खारी शंकरपाळी, जाणून घ्या सोपी रेसिपी

Spread the love

How to make: खारी शंकरपाळी, जाणून घ्या सोपी रेसिपी

Step 1: मैद्यामध्ये ओवा मिक्स करा

मोठ्या बाउलमध्ये २०० ग्रॅम मैदा घ्या. यानंतर दीड चमचा ओवा घ्या आणि हातांनी कुस्करून मैदामध्ये मिक्स करा. पिठात चवीनुसार मीठ घाला आणि सर्व सामग्री नीट एकजीव करा.

Step 2: शंकरपाळ्यांचे पीठ मळून घ्या

यानंतर मिश्रणामध्ये थोडं-थोडं तेल मिक्स करा. पीठ आणि तेल चांगल्या पद्धतीने एकजीव करा. पिठामध्ये गाठी तयार होणार नाहीत, याची काळजी घ्यावी.

Make the dough tight

Step 3: पीठ मळल्यानंतर कापडाने झाकून ठेवा

यानंतर मैद्यामध्ये कोमट पाणी ओता आणि पीठ मळून घ्या. मैद्याचे पीठ जास्त मऊ होणार नाही, याची काळजी घ्या. स्वच्छ कापडाच्या मदतीने १० – १५ मिनिटांसाठी पीठ झाकून ठेवा.

keep the dough aside

Step 4: शंकरपाळ्या करा तयार

मळलेल्या पिठाचे तीन भाग करा. यानंतर लाटण्याला थोडेसे तेल लावून शंकरपाळीच्या पिठाची पोळी लाटून घ्या. फिरकीने शंकरपाळ्या पाडून घ्या.

cut the dough into thin flat strips

Step 5: शंकरपाळ्या तळा

पॅनमध्ये तेल गरम करत ठेवा. तेल गरम झाल्यानंतर ओव्याच्या शंकरपाळ्या तळून घ्या. चॉकलेटी रंग येईपर्यंत शंकरपाळ्या फ्राय करत राहा. कुरकुरीत आणि गरमागरम शंकरपाळ्या तयार आहेत.

fry namak para

Step 6: ओवा शंकरपाळीची रेसिपी : पाहा व्हिडीओ

चहा किंवा कॉफीसोबत शंकरपाळ्यांचा आस्वाद घ्यावा.

कुरकुरीत ओवा शंकरपाळी


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *