गर्भावस्थेमध्ये योनीतून सफेद पाणी येत असल्यास करा ‘हे’ घरगुती रामबाण उपचार!

Spread the love

मेथी दाणे

मेथी दाणे शरीर आणि योनीतील पीएचचा स्तर नियंत्रित ठेवतात आणि संतुलन राखतात. हे बॉडीमधील एस्‍ट्रोजन लेवलला प्रभावित करून रोगप्रतिकारक शक्ती मोठ्या प्रमाणावर वाढवतात. म्हणून गरोदर स्त्रीने रात्रभर एक चमचा मेथी दाणे भिजवत ठेवावेत आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते गाळणीने गाळून घ्यावेत. यात अर्धा चमचा मध मिसळावे आणि उपाशी पोटी हे पाणी प्यावे. तुम्ही चार कप पाण्यात दोन चमचे मेथीदाणे 30 मिनिटांपर्यंत उकळवून त्या पाण्याचा सुद्धा वापर करू शकता. पाणी उकळवून झाल्यावर ते थंड होऊ द्या आणि मग गाळणीने गाळून घ्या. या पाण्याने काही दिवस योनी दिवसातून तीन वेळा तरी धुवावी.

(वाचा :- प्रेग्नेंसीमध्ये टोमॅटो खाल्ल्याने आई व बाळाला मिळतात ‘हे’ खास लाभ!)

केळी

केळी हे तर आपल्या रोजच्या आहारातील महत्त्वाचे फळ होय. केळी रोज खाण्याचे विविध फायदे असल्याने अनेक घरात रोज केळी खाल्ली जातात. पण तुम्हाला माहित आहे का हि केळी ल्युकेरीया सारख्या समस्येवर सुद्धा रामबाण ठरतात. जाणकारांच्या मते सुद्धा केळी हे असे फळ आहे जे पचन मजबूत करण्यासोबतच वजाईनल डिस्चार्ज कंट्रोल करण्यासाठी मदत करते. त्यामुळे ज्या गरोदर स्त्रीला हि समस्या सतावत असेल तर तिने दिवसाला रोज एक पिकलेले केळे अवश्य खावे.

(वाचा :- प्रेग्नेंसीतील ‘या’ महिन्यात चक्कर येऊ लागल्यास ताबडतोब व्हा सावधान!)

क्रेनबेरी

मुत्रमार्गातील संक्रमण दूर करण्यासाठी आणि योनीमधील जंतूंचा नाश करण्यासाठी क्रेनबेरी हे एक चांगले फळ मानले जाते. क्रेनबेरी मध्ये एंटीसेप्टिक आणि एंटीबायोटिक गुण असतात. त्यामुळेच रोज एक ग्लास क्रेनबेरीचा रस आवर्जून प्यावा. एका संशोधनातून सुद्धा क्रेनबेरीचा ज्यूस प्यायल्याने वजाईनल डिस्चार्ज होत नसल्याचे दिसून आले आहे. क्रेनबेरीची टेबलेट विषाणू आणि जंतुना योनीमध्ये संक्रमण करण्यापासून मज्जाव करतात आणि ल्युकेरीया यासमस्येपासून लढतात. मात्र अशी औषधे घेण्यापूर्वी एकदा अवश्य डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

(वाचा :- आयुर्वेदानुसार डिलिव्हरीनंतर अशी करावी नव्या बाळंतिणीची देखभाल!)

आवळा

आवळ्यात मोठा प्रमाणावर व्हिटॅमिन ‘सी’ असते. हे फळ स्त्रियांच्या योनीला स्वस्थ ठेवण्यात सुद्धा महत्त्वाची भूमिका बजावते. एक चमचा आवळा पावडर मध्ये मध मिसळून जाड मिश्रण तयार करावे आणि रोज एक आठवडा हे मिश्रण खावे. गरोदर स्त्री एक चमचा आवळ्याच्या मुळाची पावडर पाण्यात उकळून याचा सुद्धा वापर करू शकते. हे पाणी थोडे गरम झाल्यावर मग यामध्ये थोडी साखर मिसळावी आणि रोज उपाशी पोटी हे पाणी प्यावे. यामुळे योनीतून पाणी येण्याचे प्रमाण लक्षणीयरित्या नक्कीच कमी होईल. अनेक तज्ञ अतिशय रामबाण उपाय म्हणून आवर्जून आवळ्याची शिफारस करतात.

(वाचा :- प्रेग्नेंसीमध्ये का दिला जातो तूप खाण्याचा सल्ला? तूपाने होते का नॉर्मल डिलिव्हरी?)

अंजीर

अंजीर हे फळ वजाईनल डिस्चार्जवर उपयुक्त आहे हे वाचून तुम्हाला थोडे आश्चर्य नक्कीच वाटले असेल, पण अंजीराचा हा फायदा संधोधनातूनच सिद्ध झाला असून जगभरात ल्युकेरीयापासून सुटका मिळवण्यासाठी स्त्रिया या फळाचा वापर करत आहेत. थोडेसे अंजीर घ्या. ते रात्रभर एक कप पाण्यामध्ये भिजवत ठेवा. सकाळी हे भिजलेले अंजीर बाहेर काढून त्यावरच्या साली काढून टाका आणि उपाशी पोटी हे अंजीर खा. तर हे आहेत काही उपाय जे गरोदर स्त्रीला ल्युकेरीयाच्या समस्येपासून घरबसल्या मुक्ती देऊ शकतात.

(वाचा :- प्रेग्नेंसीमध्ये थायमिनचे सेवन केल्यास बाळाच्या हृदयाचा होतो चांगला विकास! काय असतं थायमिन व किती प्रमाणात घ्यावं?)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *