क्रीम-लोशनची गरज भासणार नाही, सतेज त्वचेसाठी जाणून घ्या आयुर्वेदिक ब्युटी टिप्‍स

Spread the love

आयुर्वेदातील औषधी वनस्पती, रोपे आणि अन्य नैसर्गिक घटकांचा उपयोग केवळ निरोगी आरोग्यासाठीच नव्हे तर सुंदर व नितळ त्वचेसाठी देखील केला जातो. प्राचीन भारतीय वैद्यकीय प्रणालीनुसार, तजेलदार त्वचा मिळवण्यासाठी नैसर्गिक सामग्रींपासून कित्येक आयुर्वेदिक पॅक तसंच मास्क आपण घरच्या घरी तयार करू शकता. यामुळे त्वचेशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत मिळते.

आयुर्वेदिक उपचारांमध्ये कित्येक प्रभावी उपाय आहेत, ज्यामुळे आपल्या त्वचेवर नैसर्गिक चमक येण्यास मदत मिळते. हानिकारक घटकांपासून त्वचेचं संरक्षण देखील होते. नैसर्गिक फेशिअल ऑइल, फेस पॅक, फेस मास्क, फेस स्क्रब आणि उटण्यामुळे आपल्या त्वचेला खोलवर पोषण तत्त्वांचा पुरवठा होतो. यामुळे त्वचेचा रंग उजळण्यास मदत मिळते. त्वचा निरोगी आणि नितळ दिसू लागते. विशेष म्हणजे स्वयंपाकघरात सहजरित्या आढळणाऱ्या सामग्रींपासूनही तुम्ही आयुर्वेदिक फेस पॅक तयार करू शकता. जाणून घेऊया सविस्तर माहिती…
(घरात राहूनही चेहरा टॅन झाल्यासारखा वाटतोय? जाणून घ्या दालचिनी फेस पॅकचा कसा करायचा वापर)

​चंदन

विशेष सुगंधी गुणधर्मामुळे कित्येक जण चंदनाचा वापर करतात. त्वचेसाठी आयुर्वेदिक रामबाण उपाय म्हणून देखील चंदनाचा उपयोग केला जातो. त्वचा दीर्घकाळासाठी मऊ आणि तरुण ठेवण्याचे कार्य चंदनमधील पोषण तत्त्व करतात. चंदन फेस पॅक तयार करण्यासाठी एका वाटीमध्ये दोन चमचे चंदन पावडर घ्या आणि त्यामध्ये गुलाब पाणी मिक्स करा. हा लेप आपल्या चेहऱ्यावर २० मिनिटांसाठी लावा आणि त्यानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुऊन घ्या.

(Hair Care मऊ आणि चमकदार केस हवे आहेत ? जाणून घ्या कसं फॉलो करायचं ग्लास हेअर ट्रेंड)

​हळदीचे फेस पॅक

एका वाटीमध्ये दोन चमचे तांदळाचे पीठ किंवा ग्राउंड ओट्स घ्या. यामध्ये एक चमचा हळद पावडर आणि तीन चमचे दूध मिक्स करा. पातळ पेस्ट तयार करून चेहऱ्यावर लावा. १० ते १५ मिनिटांसाठी लेप चेहऱ्यावर लावा आणि थोड्या वेळानं थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुऊन घ्यावा. पण चेहऱ्यावर अधिक प्रमाणात मुरुम असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

(Winter Hair Tips थंडीमध्ये केस होतात जास्त कोरडे? अशी सात प्रकारे घ्या योग्य काळजी)

​केशर आणि मधाचे फेस पॅक

केशर जगातील सर्वात महाग स्वरुपातील मसाला आहे. योग्य प्रमाणात याचा वापर केल्यास त्वचेला खोलवर पोषण तत्त्वांचा पुरवठा होतो आणि चेहऱ्यावरील डाग देखील दूर होतात. केशर फेस पॅकमुळे चेहऱ्यावर नैसर्गिक तेज येते. एका वाटीमध्ये केशर आणि मध एकत्र घ्या. पॅक तयार झाल्यानंतर चेहऱ्यावर लावा. १० ते १५ मिनिटानंतर चेहरा थंड पाण्याने धुऊन घ्या. या पॅकमुळे चेहरा तजेलदार होईल.

(Healthy Hair Oil: जाड केसांसाठी तयार करा हे घरगुती आयुर्वेदिक तेल, जाणून घ्या पद्धत)

सौंदर्यवर्धक केशर

​कुमकुमादी तेल

रात्री झोपण्यापूर्वी सीरम म्हणून चेहऱ्यावर कुमकुमादी तैलमचा वापर तुम्ही करू शकता. हे तेल १६ औषधी वनस्पतींपासून तयार केले जातं. तजेलदार त्वचेसाठी कुमकुमादी तेल अतिशय प्रभावी आहे. चेहऱ्यावर नैसर्गिक तेज हवा असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घेऊन या तेलाचा आपल्या स्किन केअर रुटीनमध्ये समावेश करू शकता.

(काळ्याशार व घनदाट केसांसाठी वापरा मोसंबीचा रस, जाणून घ्या शॅम्पू तयार करण्याची पद्धत)

​गुलाब पाणी

चेहरा धुतल्यानंतर त्वचेवर टोनर म्हणून गुलाब पाण्याचा वापर करावा. गुलाब पाण्यातील घटक पित्त संतुलित ठेवण्याचे कार्य करतात. यामुळे मूड प्रसन्न राहण्यास मदत मिळते. तसंच यातील पोषण तत्त्व त्वचेवरील धूळ, माती, दुर्गंध स्वच्छ करण्याचे कार्य करतात. एवढंच नव्हे तर तणाव देखील दूर होण्यास मदत मिळते.

(द्राक्षबियांच्या तेलाचे त्वचा आणि केसांसाठी फायदे, जाणून घ्या कसा करायचा वापर)

​हे देखील लक्षात ठेवा

  • पौष्टिक खाद्यपदार्थांचे सेवन करा
  • योग किंवा अन्य व्यायाम प्रकार करावेत
  • त्वचेवर सिंथेटिक उत्पादनांचा उपयोग करणं टाळा
  • स्किन केअर रूटीनचे काटेकोरपणे पालन करा

(Hair Mask For Winter हिवाळ्यात केस निरोगी ठेवण्यासाठी वापरा मधाचे ६ नैसर्गिक हेअर पॅक)

NOTE त्वचेशी संबंधित कोणतेही उपाय करण्यापूर्वी आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *