गर्भपाताची कारणे, यापासून बचाव करण्यासाठी काय काळजी घ्यावी व यावर घरगुती उपाय काय?

Spread the love

गर्भपाताचा मनावरील परिणाम व प्रारंभिक लक्षणे

ज्या महिलेला गर्भपाताचा सामना करावा लागतो अर्थातच तिला जबरदस्त मानसिक धक्का बसतो कारण ही कोणती साधारण गोष्ट नाही. गर्भपातानंतर काही काळ ती स्त्री डिप्रेशनमध्ये जाऊ शकते. त्यामुळे हाच तो काळ असतो ज्या काळात स्त्रीला सर्वात जास्त मानसिक आधाराची गरज असते. तर कधी कधी गर्भपाताच्या धोक्यामुळे काही महिलांना गर्भधारणेचीच भीती वाटते आणि त्यामुळे दुस-या प्रेग्नेंसीसाठी त्या अनिच्छुक असतात. हा कठिण आणि वेदनामय काळ असतो. पण वेळेनुसार गोष्टी बदलत जातात.

 • गर्भपाताची प्रारंभिक लक्षणे

सुरवातीच्या काळात गर्भपात होण्याचं मुख्य कारण मासिक पाळी आपल्या वेळेपेक्षा उशीरा येणं हे असू शकतं. अशा परिस्थितीत मासिक पाळी दरम्यान पहिली लक्षणं दिसून येतात. जसं की स्पॉटिंग, ब्लीडिंग, पाठीचं दुखणं किंवा पोटात हलकासा मुरडा पडणं. ही लक्षणं काहीच काळात प्रचंड रक्तस्त्रावाचं रुप धारण करतात, गंभीर मुरड आणि ब्लड क्लॉटच्या स्वरुपात! गर्भावस्थेच्या कोणत्याही महिन्यात रक्तस्त्राव किंवा पोटात अचानक वेदना होणं खतरनाक ठरु शकतं. अशावेळी ताबडतोब एखाद्या गायनोलॉजिस्टला संपर्क साधला पाहिजे.

(वाचा :- रक्तस्त्रावामुळे आईच्या गर्भातच झाला असता शिल्पा शेट्टीचा मृत्यु, प्रेग्नेंसीतील रक्तस्त्रावापासून कसं राहावं दूर?)

सायलेंट गर्भपात म्हणजे काय?

गर्भपाताच्या काही प्रकरणांमध्ये असंही होऊ शकतं की त्या स्त्रिला रक्तस्त्राव किंवा पोटात वेदना अशा कोणत्याही समस्या होणारच नाहीत किंवा असंही होऊ शकतं की तिला आपला गर्भपात झालाय हे समजणारच नाही. तेव्हा फक्त स्कॅनच्या किंवा सोनोग्राफीच्या मदतीनेच समजू शकतं की गर्भपात झाला आहे. याला सायलेंट मिसकॅरेज किंवा सायलेंट गर्भपात असं म्हटलं जातं.

(वाचा :- सिझेरियन डिलिव्हरीनंतर अशी घ्या टाक्यांची काळजी?)

गर्भपाताची कारणे

गर्भपाताचं सर्वसाधारण कारण क्रोमोसोम्समध्ये समस्या होणं असू शकतं जी गर्भातील भ्रूण पूर्णत: विकसित होण्यास अडथळा निर्माण करतं. अनुवांशिक कारणाव्यतिरिक्त खालील कारणं गर्भपातास कारणीभूत असू शकतात.

 1. हार्मोन्सचा असामान्य स्तर – बाळाच्या विकासासाठी गर्भावस्थेत हार्मोन्सचा स्तर खूप महत्त्वाचा असतो. हार्मोन्सची असामान्य पातळी गर्भपाताचं कारण बनू शकते.
 2. मधुमेह – अनियंत्रित मधुमेह गर्भपाताची शक्यता वाढवतो.
 3. धोकादायक गोष्टींशी जवळीक – प्रदुषण, केमिकल्स, एनव्हायरमेंट रेडियेशन्स, टॉक्सिक पदार्थांच्या संपर्कात येणं.
 4. वेदनाशम गोळ्या जसं की इबुप्रोफेन, नेप्रोक्सन इत्यादीचा वापर
 5. गर्भावस्थे दरम्यान अतिप्रमाणात मद्यपान आणि धुम्रपान करणं
 6. अवैध औषधांचा वापर
 7. काही अॅंटीबॉडीज शरीराची सुरक्षा करता तर काही नुकसान! यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होणं हे देखील गर्भपातास कारणीभूत ठरु शकतं.

(वाचा :- प्रेग्नेंसीच्या नऊ महिन्यांत गर्भाशयामध्ये होतात ‘हे’ मोठे बदल!)

गर्भपाताचे विविध प्रकार

 1. केमिकल्स प्रेग्नेंसी – या प्रेग्नेंसीमध्ये अंडी निकामी होतात जी कधीच गर्भाशयात प्रत्यारोपीत करता येत नाहीत. यामुळे शरीराला काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. यामध्ये गर्भावस्थेतील हार्मोन निर्माण होतात ज्यामुळे मासिक पाळीच्या तीन ते चार दिवस आधी सकारात्मक गर्भावस्थाची लक्षणं दिसू शकतात. कारण अंडी प्रत्यारोपीत केली जाऊ शकत नाही आणि गर्भधारणा होत नाही. काही प्रकरणात गर्भधारणेनंतर काहीच दिवसांत पीरियड्स येऊन त्यादरम्यान रक्तस्त्राव व पोटात मुरड पडू शकते.
 2. मिस्ड गर्भपात – मिस्ड गर्भपात त्याला मानतात जेव्हा क्लिनिकल तपासणी किंवा अल्ट्रासाऊंडच्या माध्यमातून गर्भपात झाल्याचं समजतं. या गर्भपातात स्त्रीला कोणतीही लक्षणे किंवा संकेत दिसून येत नाहीत. या गर्भपाताला मुक म्हणजेच सायलेंट गर्भपात म्हणतात.
 3. ब्लाईटेड ओवम – या स्थितीत भ्रूण पूर्णपणे विकसित न झाल्याने गर्भपात होतो. या स्थितीत गर्भधारणेचे सर्व अनुभव ती स्त्री अनुभवते पण बाळ विकसित होत नाही.
 4. अपूर्ण गर्भपात – काही प्रकरणांमध्ये गर्भाशय काही टिश्यु हे आतच ठेवतो यामुळे अधिकच रक्तस्त्राव आणि मुरड होते. कारण गर्भाशय उर्वरीत टिश्यू बाहेर काढण्यास प्रयत्न करत राहतं. अशावेळी डॉक्टरकडे जाऊन गर्भाशय पूर्ण साफ करुन घ्या.
 5. पूर्ण गर्भपात – पूर्ण गर्भपातामध्ये गर्भाशय पूर्ण खाली होतं म्हणजेच त्यामध्ये कोणताही अवशेष शिल्लक राहत नाही. पण रक्तस्त्राव व मुरड राहू शकते कारण गर्भाशय संकुचन पावतं आणि रक्तस्त्राव वाहून देतं.
 6. आवर्तक गर्भपात – काही महिलांना गर्भावस्थे दरम्यान सतत गर्भपाताचा अनुभव येतो. सतत गर्भपात होणं काही सामान्य गोष्ट नाही. क्रोमोसोनाल डिसऑर्डर या अवस्थेला जबाबदार असू शकतात. असं झाल्यास लगेच गायनोलॉजिस्टचा सल्ला घ्या.

(वाचा :- स्तनपान करणा-या महिलांनी चुकूनही करु नये ‘या’ पदार्थांचे सेवन!)

गर्भपात होऊ नये म्हणून घ्या ही काळजी

गर्भपात होऊ नये म्हणून गर्भावस्थेत स्वत:ला शारीरिक व मानसिकरित्या फिट ठेवणं गरजेचं आहे. खाली दिलेल्या गोष्टी कटाक्षाने पाळा.

 1. गर्भावस्थे दरम्यान कोणत्याही गोळ्यांचे सेवन करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
 2. डाएटिशियन किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने नियमित व्हिटॅमिन व फोलिक अॅसिडयुक्त आहार घेत राहा.
 3. एकदा गर्भपात झाल्यावर दुस-या गर्भधारणेआधी गायनोलॉजिस्टचा सल्ला घ्या.
 4. गर्भपातावर निश्चित असा उपाय नाही. गर्भपात झाल्यावर ऑपरेशनद्वारे गर्भाशयात राहिलेल्या भ्रूणाचे टिश्यू काढून टाकण्याचा डॉक्टर सल्ला देतात. गर्भपात एक दुर्देवी घटना आहे. यातील धोके जाणून घेण्यासाठी गर्भधारणेच्या कितव्या महिन्यात हे झालं माहित असणं आवश्यक असतं. बहुतांश गर्भपात पहिल्या २० आठवड्यांच्या आतच होतात.

(वाचा :- डिलिव्हरीनंतरच्या एनीमियामुळे आई व बाळाला भोगावे लागू शकतात दुष्परिणाम, काय काळजी घ्यावी?)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *