चमकदार व नितळ त्वचेसाठी गाजराचा असा करा वापर, जाणून घ्या फेस पॅक तयार करण्याची योग्य पद्धत

Spread the love

त्वचा सुंदर आणि नितळ दिसावी, यासाठी पौष्टिक आहाराचे सेवन करणंही तितकेच गरजेचं आहे. आरोग्य निरोगी असेल तर चेहऱ्यावरही तेज दिसते. कमकुवत शरीराची लक्षणे त्वचेवरही दिसून येतात. नैसर्गिक सौंदर्यासाठी शरीर आतील बाजूनं स्वच्छ आणि निरोगी असणं आवश्यक आहे. ब्युटी प्रोडक्ट किंवा स्किन केअर रुटीनप्रमाणे डाएटमध्ये पौष्टिक पदार्थांचाही समावेश करावा.

आवश्यकतेनुसार त्वचेची देखभाल

 • ज्याप्रमाणे बदलत्या हवामानानुसार आपण आपल्या आहारामध्ये योग्य ते बदल करत असतो, त्याचप्रमाणे त्वचेचीही काळजी घेणे आवश्यक आहे. त्वचेशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी नैसर्गिक-आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचा तसंच फळे-भाजीपाल्यांचीही बरीच मदत लाभते.
 • बदलत्या ऋतुनुसार वेगवेगळ्या भाज्या आणि फळे बाजारात उपलब्ध होतात. त्यांचे योग्य प्रमाणात सेवन केल्यास आरोग्यास पोषण तत्त्वांचा पुरवठा होतो. फळ आणि भाज्यांच्या सेवनामुळेही चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येण्यास मदत मिळते. यापासून तुम्ही फेस पॅकही तयार करून वापरू शकता.

​त्वचा उजळण्यासाठी फेस पॅक

चमकदार, निरोगी आणि नितळ त्वचा हवी असल्यास हिवाळ्यामध्ये गाजर खाणे फायदेशीर ठरू शकते. नैसर्गिक फेस पॅक द्वारे त्वचा कशी उजळावी, याबाबतची माहिती आपण या लेखाद्वारे पाहणार आहोत. आयुर्वेदिक – नैसर्गिक उपचारांद्वारे त्वचा चमकदार होते. शिवाय आपल्या त्वचेला दीर्घकाळासाठी लाभ मिळतात.

(अनुष्का शर्माच्या सौंदर्याचं सीक्रेट, फॉलो करतेय ‘या’ स्किन केअर टिप्स)

​त्वचेचा कोरडेपणा दूर करण्यासाठी

कोरड्या त्वचेच्या समस्येमुळे चेहरा रूक्ष आणि निर्जीव दिसतो. ही समस्या दूर करण्यासाठी गाजर आणि मध एकत्र घ्या व हायड्रेटिंग मॉइश्चराइझर तयार करा. हे मॉइश्चराइझर तयार करण्याची विधि

सामग्री : अर्धा चमचा मलई, दोन चमचे किसलेले गाजर, एक चमचा मध

 • एका वाटीमध्ये वरील सर्व सामग्री एकत्र घ्या आणि फेस पॅक तयार करा. फेस पॅक लावण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुऊन घ्या. जेणेकरून त्वचेवर जमा झालेले धूळ,मातीचे कण स्वच्छ होतील. त्वचेवरील रोमछिंद्रामधील दुर्गंध सुद्धा स्वच्छ होईल. चेहरा धुतल्यानंतर फेस पॅक लावा.
 • २० मिनिटांपर्यंत पॅक चेहऱ्यावर लावा. यानंतर हलक्या हाताने चेहरा रगडून फेस पॅक काढा. थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुऊन घ्यावा आणि मॉइश्चराइझर देखील लावा. आठवड्यातून कमीत कमी चार वेळा हे फेस पॅक लावा.

(मेकअपविनाही मौनी रॉयचा चेहरा दिसतो चमकदार, डागविरहित त्वचेसाठी करते हा सोपा उपाय)

​पिंपल कमी करण्यासाठी

हिवाळ्यात चेहऱ्यावर वारंवार पिंपल येत असल्यास गाजर आणि दालचिनी पावडरचे फेस पॅक तयार करा.

सामग्री : दोन चमचे किसलेले गाजर, किंचितशी दालचिनी पावडर, एक चमचा मलई, पाच थेंब गुलाब पाणी

 • वाटीमध्ये सर्व सामग्री एकत्र घ्या. फेस पॅक तयार झाल्यानंतर २० मिनिटांसाठी चेहऱ्यावर लावा. चेहरा धुतल्यानंतर टोनरचाही उपयोग करावा. ग्रीन टी टोनरचा वापर केल्यास उत्तम.
 • यामुळे त्वचेवरील रोमछिद्रे बंद होण्यास मदत मिळेल. पिंपल्समुळे त्वचेवर येणारी खाज कमी होईल आणि हानिकारक बॅक्टेरिया देखील समूळ नष्ट होण्यास मदत मिळेल.

(‘लेझर हेअर रीमूव्हल’बद्दल गैरसमज व तथ्य)

​चेहऱ्यावरील ग्लो वाढवण्यासाठी फेस पॅक

त्वचेवरील ग्लो वाढवण्यासाठी आपण गाजर आणि गुलाब पाण्याचे फेस पॅक वापरू शकता.

सामग्री : दोन चमचे गुलाब पाणी, दोन चमचे किसलेले गाजर, एक चमचा बेसन, अर्धा चमचा मलई

 • एका वाटीमध्ये वरील सर्व सामग्री एकत्र घ्या. हे फेस पॅक २० मिनिटांसाठी लावून ठेवा. पेस्ट सुकल्यानंतर हलक्या हाताने चेहरा रगडून पॅक काढा. यानंतर थंड पाण्याने त्वचा स्वच्छ धुऊन घ्या.
 • यानंतर कापसाच्या मदतीने चेहऱ्यावर टोनर लावा. त्वचा कोरडी झाल्यासारखे वाटत असल्यास कोरफड जेल किंवा एखादे मॉइश्चराइझर लावा. हवे असल्यास आपण बदामाच्या तेलाने मान आणि चेहऱ्याचा हलक्या हाताने मसाजही करू शकता.

(करीना कपूरच्या सौंदर्याचं सीक्रेट, जाणून घ्या तिचं ब्युटी केअर रूटीन)

​हिवाळ्यात फेस पॅक लावण्याचे फायदे

हिवाळ्यामध्ये त्वचेची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. हिवाळ्यामध्ये निस्तेज, निर्जीव आणि कोरड्या त्वचेची समस्या निर्माण होऊ नये, यासाठी फेस पॅक लावणे आवश्यक आहे.

गाजर फेस पॅकचे त्वचेसाठी फायदे :

 • त्वचेवरील मृत पेशी काढण्यासाठी लाभदायक
 • त्वचेतील ऑक्सिजन आणि रक्त प्रवाह वाढण्यास मिळते मदत
 • त्वचेला व्हिटॅमिन आणि खनिजांचा पुरवठा होतो
 • त्वचेचा रूक्षपणा कमी होतो
 • त्वचा हायड्रेट आणि मऊ राहते

(Natural Skin Care त्वचा उजळण्यासाठी आयुर्वेदिक उपचार, घरच्या घरी असे तयार करा फेस पॅक)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *