गर्भधारणेसाठी एग फ्रीजिंग करण्याआधी वाचा ‘ही’ महत्त्वाची माहिती, राखी सांवतही अवलंबणार आहे हा मार्ग!

Spread the love

राखी सावंत rakhi sawant म्हणजे एक आगळेवेगळे व्यक्तिमत्त्वच, ती कधी काय बोलेल आणि कधी काय इच्छा व्यक्त करेल याचा नेम नाही. अशीच एक इच्छा तिने एका मुलाखतीमध्ये व्यक्त केली की, “तिला एग फ्रीजिंग egg freezing treatment पद्धतीचा वापर करून आई व्हायचे आहे.” खरंतर तिच्या या इच्छेचे स्वागतच केले पाहिजे कारण या प्रक्रियेबद्दल ती जागृत आहे आणि याबद्दल तिला मोठ्या प्रमाणात माहिती आहे. सध्या स्त्रिया या प्रक्रियेला मोठ्या प्रमाणावर पसंती देत आहेत.

याला कारण म्हणजे या प्रक्रियेचा वापर करून स्त्रिया त्यांना हव्या त्या वयामध्ये आई होऊ शकतात. हो अगदी खरं आहे हे. कोणतीही सामान्य स्त्री या पद्धतीचा वापर करून तिला हव्या त्या वयामध्ये आई होण्याची इच्छा पूर्ण करू शकते. पण या प्रक्रियेचा वापर करण्यापूर्वी काही गोष्टी तुम्हाला माहित असायला हव्यात. त्याच गोष्टी आज आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.

एग फ्रीजिंग म्हणजे काय

तुमच्याही मनात हा प्रश्न आला असेल की एग फ्रीजिंग म्हणजे नेमके आहे तरी काय? तर या प्रक्रियेमध्ये स्त्रींच्या अंडाशयातील अंडी काढून त्यांना प्रयोगशाळेत सुरक्षितपणे स्टोर केले जाते. वैद्यकीय भाषेत एग्ज फ्रीजिंगला क्राइयोप्रिजर्वेशन असे म्हणतात. एग्ज फ्रीजिंग नंतर स्त्री तिला हव्या त्या वयात आई बनू शकते. तिची अंडी हि प्रयोगशाळेत सुरक्षित आणि निरोगी असल्या कारणाने त्या सहाय्याने ती सहजपणे गरोदर राहू शकते. जगभरात हि प्रक्रिया अतिशय प्रसिद्ध असून यशस्वी होण्याचे चान्सेस खूप असतात.

(वाचा :- डिलिव्हरीनंतर मंदिरा बेदीने घटवलं २२ किलो वजन, ‘हा’ आहे संपूर्ण दिवसाचा एक्सरसाइज व डाएट प्लान!)

ही प्रक्रिया आहे वरदान

एग फ्रीजिंग ही प्रक्रिया सध्याच्या युगातील स्त्रीसाठी वरदान आहे असेच आपण म्हणू शकतो.आई बनण्याचं वय ठरवण्याआधी व निर्णय घेण्याआधी काही गोष्टी प्रत्येक स्त्रीला माहित असायला हव्यात. आई होण्याचं योग्य वय आहे 20 ते 30 मध्ये पण, जर एखादी स्त्री 20 ते 30 या वयात आई बनू इच्छीत नाही आणि जर आपल्या करियरमुळे किंवा अन्य कारणामुळे तिला 30 वयानंतर आई बनायचे असेल तर अशावेळी एग फ्रीजिंग पद्धतीचा वापर करून ती आई होण्याचे आपले स्वप्न साकार करू शकते. जास्त वयात सहजपणे आई बनण्यासाठी आणि गरोदरपणात येणाऱ्या कोणत्याही समस्येपासून वाचण्यासाठी एग्ज फ्रीजिंग एक उत्तम उपाय आहे.

(वाचा :- फर्टिलिटी वाढवून गर्भधारणेस मदत करेल पोटाचा ‘हा’ मसाज, घरीच मसाज करण्याची पद्धत जाणून घ्या!)

सोपी नाही ही प्रक्रिया

एग फ्रीजिंग बद्दल माहिती जाणून घेऊन तुम्हाला ही प्रक्रिया अत्यंत सोप्पी असल्याचे वाटत असेल, पण असा गैरसमज करून घेऊ नका. कारण एग फ्रीजिंग ही सोप्पी प्रक्रिया नाही. एग फ्रीजिंग करायचेच असेल तर 20 व्या वयात किंवा 30 व्या वयाच्या सुरुवातीला करणेच योग्य ठरते. ही पद्धत राबविण्यासाठी मासिक पोळी सुरु होण्याच्या 14 दिवस आधी हार्मोनल इंजेक्शन घ्यावे लागतात. इंजेक्शन किती प्रमाणात घ्यायचे ते फर्टिलिटी एक्‍सपर्टच ठरवतात. एग रिजर्वची क्वालिटी जाणून घेण्यासाठी काही ब्लड टेस्ट आणि अल्ट्रासाऊंड सुद्धा केले जाते.

(वाचा :- जुळी बाळं हवी असल्यास ‘या’ पद्धतींनी वाढवा फर्टिलिटी!)

इंजेक्शन मध्ये काय असते?

दिले जाणारे इंजेक्शन हे खास असतात. एग्जची ग्रोथ उत्तेजित करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी इंजेक्शनच्या माध्यमातून सिंथेटिक हार्मोन्स शरीरात चढवले जातात. 14 व्या दिवशी एग्जना ओवरी मधून काढून फ्रीज मध्ये स्टोर करण्यासाठी पाठवले जातात. एग्जला नाइट्रोजन लिक्विड मध्ये फ्लेश फ्रोजन रिट्रिव केले जाते. हे इंजेक्शन शरीरावर मोठा प्रभाव करतात. यामुळे शरीरात हार्मोनल बदल निर्माण होतात. हे इंजेक्शन शारीरिक स्थितीनुसार किती प्रमाणात द्यायचे ते डॉक्टर्स ठरवतात.

(वाचा :- लेबर पेन सुरू होत नसेल तर घेऊ शकता ‘या’ हर्बल टीची मदत!)

एग फ्रीजिंगचे दुष्परिणाम

जगातील प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात. एक चांगली आणि एक वाईट, एग फ्रीजिंग सुद्धा याला अपवाद नाही. एग फ्रीजिंगचे जसे फायदे आहेत तसे काही प्रमाणात दुष्परिणाम देखील आहेत. यात रीट्रिवलच्या परिणामांमुळे वेदना, ब्लीडींग, आणि सांधिवातासारख्या समस्या निर्माण होतात. हार्मोन्स बदलांमुळे मूड स्विंग सुद्धा होतो. शिवाय ही प्रक्रिया अतिशय महाग असून मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका देऊ शकते. याशिवाय काही संशोधनांमध्ये असे दिसून आले आहे की फ्रीज केल्या गेलेल्या एग्ज मधून कंसिव्ह करण्याची क्षमता 70 टक्के असते आणि जवळपास 60 टक्के फ्रोजन एग्जच स्पर्मसह फर्टिलाइज होतात.

(वाचा :- अनुष्का शर्माच्या न्यूट्रिशनिस्टने सांगितली प्रेग्नेंसी वेट घटवण्याची योग्य पद्धत!)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *