गौहर खानने स्वतःपेक्षा वयाने लहान असलेल्या जैदशी केलं लग्न, ब्रायडल लुकमधील फोटो व्हायरल

Spread the love

​गौहर खानचा कस्टमाइझ्ड ब्रायडल सेट

गौहर खानने आपल्या निकाहसाठी आयव्हरी रंगाच्या गरारा सेटची निवड केली होती. हे सुंदर आउटफिट सायरा शकीराने डिझाइन केलं होतं. गौहरने परिधान केलेल्या या आउटफिटवर धाग्यांच्या मदतीने बारीक स्वरुपातील एम्ब्रॉयडरी करण्यात आली होती. यासाठी वेगवेगळ्या स्वरुपातील तंत्र वापरण्यात आले होते. पोषाखास अधिक आकर्षक लुक देण्यासाठी मोत्यांचाही वापर करण्यात आला होता. तर राजवाडा ज्वेल्सच्या महाराणी कलेक्शनमधून गौहरने दागिन्यांची निवड केली होती.

(दीपिका पादुकोणच्या वॉर्डरोबमध्ये नेहमी दिसतील ‘या’ फॅशन ब्रँडचे सुंदर आउटफिट्स)

​जैदचा आकर्षक लुक

गौहर खान ब्रायडल लुकमध्ये सुंदर दिसत होती तर जैद सुद्धा प्रचंड हँडसम दिसत होता. परफेक्ट ट्रिम बिअर्ड आणि हेअर स्टाइलमुळे जैदला हटके व आकर्षक लुक मिळाला होता. जैदने गौहरच्या वेशभूषेशी मिळत्या-जुळत्या पोषाखाची निवड केली होती. त्याच्या गळाबंद शेरवानीवर आकर्षक एम्ब्रॉयडरी आपण पाहू शकता. शेरवानीवरील एम्ब्रॉइडरी वर्क गौहरने परिधान केलेल्या गरारावरील ओढणीशी मिळते-जुळते होते. या लुकसह जैदने सिल्क मेड स्ट्रेट कट पायजमा आणि एम्ब्रॉयडरी दुपट्टा मॅच केला होता.

(प्रियंका चोप्राने परिधान केला होता ‘हा’ ग्लॅमरस ड्रेस, लोकांना समजलीच नाही तिची फॅशन)

​रिसेप्शन पार्टीसाठी गडद रंगाच्या आउटफिटची केली निवड

निकाहसाठी या जोडप्याने फिकट रंगाच्या कपड्यांची निवड केली होती तर वेडिंग रिसेप्शनसाठी त्यांनी गडद रंगाचं आउटफिट परिधान केलं होतं. गौहरने गडद मरून आणि सोनेरी रंगाचा सीक्वंस वर्क असणारा लेहंगा परिधान केला होता. गौहरने या लेहंग्यावर सोनेरी रंगाची ज्वेलरी परिधान केली होती. तर जैदने ऑल इन ब्लॅक लुक कॅरी केला होता. त्यानं काळ्या रंगाची आकर्षक डिझाइन असणारी शेरवानी परिधान केली होती. प्लेन पँट, दुपट्टा आणि लेस शूजमुळे त्याला परफेक्ट लुक मिळालाय.

(कोट्यधीश असलेल्या करीना कपूरच्या वॉडरोबमधील स्वस्त व मस्त कपड्यांचे कलेक्शन)

​गौहर-जैदचे आकर्षक आउटफिट

एका कार्यक्रमासाठी गौहर आणि जैदने सिल्क फॅब्रिकपासून तयार करण्यात आलेल्या आउटफिटची निवड केली होती. Mayyur Girotra Couture च्या कलेक्शनमधून गौहरनं शरारा घेतला होता. यावर रेशीम धाग्यांच्या मदतीने पटोला, जरी आणि गोटा वर्क करण्यात आले होते. ज्यामुळे आउटफिट अतिशय सुंदर दिसत होते. गौहरने या ड्रेसवर सोन्याच्या बांगड्या, चोकर नेकपीस, मॅचिंग ईअररिंग्स आणि माथापट्टी असे दागिने परिधान केले होते. तर जैदने देखील सारख्याच रंगाचा कुर्ता आणि त्यावर नेहरू जॅकेट घातलं होते. यावर त्यानं पांढऱ्या रंगाचा पायजमा आणि चॉकलेटी रंगाचे लेदरचे शूज मॅच केले होते.

(आलिया भटने या स्टायलिश लुकसाठी केला तब्बल सात लाख रुपयांचा खर्च)

​मेंदीच्या कार्यक्रमासाठी डिझाइनर आउटफिट

मेंदीच्या कार्यक्रमासाठी गौहर आणि जैदने Rajdeep Ranawat यांनी डिझाइन केलेले आउटफिट घातले होते. गौहरच्या लेहंग्यावर तुम्ही पांढऱ्या रंगाचे प्रिंट डिझाइन पाहू शकता. लेहंग्याचे ब्लाउज काउल नेकलाइन पॅटर्नचे होते, मिरर वर्कमुळे पोषाखास आकर्षक लुक मिळालाय. या आउटफिटवर गौहरने फुलांपासून तयार करण्यात आलेले दागिने परिधान केले होते. तर जैद पांढऱ्या रंगाचा कुर्ता-पायजमा घातला होता, यावर त्याने जॅकेट देखील मॅच केले होतं. त्यानं परिधान केलेल्या पिवळ्या जॅकेटवरील प्रिंट गौहरच्या लेहंग्याशी मॅचिंग होतं.

(तैमूरपासून ते सुहानापर्यंत,या स्टारकिड्सचे कपडे आहेत करीना-कतरिनाच्या स्टाइलपेक्षाही महागडे)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *