घरात राहूनही चेहरा टॅन झाल्यासारखा वाटतोय? जाणून घ्या दालचिनी फेस पॅकचा कसा करायचा वापर

Spread the love

खाद्यपदार्थांची चव वाढवण्यासाठी जगभरात दालचिनीचा वापर केला जातो. गरम मसाल्यांच्या वापरामुळे स्वयंपाकाची चव वाढतेच शिवाय यातील औषधी गुणधर्म आरोग्यासाठीही पोषक असतात. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार दालचिनीचा उपयोग केल्यास आपल्या त्वचेचं आरोग्यही निरोगी राहण्यास मदत मिळू शकते. कारण यामध्ये अँटी बॅक्टेरिअल आणि अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म आहेत.
(Beauty Tips घरच्या घरी कसं तयार करायचं मेकअप फाउंडेशन, जाणून घ्या पद्धत)

जे आपल्या त्वचेवरील मुरुम, मुरुमांचे डाग कमी करण्याचे कार्य करतात. आपल्या स्किन केअर रुटीनमध्ये दालचिनीचा समावेश केल्यास त्वचेला भरपूर लाभ मिळतील. पण डॉक्टरांचा सल्ला घेऊनच त्वचेसाठी दालचिनीचा उपयोग करावा. त्वचेसाठी दालचिनीचा कसा करावा वापर, जाणून घेऊया सविस्तर माहिती.
(Skin Care Tips तारक मेहतामधील ‘बबीता’ त्वचेची अशी घेते काळजी, शेअर केलं ब्युटी सीक्रेट)

​मुरुम दूर करण्यासाठी

दालचिनीतील अँटी-बॅक्टेरिअल गुणधर्म चेहऱ्यावरील मुरुम कमी करण्यास मदत करतात. हे घटक त्वचेवरील बॅक्टेरिया समूळ नष्ट करण्याचे कार्य करतात.

फेस पॅक : यासाठी एक चमचा मधामध्ये अर्धा चमचा दालचिनी पावडर मिक्स करा. त्यामध्ये दोन ते तीन थेंब दालचिनीचे तेल मिक्स करा. हा लेप आपल्या चेहऱ्यावर १५ ते २० मिनिटांसाठी लावा. थोड्या वेळानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुऊन घ्यावा. लेप लावल्यानंतर त्वचेवर जळजळ होऊ लागल्यास हा उपाय करू नये.

(Natural Skin Care गुलाब पाण्याने घरच्या घरी फेशिअल कसे करावे, जाणून घ्या योग्य पद्धत)

​सुरकुत्यांपासून सुटका

लहान वयातच तुम्ही सुरकुत्यांच्या समस्येचा सामना करत आहात का? तर मग अँटी एजिंग क्रीमऐवजी दालचिनीचा वापर करून पाहा. यातील अँटी ऑक्सिडंट चेहऱ्यावरील सुरकुत्यांची समस्या दूर करण्यास मदत करतात.

फेस पॅक : एक चमचा दालचिनी पावडरमध्ये दोन चमचे ऑलिव्ह ऑइल मिक्स करा. हे मिश्रण चेहऱ्यावर १० ते १५ मिनिटांसाठी लावून ठेवा. थोड्या वेळानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुऊन घ्यावा.

(Hair Care Tips केसांसाठी टॉनिक आहे ग्लिसरीन; मऊ आणि चमकदार केसांसाठी असा करा वापर)

​त्वचेचा रंग आणि पोत सुधारण्यासाठी

त्वचेचा रंग एकसमान करण्यासाठी तुम्ही दालचिनी फेस पॅक वापरू शकता. एक चमचा दालचिनी पावडरमध्ये एक चमचा दही आणि मध मिक्स करा. हा लेप मान आणि चेहऱ्यावर लावा. लेप सुकल्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुऊन घ्यावा.

(Skin Care Tips पिंपलमुळे आहात त्रस्त? अशा पद्धतीने चेहरा ठेवा स्वच्छ व मॉइश्चराइझ)

​मुरुमांचे डाग

चेहऱ्यावरील मुरुमांचे डाग सहजासहजी जात नाहीत. यामुळे आपल्या सौंदर्यामध्ये बाधा निर्माण होते. योग्य प्रकारे दालचिनी फेस पॅकचा वापर केल्यास मुरुमांचे डाग कमी होण्यास मदत मिळू शकते. दालचिनीतील अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म डागांची समस्या दूर करण्याचे कार्य करतात. एक चमचा दालचिनीमध्ये दोन चमचे नारळाचे तेल मिक्स करा. हा लेप मान आणि चेहऱ्यावर लावा. १५ ते २० मिनिटांनंतर त्वचा स्वच्छ धुऊन घ्या. त्वचा तेलकट असल्यास नारळाच्या तेलाऐवजी मधाचा वापर करावा.

(Natural Remedies चेहऱ्यावरील डागांमुळे आहात त्रस्त? जाणून घ्या या ७ नैसर्गिक सामग्रींची माहिती)

​कोरड्या त्वचेची समस्या

कोरड्या त्वचेमुळे चेहऱ्यावरील नैसर्गिक तेज कमी होऊ लागते. त्वचा मऊ आणि चमकदार दिसण्यासाठी तुम्ही दालचिनी फेस पॅकचा वापर करू शकता.

कसं तयार करायचे फेस पॅक: एक चमचा दालचिनी पावडरमध्ये एक चमचा मध मिक्स करा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि हलक्या हाताने मसाज करा. थोड्या वेळाने चेहरा स्वच्छ धुऊन घ्यावा.

(कोपराच्या रूक्ष व कोरड्या त्वचेपासून कशी मिळवावी सुटका, जाणून घ्या हे ७ नैसर्गिक उपाय)

NOTE : चेहरा किंवा त्वचेशी संबंधित कोणतेही उपाय करण्यापूर्वी आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यायला विसरू नका. तसंच अन्य कोणत्याही व्यक्तीचे स्किन केअर रुटीन फॉलो करू नये. कारण प्रत्येकाच्या त्वचेचा प्रकार एकसारखा नसतो.

घरच्या घरी कसं तयार करायचे डी टॅन फेस पॅक?


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *