चटपटीत कांदा भेंडी रेसिपी Bhindi Do Pyaza Recipe

Spread the love

How to make: चटपटीत कांदा भेंडी रेसिपी Bhindi Do Pyaza Recipe

Step 1: भेंडी कापून घ्या

सर्वप्रथम पाण्याने भेंडी स्वच्छ धुऊन घ्या आणि कापा. एका पॅनमध्ये तेल गरम करत ठेवा. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये चिरलेला कांदा फ्राय करून घ्या.

Step 2: तेलामध्ये भेंडी परतून घ्या

कांद्याला हलका गुलाबी रंग आल्यानंतर पॅनमधून कांदा प्लेटमध्ये काढा आणि बाजूला ठेवून द्या. आता तेलामध्ये कापलेली भेंडी परतून घ्या. दोन ते तीन मिनिटांसाठी भेंडी फ्राय होऊ द्या.

भेंडी फ्राय करून घ्या

Step 3: जिरे-धणे तेलात फ्राय करा

आता दुसऱ्या पॅनमध्ये एक चमचा तेल गरम करा. त्यामध्ये एक चमचा जिरे आणि यानंतर एक चमचा धणे घाला आणि चांगल्या पद्धतीने परतून घ्या. थोड्या वेळाने यामध्ये चिरलेला कांदा, आले-लसूण पेस्ट मिक्स करा आणि सर्व सामग्री काही मिनिटभरासाठी परतून घ्यावी.

धणे आणि जिरे फ्राय करा

Step 4: टोमॅटो आणि दही मिक्स करा

आता पॅनमध्ये चिरलेला टोमॅटो आणि दही मिक्स करा. चवीनुसार मीठ, लाल-तिखट आणि धणे पावडर देखील टाका. थोड्या वेळाने चिमूटभर हळदीचा समावेश करावा आणि काही मिनिटांसाठी सर्व सामग्री ढवळत राहा.

टोमॅटो मिक्स करा

Step 5: मसाला शिजू द्या

भाजीचा मसाचा फ्राय करून घेतल्यानंतर त्यामध्ये पाणी ओता. मसाला नीट शिजू द्या. आता मसाल्यामध्ये फ्राय केलेली भेंडी मिक्स करा आणि सर्व सामग्री चांगल्या पद्धतीने ढवळत राहा. चटपटीत कांदा भेंडी तयार झाल्यानंतर गॅस बंद करा. ही डिश तुम्ही पोळी किंवा पराठ्यासोबत खाऊ शकता.

कांदा भेंडी रेसिपी

Step 6: कांदा भेंडी पाककृतीचा व्हिडीओ

वेगळ्या प्रकारे तयार करा भेंडीची भाजी


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *