क्षयरोग आणि गर्भधारणा! गर्भनलिका व गर्भाशयावर होऊ शकतात हे दुष्परिणाम

Spread the love

हायलाइट्स:

  • डॉक्टरांना सांगितलेली प्रमुख लक्षणे
  • गर्भधारणेची असमर्थता
  • महिलांना थकवा येणे
  • मासिक पाळीतील अनियमितता

– डॉ. रिचा जगताप, वंध्यत्व निवारण तज्ज्ञ
येत्या २०२५ सालापर्यंत संपूर्ण देश क्षयरोगमुक्त करण्याचा प्रयत्न सरकारच्यावतीने केला जात आहे. याकरिता २०१७ ते २०२५ या कालावधीकरिता विशेष योजना आखण्यात आली असून त्यानुसार पावलं उचलली जात आहेत. पण जननेंद्रियासंबंधित क्षयरोगाचा मुकाबला करणं, त्याचं निदान करण्यात सरकारला अनेक आव्हानं पेलावी लागत आहेत. विविध चाचण्या करून संशोधन केलं असता जननेंद्रियामध्ये सुप्त अवस्थेत क्षयरोगाचे जंतू आढळून येतात. जननेंद्रियाचा क्षय (टीबी) मायक्रोबॅसिलस ट्युबरक्लुलोसिस नावाच्या जीवाणूमुळे होतो, ज्यामुळे वंध्यत्वासारखी समस्या उद्भवू शकतो. ज्या व्यक्तींमध्ये जननेंद्रियाच्या क्षयरोगाचं निदान होतं ते प्रामुख्याने प्रजननाच्या वयोगटातील असतात.

जननेंद्रियाच्या क्षयरोगाची लक्षणं
सामान्यत: अपंगत्वाची कोणतीही लक्षणं आढळत नाहीत. म्हणूनच जेव्हा एखाद्या महिलेनं गर्भधारणेची योजना आखण्याची इच्छा केली नाही तोपर्यंत प्रजनन अवयवांवर क्षयरोगाचा प्रभाव लक्षात येत नाही. जननेंद्रियाच्या क्षयरोगाचं मुख्य आणि सर्वात महत्त्वाचं लक्षण म्हणजे गर्भधारणेची असमर्थता. महिलांमध्ये वजन कमी होणं, थकवा येणं आणि संध्याकाळनंतर शरीराच्या तापमानात वाढ होणं. इतर लक्षणांमध्ये मासिक पाळीतील अनियमितता, अल्प प्रमाणात होणारा रक्तस्राव आणि ओटीपोटात वेदना यांचा समावेश असतो.

क्षयरोगाचा गर्भनलिकांवर होणारा परिणाम
टीबीच्या जंतुसंसर्गामुळे फेलोपाइन ट्यूबवर दुष्परिणाम झाल्यानं स्त्रीबीज फलित होऊन ट्युबमधून गर्भाशयापर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे त्या स्त्रीला गर्भधारणा राहण्यास अपयश येतं. त्याचप्रमाणे हे टीबीचे जंतू गर्भाशयाच्या अस्तरांचे देखील नुकसान करतात. त्यामुळे फलित झालेलं स्त्रीबीज गर्भाशयाच्या अस्तरावर रुजत नाही. सहाजिकच त्यामुळे गर्भधारणा होऊ शकत नाही. अंडाशयाला जंतुसंसर्ग झाल्यामुळे बीजांडांची गुणवत्ता कमी होते. त्याचप्रमाणे गर्भाशयाचे मुख, योनीमार्ग आणि बाह्य जनेनद्रियांना संसर्ग झाल्यामुळे देखील गर्भधारणा होण्याची शक्यता कमी होते.

गर्भाशयावर परिणाम
गर्भनलिकांवर झालेला जंतुसंसर्ग गर्भाशयातही पसरतो आणि त्याच्या पोकळीमध्ये असलेल्या स्तराला हानी पोहोचते. यामुळे कधी-कधी पाळीचे त्रास संभवतात.

लक्षणं कोणती?
वंध्यत्व- गर्भधारणा न होणं. ५० ते ६० टक्के स्त्रिया या कारणासाठी वैद्यकीय मदत घेतात. किंबहुना दुसरं कोणतंही लक्षण नसल्यामुळे मुलासाठी जेव्हा उपचार सुरू होतात तेव्हा या रोगाचं निदान अचानक होतं. जननेंद्रियाच्या क्षय रोगाचं निदान तपासणीद्वारे क्वचितच होतं. तथापि, अल्ट्रासाऊंड आणि हिस्टेरोसलॉपोग्राफीसारख्या प्रतिमेमुळे क्षयरोगाच्या निदानास महत्त्वपूर्ण बिंदू मिळतील. शिवाय, लेप्रोस्कोपी शोध आणि टिश्यू कल्चर ही क्षयरोगाचं निदान करण्यासाठी मानक पद्धती आहेत. वेळीच औषधोपचार केल्यास क्षयरोगावर मात करता येते. टीबीमुळे महिलांच्या प्रजनन क्षमतेवर परिमाण होतो. याकरिता गर्भधारणेपूर्वी प्रजनन तज्ज्ञांचा सल्ला घ्या.


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *