चमकदार त्वचा आणि काळ्याशार केसांसाठी क्रीम व शॅम्पू नव्हे, तर लावा हे रामबाण नैसर्गिक तेल

Spread the love

​कोरडी त्वचा

कोरड्या त्वचेच्या समस्येचा सामना करणाऱ्या लोकांनी आंघोळ करण्यापूर्वी मोहरीच्या तेलानं मसाज करावा. हा उपाय जवळपास महिनाभर करून पाहावा. कोरड्या त्वचेची समस्या कमी होऊ लागल्यास आठवड्यातून दोन वेळा या तेलाने शरीराचा मसाज करावा. मोहरीच्या तेलामुळे तुमच्या त्वचेला नैसर्गिक स्वरुपात मॉइश्चराइझर मिळते. यामुळे त्वचेतील ओलावा टिकून राहण्यास मदत मिळते.

(मुरुमांचे डाग, निर्जीव त्वचेची समस्या दूर करण्यासाठी असे तयार करा पपई फेस पॅक)

​सन टॅनपासून मिळेल सुटका

बाजारातील केमिकलयुक्त सनस्क्रीन लावण्यापेक्षा मोहरीचे तेल वापरुन पाहा. हे तेल त्वचेवर एका नैसर्गिक सनस्क्रीन प्रमाणे काम करते. योग्य प्रकारे या तेलाचा वापर केल्यास सन टॅनची समस्या कमी होण्यास मदत मिळेल आणि त्वचेवर चमक देखील येईल. महत्त्वाचे म्हणजे त्वचा निरोगी राहील. घरातून बाहेर पडण्यापूर्वी मोहरीच्या तेलाचे काही थेंब त्वचेवर लावा. सूर्याच्या हानिकारक किरणांपासून त्वचेचे संरक्षण होईल.

(Cucumber For Skin: नितळ त्वचा हवीय? मग असे तयार काकडीच्या सालीपासून फेस पॅक)

​त्वचेचा काळपटपणा होईल कमी

तुमची त्वचा निस्तेज आणि काळपट दिसत आहे का? तर बेसन, लिंबू रस आणि अर्धा चमचा मोहरीचे तेल एका वाटीमध्ये घ्या आणि त्याची जाडसर पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहरा आणि मानेवर १५ मिनिटांसाठी लावून ठेवा. पेस्ट सुकल्यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या. हा उपाय नियमित केल्यास चेहरा चमकदार होईल आणि काळवंडलेल्या त्वचेची समस्या दूर होण्यास मदत मिळेल.

(Home Remedies कापूरसह नारळाच्या तेलाने करा केसांचा मसाज, कोंडा होईल कमी)

​निरोगी आणि चमकदार केस

मोहरीच्या तेलामुळे केस लांबसडक, घनदाट आणि काळेशार होण्यास मदत मिळेल. मोहरीचे तेल कोमट करून घ्या आणि हलक्या हाताने मुळांपासून केसांचा चांगल्या पद्धतीने मसाज करा. यानंतर तासभर केसांमध्ये तेल राहू द्यावे. थोड्या वेळाने हर्बल शॅम्पूने केस स्वच्छ धुऊन घ्या. आठवड्यातून दोन वेळा हा उपाय करावा. यामुळे कोंडा, टाळूला खाज सुटणे आणि केसगळती यासारख्या समस्या कमी होण्यास मदत मिळेल.

(तेलकट त्वचा असणाऱ्यांनी असे तयार घरगुती क्लींझर, चेहऱ्यावर दिसतील आश्चर्यकारक बदल)

​फाटलेल्या ओठांवर लावा मोहरीचे तेल

थंडीमध्ये ओठ फाटण्याच्या समस्येमुळे बहुतांश जण त्रस्त असतात. ही समस्या अतिशय त्रासदायक असते. फाटलेल्या ओठांवर बाजारातील क्रीम लावण्यापेक्षा मोहरीचे तेल लावा. नैसर्गिक उपचारामुळे तुम्हाला या समस्येपासून सुटका मिळेल. रात्री झोपण्यापूर्वी आपल्या ओठांवर मोहरीच्या तेलाचे दोन ते तीन थेंब लावा. यामुळे ओठ मऊ राहण्यास मदत मिळेल. ओठांसाठी केमिकलयुक्त क्रीमचा वापर करणं टाळावे. कारण ओठांच्या नैसर्गिक गुलाबी रंगावर दुष्परिणाम होऊन ते काळे पडतात.

(Turmeric Benefits For Skin डागविरहीत आणि नितळ चेहरा हवाय? तर अशी वापरा हळदीची पेस्ट)

Note त्वचा आणि केसांसाठी कोणतेही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *