घरच्या घरी करा हे ६ सोपे फेशिअल एक्‍सरसाइज, कमी होईल डबल चिनची समस्या

Spread the love

​सिंह मुद्रा

सिंह मुद्रेच्या सरावामुळे चेहऱ्याचे स्नायू टोनअप होण्यास मदत मिळते. नियमित या मुद्रेचा अभ्यास केल्यास चेहऱ्यावरील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत मिळू शकते.

कसा करावा सरावा?

सर्वप्रथम योग मॅटवर सुखासनामध्ये बसा. यानंतर आपले हात जमिनीवर ठेवा. या स्थितीमध्ये हाताचे कोपरे जमिनीवर अजिबात ठेवायचे नाहीत, हे लक्षात ठेवा. जेवढे शक्य आहेत तितके आपले शरीर पुढील बाजूस नेण्याचा प्रयत्न करावा. हातावर संपूर्ण शरीराचा भार येऊ द्यावा. आता शक्य होईल तितके आपले तोंड उघडा आणि जीभ बाहेर काढा. यामुळे तोंडाच्या स्नायूंना ताण मिळतो. नियमित सकाळी दोन ते तीन वेळा या मुद्रेचा सराव करावा.

(Benefits Of Yoga पोटावरील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी या आसनांचा करा सराव)

​फिश फेस

फिश फेस एक्सरसाइजमुळे गालांव्यतिरिक्त चेहऱ्याच्याही स्नायूंना चांगला ताण मिळतो.

कसा करावा सराव?

आपले गाल आणि ओठ आतमध्ये खेचा. या स्थितीमध्ये तुमचा चेहरा माशाप्रमाणे दिसतो. या स्थितीमध्ये २० ते ३० सेकंद राहा आणि हसण्याचाही प्रयत्न करावा. दिवसभरात बसल्या-बसल्या किंवा अन्य काम करतानाही अनेकदा आपण हा व्यायाम करू शकता.

(रात्री झोपण्यापूर्वी तुपाने तळपायांचा मसाज का करावा? करीनाच्या डाएटीशियनकडून जाणून घ्या फायदे)

​जिव्हाबंध

जॉलाइनला योग्य शेप देण्यासाठी आणि चेहऱ्याचे आकर्षण वाढवण्यासाठी जिव्हाबंध मुद्रा सर्वोत्तम उपाय आहे.

कसा करावा सराव?

सर्वप्रथम आरामदायी स्थितीमध्ये बसा. यानंतर आपली जीभ टाळूच्या दिशेनं वरील बाजूस लावून ठेवा आणि तोंडे उघडण्याचा प्रयत्न करावा. या स्थितीमध्ये तुमच्या गळ्याच्या भागाला चांगला ताण मिळतो. दिवसभरात चार ते पाच वेळा या मुद्रेचा अभ्यास करावा.

(Weight Loss Journey सूर्य नमस्कारासह अन्य वर्कआउट करून फिट झाली ही महिला, कधीकाळी होते ७८ Kg वजन)

​जालंधर बंध (चिन लॉक)

जालंधर बंधचा नियमित सराव केल्यास फेशिअल जॉलाइन टोनअप होण्यास मदत मिळू शकते.

कसा करावा सराव?

सर्वप्रमथ पद्मासनामध्ये बसा आणि कंबर व मान ताठ ठेवा. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा. हातांनी गुडघे पकडून ठेवा. त्यानंतर पूर्ण श्वास बाहेर सोडा. यानंतर डोके थोडेसे पुढे झुकवून हनुवटी गळ्याला टेकवून जालंधर बंध लावा. आपल्या क्षमतेनुसार या स्थितीमध्ये काही वेळासाठी राहावे. विश्रांती घेऊन पुन्हा जालंधर बंधचा व्यायाम करावा.

(Body Transformation ३ महिन्यांत शरीर होईल स्लिम-ट्र‍िम, बॉडी ट्रान्सफॉर्मेशनसाठी फॉलो करा खास टिप्स)

​नेक रोल एक्सरसाइज

  • नेक रोल एक्सरसाइजमुळे डबल चिनची समस्या कमी होण्यास मदत मिळू शकते.
  • जमिनीवर आरामदायी स्थितीमध्ये बसा आणि आपला चेहरा सरळ ठेवावा. आपली हनुवटी सरळ रेषेत ठेवून चेहरे एकीकडून दुसरीकडे गोलाकार दिशेमध्ये फिरवा.
  • हा व्यायाम करताना आपल्या कंबर आणि खांद्यांची हालचाल होणार नाही, याची काळजी घ्यावी. क्लॉकवाइज आणि अँटी-क्लॉकवाइज दिशेनं व्यायाम करावा.

(डाएटीशियन-फिटनेस ट्रेनरशिवायच या महिलेनं घटवलं ४० Kg वजन, वाचा संपूर्ण Weight Loss Story)

NOTE कोणत्याही प्रकारच्या व्यायाम प्रकारांचा सराव करण्यापूर्वी आपल्या जिम ट्रेनरचा सल्ला घेणे आवश्यक आहे.


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *