घरच्या घरी नेलआर्ट करण्यासाठी सोप्या टिप्स

Spread the love

मुंबई टाइम्स टीम
घरातली आणि ऑफिसची काम संपवूनही हातात पुरेसा वेळ उरतो. त्यामुळे कंटाळा येणं साहजिक आहे. तुम्ही वेळ घालवण्यासाठी नेल आर्टचा पर्याय आजमावून बघू शकता. सध्या ट्रेंडमध्ये असलेल्या नेल आर्टचे विविध प्रकार जाणून घेऊ या…


कँडी नेलआर्ट

आपल्या नखांवर कोणता रंग उठून दिसतो? याबाबत अनेकजण गोंधळलेले असतात. त्यामुळे नखं रंगीबेरंगी करण्याचा सध्याचा हा ट्रेंड तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकेल. तसेच तुमची नखं देखील आकर्षक दिसतील. तुमचा जिव्हाळ्याचा विषय असलेल्या कँडीजचे डिझाइन्स नखांवर साकारु शकतात.
(चेहरा व केसांच्या सौंदर्यासाठी संजीवनी ठरेल हे घरगुती आयुर्वेदिक तेल)

नखं कशी सजवाल?

– तुम्हाला नखांना कोणते पाच रंग द्यायचे आहेत ते निवडा. नेलपॉलिशच्या विविध रंग छटा वापरून प्रयोग करा.
– तुम्ही पेस्टल, मेटॅलिक शेड किंवा निऑन रंगाचं नेलपॉलिश लावू शकता.
– तुम्हाला आवडणाऱ्या आकारातील कँडीजच्या डिझाइन्स नखांवर साकारा.
– नखांना चमक येण्यासाठी लास्ट टच द्या.
– नेलपॉलिश लावण्याआधी बेस कोटचा वापर करा.
– प्रत्येक नखाला वेगवेगळ्या रंगाचं नेलपॉलिश लावा.
– तुम्हाला हवी असलेली नेलपॉलिशची शेड लावून झाल्यावर पुन्हा बेस कोट लावा.
(केसगळती रोखण्यासाठी रामबाण उपाय, वापरा हे घरगुती आयुर्वेदिक तेल)फ्लॉवर नेल आर्ट
नेलआर्ट करताना फुलांची नक्षी काढून नखांना हट के लूक देऊ शकता. फुलांचं नक्षीकाम करण्यासाठी टूथपिकचा वापर करु शकता. फुलांचे वेगवेगळे पॅटर्न तयार करून घ्या.
(टाचांना पडलेल्या भेगांमुळे आहात त्रस्त? जाणून घ्या सोपे घरगुती उपाय)

नखं कशी सजवाल?


– तुम्ही निऑन ग्रीन, पेस्टल ग्रीन किंवा पिवळ्या रंगाबरोबर निळा आणि गुलाबी रंगाचाही वापर करू शकता.
– नेलपॉलिश लावण्याआधी बेस कोटचा वापर करा.
– प्रत्येक नखाला वेगवेगळ्या रंगाचं नेलपॉलिश लावा.
– बोटाला लावलेलं नेलपॉलिश एकदा सुकलं की टूथपिकचं टोक पिवळ्या रंगात बुडवा.
– नंतर टूथपिकच्या मदतीनं फुलांचं डिझाइन काढा.
– डिझाइनला चमक येण्यासाठी त्यावर एक कोटिंग करा.

घरच्या घरी करा मेनिक्युअर

संकलन- वेदांगी काण्णव, मुंबई विद्यापीठ


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *