चमकदार दात, सुंदर केसांसह मिळतील हे ६ लाभ; तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार नियमित खा काळे मनुके

Spread the love

​काळ्या मनुक्यांमधील पोषक घटक

  • काळ्या मनुक्यांमध्ये भरपूर प्रमाणात लोह असते
  • यामध्ये अँटी- बॅक्टेरिअल आणि अँटी- व्हायरल गुणधर्म असतात
  • काळ्या मनुक्यांमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स गुणधर्म भरपूर आहेत
  • पोटॅशिअम समृद्ध
  • दात चमकदार राहण्यास मदत मिळते

(जास्त राग येणं हे सुद्धा आहे पित्त वाढण्याचे लक्षण, उपाय म्हणून काय खावं व खाऊ नये? जाणून घ्या)

काळ्या मनुक्यांचे सेवन केल्याने कोणते लाभ मिळतात, हे जाणून घेऊया…

​शरीराला लोहाचा होतो पुरवठा

तुमच्या शरीरात रक्ताची कमतरता निर्माण झाली असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपल्या आहारामध्ये काळ्या मनुक्यांचा समावेश करावा. काळ्या मनुक्याच्या सेवनामुळे शरीराला लोहाचा पुरवठा होतो. यामुळे शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी संतुलित राहण्यास मदत मिळते आणि रक्ताचीही कमतरता भरून निघते. तसंच यामुळे रक्तदाबाचीही समस्या नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.

(Health Tips पोट आरामात जाईल आतमध्ये, फक्त नियमित करा हे ५ एक्सरसाइज)

​मुरुमांची समस्या होते दूर

चेहरा, खांदे आणि पाठीवर मुरुम असतील तर नियमित स्वरुपात काळ्या मनुक्यांचे सेवन करावे. कारण यामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. हे घटक त्वचेशी संबंधित विकार नष्ट करण्याचे प्रयत्न करतात तसंच हानिकारक बॅक्टेरियांविरोधातही लढतात. त्वचेसाठीही काळे मनुके लाभदायक आहेत. काळ्या मनुक्यांचे पाणी प्यायल्याने शरीर योग्य पद्धतीने डिटॉक्स होते. यामुळे बद्धकोष्ठता, पोटाशी संबंधित समस्याही कमी होतात.

(सॅनिटायझर बर्न्स टाळणे शक्य, तज्ज्ञांच्या माहितीनुसार ‘या’ खबरदारी बाळगणे आवश्यक)

​केसगळतीची समस्या

केसगळतीच्या समस्येमुळे त्रस्त असलेल्या महिलांनी नियमित काळ्या मनुक्यांचे सेवन करावे. यामुळे केसगळतीची समस्या दूर होण्यासह केसांची वाढ देखील चांगली होते. काळ्या मनुक्यामधील औषधी गुणधर्मामुळे केसांचा नैसर्गिक काळा रंग देखील टिकून राहण्यास मदत मिळते.

(सायकलिंगला सुरुवात करताय? मग आरोग्यासाठी या गोष्टींची खबरदारी घेणे आवश्यक)

​हाडे होतात बकळट

हाडांना बळकटी देण्यासाठी नियमित काळ्या मनुक्याचे सेवन करणं लाभदायक ठरू शकते. कारण यामध्ये पोटॅशिअम आणि कॅल्शिअमची मात्रा भरपूर असते. यामुळे शरीराच्या हाडांची घनता कमी होत नाही आणि शरीरातील कॅल्शिअमची कमतरता देखील भरून निघते. एकूणच शरीराची हाडे मजबूत होण्यास मदत मिळते.

(घोरण्याच्या समस्येपासून हवीय सुटका? झोपण्यापूर्वी या आयुर्वेदिक तेलांचा करा उपयोग)

​चमकदार दात

  • दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी आणि तोंडाचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी नियमित एक ते दोन चमचे किंवा मूठभर काळे मनुके नीट चावून खावेत. काळ्या मनुक्यांमध्ये असणारे फायटो-केमिकल्स किडण्यापासून दातांचे संरक्षण करतात.

(सर्दी व खोकल्यापासून आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय ठरतील उपयुक्त)

  • तसंच कोलेस्ट्रॉलची समस्या दूर करण्यासाठी नियमित काळे मनुके खाणे फायदेशीर ठरेल. कारण यामध्ये पॉलिफेनॉल्स मोठ्या प्रमाणात असते, जे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्याचे कार्य करतात.

(भात खाल्ल्याने शरीरावर होतात हे परिणाम, किती प्रमाणात सेवन करणं ठरेल आरोग्यासाठी योग्य?)

NOTE डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आहारामध्ये मनुक्यांचा समावेश करावा.


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *