्रेसच्या डिझाइनमध्ये पारंपरिकतेसह मॉर्डन टच देखील देण्यात आला होता.

(करीना कपूरच्या स्टायलिश अवतारावर भारी पडला मीरा राजपूतचा मोहक लुक)

​शरारा विथ जॅकेट

शरारा आणि कुर्त्याऐवजी या स्टायलिश आउटफिटमध्ये शॉर्ट वाइट जॅकेट व फ्लेअर्ड ट्राउझरचा समावेश करण्यात आला आहे. सिंथेटिक बेस्ड शीअर मटेरिअलपासून हा ड्रेस तयार करण्यात आला होता. ज्यावर रेशीमच्या धाग्यांनी सुंदर एम्ब्रॉयडरी करण्यात आलीय. दीपिकाच्या जॅकेटवर पफ्ड शोल्डर डिझाइन आपण पाहू शकता. तसंच जॅकेटवर फॅब्रिकपासून तयार करण्यात आलेले बटण देखील जोडण्यात आले आहेत. या जॅकेटमध्ये फ्लेअर्ड डिझाइनचाही समावेश करण्यात आलाय.

(श्रीदेवींच्या लेकींची चर्चा! जान्हवी-खुशीने आपल्या स्टाइलने वेधून घेतले सर्वांचं लक्ष)

​Louis Vuitton ब्रँडची स्लिंग बॅग

louis-vuitton-

दीपिकाने या लुकसाठी आपली आवडती स्टाइल कॅरी केली होती. तिनं मेसी आणि लो बन हेअर स्टाइल केली होती. तसंच नॅचरल टोन मेकअप केला होता. आकर्षक लुक मिळावा यासाठी तिनं आपले शार्प फीचर्स हाइलाइट केले होते. ज्वेलरीमध्ये तिने केवळ स्टड ईअररिंग्सची निवड केली होती. याव्यतिरिक्त दीपिकाने Louis Vuitton कंपनीची क्रीम-गोल्डन रंगाची चेन असणारी स्लिंग बॅग कॅरी केली होती.

(भारतातील सर्वात श्रीमंत व्यावसायिकांच्या ग्लॅमरस पत्नी, ज्या आहेत जगभरात प्रसिद्ध)

​दीपिका दिसती होती जास्तच बारीक

या ड्रेसमुळे दीपिका पादुकोणला स्टायलिश लुक मिळाला होता. पण या आउटफिटमध्ये ती जरा जास्तच बारीक दिसत होती. दरम्यान फ्लेअर्ड आणि प्लीट्स डिझाइन ड्रेसमुळे बॉडी फॅट लपवण्यास मदत मिळते. पण जर एखादी व्यक्ती जास्तच बारीक असेल तर त्यांनी अशा कपड्यांची निवड करू नये. याऐवजी त्यांना डबल फ्लेअर डिझाइनच्या ड्रेसची निवड करावी. यामुळे तुम्हाला स्टायलिश लुक देखील मिळू शकतो.

(आलिया भटचा खास डिझाइनर लेहंगा, लहान मुलांनी तयार केलेल्या या आउटफिटवर आहेत ‘हे’ शब्द)

​अनन्याचा ग्लॅमरस लुक

दरम्यान या पार्टीमध्ये अनन्या पांडे देखील सहभागी झाली होती. तिचा लुक देखील सुपर स्टायलिश होता. कॅज्युअल आणि ग्लॅमरस स्टाइलसाठी या अभिनेत्रीने Saaksha Kinni ब्रँडच्या ए-सिमेट्रिकल डिझाइन असलेल्या ड्रेसची निवड केली होती.

(Stylish Bag वेस्ट बॅग्सचा ट्रेंड भन्नाट)

या लाल रंगाच्या ड्रेसमध्ये कॉर्सेट डिझाइन तुम्ही पाहू शकता. अनन्यानं यावर काळ्या रंगाचे स्ट्रॅप हील्स मॅच केले होते. अनन्याचा हा लुक परफेक्ट होता. अभिनेत्रीची ही स्टाइल कोणीही सहजरित्या फॉलो करू शकतो.

(Bridal Look ‘या’ नववधूने संगीत सोहळ्यासाठी फॉलो केली अनुष्का शर्माची स्टाइल, पाहा फोटो)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *