घोरण्याच्या समस्येपासून हवीय सुटका? झोपण्यापूर्वी या आयुर्वेदिक तेलांचा करा उपयोग

Spread the love

उदाहरणार्थ तणाव कमी करण्यासाठी, शारीरिक ऊर्जा वाढवण्यासाठी, डोकेदुखी कमी करण्यासाठी, चिंता आणि त्वचा विकार दूर करण्यासाठी अशा तेलांची मदत घेण्यात येते. संशोधनातील माहितीनुसार, घोरण्याच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठीही एसेंशिअल ऑइल फायदेशीर आहे. घोरणे ही सामान्य समस्या आहे. पण यामुळे इतरांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो.

​प्रभावी उपाय : एसेंशिअल ऑइल

घोरण्याची सवय कमी करण्यासाठी आणि गाढ झोप मिळावी, यासाठी बहुतांश जण एसेंशिअल ऑइलचा मोठ्या प्रमाणात वापर करताहेत. फायटोथेरेपी रीसर्चमध्ये छापण्यात आलेल्या एका क्लिनिकल चाचणीतील माहितीनुसार, घोरण्याची समस्या कमीत कमी ३० टक्के प्रौढ आणि ५० टक्के ६० वर्षांवरील लोकांमध्ये आढळते.

(रात्री गाढ झोप मिळण्यासाठी लक्षात ठेवा या ७ गोष्टी)

​घोरण्याच्या समस्येवर उपाय

घोरण्याची समस्या वाढल्यास निद्रानाश आणि स्लीप एप्निया रोगाचा सामना करावा लागण्याची शक्यता असते. स्लीप एप्निया डिसऑर्डरमध्ये झोपेमध्ये श्वासोच्छवासाची प्रक्रिया वारंवार थांबते आणि सुरूही होते. फायटोथेरेपी रीसर्चमधील माहितीनुसार, एसेंशिअल ऑइलचा वापर केल्याने कित्येक लोकांमधील घोरण्याची समस्या बऱ्याच प्रमाणात कमी झालीय. ही समस्या दूर करण्यासाठी उपयोगी ठरू शकतील अशा आठ एसेंशिअल ऑइलची माहिती जाणून घेऊया.

(Health या गोष्टींमध्ये दडलीय तुमच्या आरोग्याची गुरुकिल्ली, तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती)

​लेमन एसेंशिअल ऑइल

ताज्या लिंबूच्या सालींवर विशेष प्रक्रिया करून लेमन एसेंशिअल ऑइल तयार केलं जातं. २०११मध्ये करण्यात आलेल्या अभ्यासानुसार, लेमन एसेंशिअल ऑइलचा स्प्रेच्या स्वरुपात किंवा गुळण्या करण्यासाठी उपयोग केल्यास घोरण्याची समस्या कमी होण्यास मदत मिळू शकते.

(ट्रेनने प्रवास करताना आरोग्यासाठी अशी घ्या खबरदारी, वाचा तज्ज्ञांनी दिलेली माहिती)

​लव्हेंडर एसेंशिअल ऑइल

लव्हेंडर एसेंशिअल ऑइलच्या सुगंधामुळे चांगली झोप येते. २०१४ मधील जर्नल ऑफ अल्टरनेटिव्ह अँड कॉप्लीमेंट्री मेडिसिनमध्ये छापण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार, लव्हेंडर ऑइलचा सुगंध घेतल्याने कमी झोपेची समस्या असलेल्या लोकांवर सकारात्मक परिणाम पाहायला मिळाला.

(डान्स करा, ताण विसरा! शफल डान्स व हुपिंगचे ‘हे’ आहेत फायदे)

​बडिशेपचे तेल

बडिशेप तेलामध्ये अँटी- इन्फ्लेमेटरी गुणधर्म आहेत. ज्यामुळे नाक आणि घशातील सूज कमी होते. तसंच नाकाच्या मार्गातील हवेचा प्रवाह सुधारण्यास मदत मिळते.

(सर्दी व खोकल्यापासून आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय ठरतील उपयुक्त)

​पुदिन्याचे तेल

पुदिन्याच्या तेलामध्ये अँटी बॅक्टेरिअल, अँटी- व्हायरल आणि शरीराला थंडावा देणारे गुणधर्म आहेत. पुदिन्याच्या तेलाचा सुगंध घेतल्याने सायनसचा त्रास कमी होतो आणि श्वासोच्छवासाच्या प्रक्रियेतील अडथळे दूर होण्यास मदत मिळते.

(झोपेत सुरू आहे का मेसेजिंग? जाणून घ्या आजारामागील कारणे)

​थाइम एसेंशिअल ऑइल

थाइम एसेंशिअल ऑइलमध्ये अँटी फंगल, अँटी बॅक्टेरिअल आणि अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म आहेत. घोरण्याची समस्या कमी करण्यासाठी हे तेल प्रचंड प्रभावी आहे. अन्य आरोग्यवर्धक घटकांचा समावेश करूनही या तेलाचा उपयोग केला जाऊ शकतो.

(Health Tips पोट आरामात जाईल आतमध्ये, फक्त नियमित करा हे ५ एक्सरसाइज)

​खसखसचे तेल

झोपण्यापूर्वी खसखसच्या तेलाचा उपयोग केल्यास श्वासोच्छवासाच्या प्रक्रियेमधील अडथळे कमी होण्यास मदत मिळते. २०१० मध्ये करण्यात आलेल्या अभ्यासानुसार, खसखसच्या तेलामुळे श्वास बाहेर सोडण्याची प्रक्रिया अधिक चांगल्या पद्धतीनं होते. घोरण्याची समस्या असणाऱ्यांसाठी हे तेल भरपूर फायदेशीर आहे.

(सॅनिटायझर बर्न्स टाळणे शक्य, तज्ज्ञांच्या माहितीनुसार ‘या’ खबरदारी बाळगणे आवश्यक)

​​युकेलिप्टस एसेंशिअल ऑइल

युकेलिप्टसची पाने सुकवून आणि यानंतर विशेष प्रक्रिया करून तेल काढलं जातं. या तेलाचा सुगंध घेतल्याने श्वसन तंत्रातील कफ कमी होतो आणि घोरण्याची समस्या हळूहळू कमी होण्यास मदत मिळते.

(सायकलिंगला सुरुवात करताय? मग आरोग्यासाठी या गोष्टींची खबरदारी घेणे आवश्यक)

​​सेज एसेंशिअल ऑइल

सेज एसेंशिअल ऑइलमध्ये अँटी- बॅक्टेरिअल गुणधर्ण आहेत. या तेलाचा योग्य प्रमाणात वापर केल्यास गाढ झोप मिळते.

(भात खाल्ल्याने शरीरावर होतात हे परिणाम, किती प्रमाणात सेवन करणं ठरेल आरोग्यासाठी योग्य?)

​एसेंशिअल ऑइलचा वापर करण्याची योग्य पद्धत

  • एसेंशिअल ऑइलचा सुगंध घेणे.
  • आंघोळीच्या पाण्यामध्ये तेलाचे काही थेंब मिक्स करणे.
  • तेल आपल्या पायांच्या तळव्यावर लावणे.
  • एसेंशिइल ऑइलचे काही थेंब पाण्यात मिक्स करून गुळण्या करणे.
  • एसेंशियल ऑइलचे काही थेंब घेऊन त्वचेचा मसाज करू शकता.

एसेंशिअल ऑइल नेहमी नारळाचे तेल, बदामाचे तेल किंवा ऑलिव्ह ऑइलमध्ये मिक्स करून वापरावे, हे लक्षात ठेवा. तसंच तुमची घोरण्याची समस्या अधिक वाढली असल्यास आपल्या ओळखीच्या डॉक्टरांना संपर्क साधा आणि योग्य ते औषधोपचार करा.


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *