ख्रिसमस पार्टीसाठी हवाय हटके लुक? फॉलो करा आवडत्या सेलिब्रिटींच्या ‘या’ हेअर स्टाइल

Spread the love

मुंबई टाइम्स टीम
यंदाचा नाताळ व्हर्च्युअली साजरा करायचा असला तरीही जोरदार तयारी आणि खरेदीची लगबग सुरु आहे. पण, हेअरस्टाइलचं काय करायचं? हा प्रश्न प्रत्येकासमोर आ वासून उभा आहे. यंदा हेअर स्टायलिस्टकडून केसांची स्टायलिंग न करता अगदी कमी वेळेत आणि घरच्या घरी हेअरस्टाइल करण्याचे पर्याय आहेत. ख्रिसमस सेलिब्रेशनकरिता तयार होण्यासाठी अभिनेत्रींच्या काही स्टाइल स्टेटमेंट हेअरस्टाइल्स तुमची नक्कीच मदत करतील…
(दीपिका पादुकोणच्या वॉर्डरोबमध्ये नेहमी दिसतील ‘या’ फॅशन ब्रँडचे सुंदर आउटफिट्स)

​हाय पोनीटेलची चलती…

तुम्ही जर पोनी हेअरस्टाइलचे चाहते असाल तर हाय पोनीटेल ट्राय करायला काहीच हरकत नाही. अभिनेत्री कतरीना कैफ हाय पोनीटेल हेअरस्टाइलला भारी पसंत करते. अगदी रेड कार्पेटवरचा तिचा पोनीटेल लूकही चाहत्यांना भुरळ घालतो. हाय पोनीटेल तुमचं व्यक्तिमत्त्व आणखी खुलवण्यास मदत करेल.

(दीपिका पादुकोणच्या स्टाइलवर भारी पडली २ मुलांची आई असलेल्या शिल्पा शेट्टीची ‘ही’ फॅशन)

​बन बांधा…

हेअरस्टाइलमधील अत्यंत सोपा प्रकार म्हणून बनची ओळख आहे. भन्नाट आणि क्लासिक लूकची आवड असणाऱ्यांसाठी बन हेअरस्टाइलसारखा दुसरा पर्याय नाही. काहींना डोळ्यांवर केस आलेले आवडत नाहीत अशा तरुणींनी बनला प्राधान्य द्यावं. अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या बन हेअरस्टाइल असणाऱ्या पोस्टवर चाहते लाइक्सचा वर्षाव करतात. शिवाय, शूटिंगदरम्यानही ती बन लूकला पसंती देते. लो आणि मेस्सी हेअर बनचा पर्यायही निवडू शकता.

(कांजीवरमपासून ते गोल्ड जरीपर्यंत, रेखा यांच्या ‘या’ सुंदर साड्यांसमोर फिके पडतील महागडे लेहंगे)

​ब्रेडस बांधायला आवडतात?

केसांमध्ये ब्रेडस बांधल्यानं लूकमध्ये कमालीची भर पडते. हट के हेयरस्टाइलचे चाहते असाल तर अभिनेत्री सारा अली खान प्रमाणे ब्रेडेड हेयरस्टाइल्स ट्राय करा. प्रत्येक वेळी दोन्ही बाजूने ब्रेडस न बांधता कधीतरी कानाच्या वर फक्त एका बाजूला ब्रेड्स बांधून उर्वरित केस दुसऱ्या कानावरून पुढे घ्या. हायलाइटेड केसांवर ब्रेड हेअरस्टाइल खूप शोभून दिसते.

(कोट्यवधी रुपये कमावणाऱ्या अनन्या पांडेनं परिधान केले इतके स्वस्त कपडे, पाहा फोटो)

व्हेवी हेअरस्टाइलचा पर्याय

अभिनेत्री जान्हवी कपूर परफेक्ट मेकअप आणि हेअरस्टाइलसाठी ओळखली जाते. शूटिंगमधून जेमतेम मिळणाऱ्या ब्रेकमध्ये जान्हवी मित्रांसमवेत न चुकता ब्रंच किंवा डिनरला हजेरी लावत असते. जान्हवी बऱ्याच आउटफिट्सवर व्हेवी किंवा सॉफ्ट कर्ल हेअरस्टाइल करण्याला पसंती देते. तिची ही हेअरस्टाइल वेस्टर्न सोबतच ट्रॅडिशनल अर्थात पारंपरिक पेहरावांवरसुद्धा कमाल दिसते.

(करीना कपूरचा ड्रेस तर सारा अली खानचा कुर्ता, या अभिनेत्रींच्याही स्टाइलची नुसती चर्चा)

पोनीची फॅशन

अभिनेत्री आलिया भट सोशल मीडियाच्या माध्यमातून कायम चाहत्यांच्या संपर्कात असते. मित्रपरिवारासोबत गेट-टू-गेदर असो वा फॅमिलीसोबत डिनर प्लॅन असो… ती ब्रेड्स किंवा पोनीटेल बांधण्याला पसंती देते. अगदी कमी वेळेत होणारी पोनीटेल तुमच्या अनेक पेहरावांना फेस्टिव्हल लूक देतील. ब्रेडेड पोनी तुमच्या लूकला आकर्षक बनवेल यात काहीच शंका नाही.

(दीपिका पादुकोणच्या ‘या’ स्टायलिश लुकवर लोकांनी व्यक्त केली होती नाराजी, म्हणाले…)

​केस रंगवा, आकर्षक दिसा!

ज्याप्रमाणे एखाद्या हेअरस्टाइलमुळे लूकला शोभा येते त्याचप्रमाणे केस रंगवल्यानं तुमचं व्यक्तिमत्त्व नक्कीच आकर्षक दिसू शकतं. अलीकडेच अभिनेता संजय दत्त याच्या प्लॅटिनम बाइकर साइड कट हेअरस्टाइलला चाहत्यांची वाहवा मिळाली.

(Winter Fashion स्टायलिंगचा हिवाळी मोड ऑन! ग्लॅमरस लुकसाठी ट्राय करा हे फॅशन ट्रेंड)

अनेकांनी त्याच्याप्रमाणे हेअरस्टाइलही करून घेतली. येत्या नवीन वर्षासाठी काहीतरी हट के करायच्या प्रयत्नात असाल तर केस रंगवण्याचा पर्याय तुमची नक्कीच मदत करेल.

(ऐश्वर्या ते अनुष्कासह यांनीही परिधान केले होते ग्लॅमरस बॅकलेस ड्रेस, फोटोंमुळे उडाला धुरळा)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *