ग्लुटाथिओनमुळे चेहऱ्याचीच नव्हे तर संपूर्ण शरीराची त्वचा उजळते, जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेली ही माहिती

Spread the love

आपलं व्यक्तिमत्त्व सुंदर आणि आकर्षक असावं, अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. यासाठी बहुतांश जण कित्येक प्रकारचे उपाय करत असतात. त्वचा आणि केस सुंदर दिसण्यासाठी महागड्या स्वरुपातील केमिकलयुक्त ट्रीटमेंट केल्या जातात. पण यामुळे फायदा होण्याऐवजी नुकसानच अधिक होतं, हे लक्षात घ्यावे. चेहऱ्यावर नैसर्गिक तेज येण्यासाठी शरीर आतील बाजूनं स्वच्छ, सुंदर आणि निरोगी असणं आवश्यक आहे.

चमकदार आणि तरुण त्वचा मिळवण्यासाठी ग्लुटाथिओन आणि ‘व्हिटॅमिन सी’ हे घटक सर्वाधिक महत्त्वाचे आहेत. यामुळे चेहऱ्यावरील पिगमेंटेशन, सुरकुत्या आणि डाग दूर होण्यास मदत मिळते. पण ग्लुटाथिओन म्हणजे काय आणि त्वचा उजळण्यासाठी हे कसं कार्य करतं? असा प्रश्न तुमच्या मनात डोकावतोय का. याबाबत सुशांत रावराणे यांनी (को-फाउंडर, डायरेक्टर एड्रॉइट बायोमेड लिमिटेड) आपल्याला सविस्तर माहिती दिली आहे. जाणून घेऊया…

​ग्लुटाथिओन त्वचा आतून उजळण्याचं कार्य करते

ग्लुटाथिओनचे अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म अँटी मेलोजेनिक गुणधर्मांशी जोडलेले आहेत. हे आपल्या त्वचेवरील पिगमेंटेशन तसंच सुरकुत्या देखील कमी करण्याचे कार्य करतात. यामुळे त्वचेवरील चमक नैसर्गिक स्वरुपात वाढते. ग्लुटाथिओन हे मेलानिनच्या निर्मितीत समावेश असणाऱ्या टायरोसायनेस नावाचे एंझाइमचे उत्पादन रोखून त्वचेवरील पिगमेंटेशन कमी करण्यास मदत करतात.

(त्वचा भाजणे म्हणजे नेमके काय? यावर कोणते उपचार करावेत, जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेली माहिती)

​सोरायसिस

सोरायसिस आणि त्वचेशी संबंधित अन्य विकारांवर उपचार करण्यासाठी ग्लुटाथिओन अत्यंत प्रभावी आहे. याव्यतिरिक्त ग्लुटाथिओन त्वचेवर आलेली सूज देखील कमी करण्याचे कार्य करतं. तीन वेगवेगळ्या अमिनो अ‍ॅसिडपासून ग्लुटाथिओनची निर्मित होते. जे पेशींचे नुकसान होऊ देत नाही तसंच शरीरातील मायटोकॉन्ड्रिया निरोगी ठेवण्याचेही कार्य करतात. यामुळे आपल्या शरीराची क्षमता आणि ऊर्जा देखील टिकून राहते. फार जुन्या काळापासून त्वचेची देखभाल करण्यासाठी एक प्रमुख घटक म्हणून ग्लुटाथिओनचा वापर केला जात आहे.

(Body Massage हिवाळ्यात शरीराचा मसाज केल्यानं मिळतात हे ५ मोठे आरोग्यदायी लाभ)

​चेहऱ्यावरील डाग कमी करण्याचे कार्य

हे अँटी ऑक्सिडंट प्रदूषण, ताणतणावामुळे आणि वृद्धत्वाच्या लक्षणांमुळे चेहऱ्यावर येणारे डाग व त्वचेशी संबंधित अन्य विकार दूर करण्याचे कार्य प्रभावीपणे करतात. यामुळे त्वचेचा रंग उजळण्यास मदत मिळते. ग्लुटाथिओन आपली त्वचा आतील बाजूनं उजळण्याचे कार्य करतात.

(चेहऱ्याची त्वचा अशी डिटॉक्स करते अनुष्का शर्मा, तजेलदार त्वचेसाठी असं फॉलो केलं जातं रुटीन)

​रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी

ग्लुटाथिओन हे नैसर्गिक स्वरुपात माणसांच्या पेशींमध्ये आढळणारे अँटी ऑक्सिडंट आहे. पण जीवनशैली आणि वाढत्या वयोमानानुसार हे अँटी ऑक्सिडंट कमकुवत होऊ लागते. यामुळे कित्येक प्रकारच्या आजारांची लागण होण्याची शक्यता असते. त्वचेचं फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण करणं आणि शरीरातील अतिरिक्त विषारी तत्त्व बाहेर फेकणे (डिटॉक्सिफाय) हे ग्लुटाथिओनचे कार्य आहे.

(त्वचेचा कर्करोग, जाणून घ्या मुख्य लक्षणे व उपचार)

​व्हिटॅमिन सी

व्हिटॅमिन सी आपल्या आरोग्यासाठी अतिशय आवश्यक आहे. तसंच या जीवनसत्त्वामुळे शरीराची रोगप्रतिकारक देखील वाढते. हे जीवनसत्त्व आपल्या त्वचेचं फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण करण्याचे कार्य करतात तसंच रोगप्रतिकारक पेशींचे आरोग्य निरोगी ठेवण्यासही मदत करतात. यातील घटक त्वचेवरील सूज नियंत्रणात ठेवण्याचे कार्य करतात. जेव्हा शरीरातील रोगप्रतिकारक पेशी रोगांविरोधात लढतात तेव्हा व्हिटॅमिन-सीची पातळी वेगाने घसरू लागते. शरीरात व्हिटॅमिन सीची कमतरता निर्माण होऊ नये, यासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार पौष्टिक आहाराचे सेवन करावे.

(Almonds Skincare बदामामुळे कोरड्या त्वचेपासून होईल सुटका, जाणून घ्या योग्य पद्धत)

​ग्लुटाथिओन सप्लीमेंट्स

शरीरामध्ये ग्लुटाथिओनची पातळी वाढवण्यासाठी पौष्टिक आहाराव्यतिरिक्त डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार आपण ग्लुटाथिओन सप्लीमेंट्स घेऊ शकता. यासाठी पर्याय म्हणून आपण आवळा किंवा आवळ्याच्या अर्काचे सेवन करू शकता. यातील गुणधर्म शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास, शरीर डिटॉक्स होण्यासाठी आणि त्वचा निरोगी राहण्यासाठी पोषक आहेत. आवळ्याच्या सेवनाद्वारे शरीराला नैसर्गिक स्वरुपात ‘व्हिटॅमिन सी’चा पुरवठा होता.

(Skin Care Tips पिंपलमुळे आहात त्रस्त? अशा पद्धतीने चेहरा ठेवा स्वच्छ व मॉइश्चराइझ)

NOTE आपल्या आहारामध्ये कोणतेही बदल करण्यापूर्वी ओळखीच्या डॉक्टरांचा किंवा आहारतज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *