How to make: घरगुती स्पेशल ब्रेड रसमलाई रेसिपी
एका वाटीच्या मदतीने ब्रेड स्लाइसला गोल आकार द्या. ब्रेड स्लाइसच्या कडा काढून टाका.
Step 2: दूध गरम करत ठेवा
एका भांड्यामध्ये चार कप दूध गरम करत ठेवा. दूध आटेपर्यंत गरम होऊ द्यावे. तसंच दूध भांड्याला चिकटणार नाही, याची काळजी घ्यावी.

Step 3: मिल्क पावडर मिक्स करा
आता दुधामध्ये दोन चमचे मिल्क पावडर मिक्स करा आणि दूध ढवळा. गॅसच्या मध्यम आचेवर दूध गरम होऊ द्यावे. ३/४ कप कन्डेन्स्ड मिल्क मिक्स करा.

Step 4: केशर, बदाम-पिस्त्याचे काप दुधात घालावे
यानंतर दुधामध्ये वेलची पावडर, केशर, बदाम आणि पिस्त्याचे काप घालावेत. चार ते पाच मिनिटांसाठी सर्व सामग्री शिजू द्यावी. मिश्रण उकळून घट्ट होऊ द्यावे.

Step 5:
आता ब्रेड स्लाइस एका प्लेटमध्ये ठेवा. त्यावर तयार केलेले मलाई घालावी. तसंच वेलची पावडर, केशर, बदाम पिस्त्याचे काप, केशरने सजावट करावी.

Step 6: ब्रेड रसमलाई पाककृती : पाहा व्हिडीओ
गरमागरम किंवा फ्रीजमध्ये थंड करून तुम्ही ब्रेड रसमलाईचा आस्वाद घेऊ शकता.

चविष्ट ब्रेड रसमलाई
Source link
Recent Comments