How to make: चटपटीत दही पापडी चाट रेसिपी
एक वाटीत दही घ्या. आता या दह्यात साखर मिसळून ते बाजूला ठेवा.
Step 2: पापडी घेऊन त्यावर बटाटा, चणे, कांदा आणि दही घाला
एका प्लेटमध्ये शेव पुरीसाठी वापरली जाणारी पापडी घेऊन त्यावर उकडलेल्या बटाट्यांचे काप ठेवा. आता त्यावर उकडलेले चणे, कांदा आणि दही टाका.

Step 3: कोथींबीर आणि चिंचेची चटणी मिक्स करुन चाट मसाल्याने पापडी गार्निश करा.
मिश्रणात मीठ, जीरा पावडर आणि लाल तिखट टाका. आता त्यात कोथींबीर आणि चिंचेची चटणी मिक्स करुन चाट मसाल्याने गार्निश करा. सर्व्ह करण्याआधी कापलेली कोथींबीर आणि बारीक शेव त्यावर भुरभूरा.

Step 4: तयार झालं आपलं चटपटीत आणि टेस्टी दही पापडी चाट!
टीप – तयार झालं आपलं चटपटीत आणि टेस्टी दही पापडी चाट! जे सच्चे खवय्ये आहेत ते आपल्या आवडीनुसार त्यामध्ये दही किंवा चटणी मिक्स करुन चाटला तिखट किंवा गोड स्वाद देऊ शकतात.

Step 5: दही पापडी चाट रेसिपी :- पाहा VIDEO
व्हिडीओमध्ये दिलेली पद्धत फॉलो करुन बनवा टेस्टी दही पापडी चाट!

Source link
Recent Comments