चहाव्यतिरिक्त असा करा आल्याचा वापर, आरोग्यास मिळतील अगणित लाभ!

Spread the love

आलं (benefits of ginger) एक प्रकारचं कंदमुळ आहे. म्हणजेच आलं हे जमिनीच्या खाली उगवणा-या भाज्या आणि फळांच्या श्रेणीत मोडणारं एक कंद आहे. जसं की बटाटा, रताळ, भुईमुग इत्यादी. आलं हे एक नैसर्गिक औषध व मसाला मानलं जातं. साधारणत: आल्याचा गरमा गरम कडक चहा आणि मांसाहारी पदार्थांची फोडणी आल्याशिवाय अपूर्णच राहते. मसाल्यांमधील महत्वाचा घटक म्हणून आले ओळखले जाते. आल्यातील फेनोलिकमुळे अपचन, पित्त आणि छातीतील जळजळीपासून आराम मिळतो. बाराही महिने घरात उपलब्ध असलेले आणि अगदी सहजरित्या बाजारात मिळणारे आले (ginger) हे आपल्या लाखो दुखण्यांवर रामबाण उपाय आहे. आयुर्वेदात देखील आल्याला अनन्यसाधारण महत्व आहे.

प्रत्येक त्या घरात ज्या घरात आई आहे, ती आपल्या घरातील कोणत्याही व्यक्तीस खोकला, सर्दी-पडसे झाल्यास आल्याचा गरम गरम कडक काढा (ginger juice) करून देते. जेणे करून त्या व्यक्तीच्या घशातील खवखव दूर व्हावी आणि त्याला शांत झोप लागावी. म्हणूनच आल्याचा आहारातून किंवा मग चहातून (ginger tea) कोणत्याही मार्गाने रोजच्या आयुष्यात वापर केल्याने तुम्हाला स्वत:ला शरीरात भरपूर फरक जाणवू लागतील.बायोअ‍ॅंक्टिव घटकांनी आणि पोषक तत्वांनी संपूर्ण असलेले आले हे माणसाच्या शरीरासाठी आणि मेंदूसाठी लाभदायक असतं. इथे तुम्हाला आम्ही चहाव्यतिरिक्त आल्याचा कसा वापर करु शकता याची माहिती देणार आहोत. खाद्यपदार्थांसोबतच आलं सौंदर्य प्रसाधनांमध्येही वापरले जाते.

सर्दी-पडस्यापासून आराम

आलं आपल्यातील गुणधर्मांनुसार खूपच उष्ण असतं. यामध्ये अॅंटीबॅक्टेरियल गुणधर्मही मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे थंडीच्या काळात होणा-या सर्दी-पडस्यापासून आलं आराम मिळवून देतं. ज्या लोकांचा घसा अधिक संवेदनशील असतो, म्हणजेच धुळ किंवा थंडी, एसीमध्ये बसल्याने त्रास सुरु होतो त्या लोकांनी दररोज व प्रत्येक ऋतूमध्ये मर्यादीत प्रमाणात आल्याचं सेवन करावं. यामुळे घशात खवखव, वेदना व सूज अशा समस्या उद्भवणार नाहीत. शिवाय ज्या लोकांना टॉन्सिल्सचा त्रास आहे त्यांनीही आल्याचं सेवन जरुर करावं.

(वाचा :- बहुतांश लोकांना माहितच नाही पेरूच्या पानांचा वापर करण्याची ‘ही’ योग्य पद्धत!)

स्नायूंच्या व शरीराच्या वेदनांपासून मुक्ती

व्यायामानंतर तुम्हाला स्नायूंच्या दुखण्याचा त्रास होत असेल तर आल्याच्या वापराने तुम्ही हा त्रास चुटकीसरशी दूर करू शकता. जर व्यायामामुळे तुमचे कोपर दुखत असेल तर दररोज २ ग्रॅम आल्याचं सेवन करून स्नायूंंचे दुखणे दूर करू शकता. आलं हे एक नैसर्गिक पेनकिलर आहे. जर तुम्हाला शारीरिक वेदना, थकवा किंवा आळस जाणवत असेल तर तुम्ही दूध किंवा चहामध्ये आल्याचा वापर करुन त्याचे सेवन करु शकता. आल्यात नैसर्गिकरित्या एनाल्जेसिक असतं जे वेदनानिवारक असतं. यामुळे शारीरिक वेदना, डोकेदुखी, थकवा, आळस दूर करण्यास आलं अत्यंत लाभदायक असतं.

(वाचा :- ‘या’ ५ खास कारणांमुळे हिवाळ्यात केले जाते शेंगदाण्यांचे अधिक प्रमाणात सेवन!)

मासिक पाळीतील वेदना कमी करण्यास व तापावर प्रभावी

सर्वच महिला मासिक पाळीच्या काळात असह्य वेदनांमधून जात असतात. पण आल्याच्या पावडरचं सेवन केल्याने या त्रासातून काही प्रमाणात सुटका मिळते. यासाठी दररोज न चुकता मासिक पाळीमध्ये एक ग्रॅम आल्याची पावडर खावी जेणे करून ओटीपोटात दुखणे, स्नायू दुखणे आणि अतिरक्तस्त्रावापासून आराम मिळतो. ब-याचदा आलं टाकलेला गरमा गरम चहा किंवा आलं टाकून केलेल्या को-या चहात लिंबू पिळून प्यायल्यानेही मासिक पाळीतील वेदना कमी होऊ शकतात. तसेच अनियमित मासिक पाळी,पोटदुखीसाठी आले टाकून उकळलेले पाणी दिवसातून तीनवेळा घ्यावे. आयुष मंत्रालयानेही करोना व साथीच्या रोगांपासून दूर राहण्यासाठी व रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आल्याच्या सेवनाचा सल्ला दिला आहे. कारण आल्यात अ‍ॅटीबॅक्टेरियल, अ‍ॅंटीव्हायरल व अ‍ॅंटीफंगल गुणधर्म असतात.

(वाचा :- कोणत्याही वयातील व्यक्तीचा गुडघ्याचा आजार एकपाद सुप्तवज्रासन करतं ठणठणीत बरा!)

असा करा आल्याचा वापर

चहा व दुधात घालून आल्याचा वापर करणं आपल्या देशात एक सामान्य गोष्ट आहे. पण भाजी, कोशिंबीर व चटणी बनवण्यासाठी देखील आपण आल्याचा वापर करु शकतो. यासाठी आल्याची बारीक पेस्ट बनवून त्याचा वापर करावा. सुकलेल्या आल्याला सुंठ बोलतात. जर तुम्ही उन्हाळा व पावसाळ्यातही आल्याचा वापर करु इच्छित असाल तर तुम्ही ते सुंठ पावडरच्या रुपात स्टोर करुन ठेऊ शकता.

(वाचा :- डोकेदुखीचा त्रास होतोय? मग त्यामागे असू शकतात ‘ही’ कारणं!)

सांधे व गुडघेदुखीवर रामबाण

तुम्ही हल्ली सतत आजुबाजूच्या लोकांकडून ऐकतच असाल की, गुडघे दुखतायत, हात दुखतायत वगैरे वगैरे. कारण हल्ली कोणत्याही वयातील व्यक्तीला गुडघेदुखी होऊ लागली आहे. सांधेदुखी किंवा सांध्यांमध्ये अवघडलेपण येणं हा खूपच सामान्य आजार किंवा दुखणं आहे. या दुखण्यावर काहीच उपाय नसला तरी एका रिसर्च अनुसार काही लोकांनी गुडघेदुखी आणि सांधेदुखावर आल्याचा अर्क घेतला होता आणि त्या लोकांना त्याचा चांगला परिणाम झाल्याचा अनुभव आला होता. तसेच आलं, लाल मिरच्या, दालचिनी आणि तिळाचे तेल मिक्स करून लावल्यास सांधेदुखीपासून आराम मिळतो.

(वाचा :- खास हिवाळ्यात खा ‘हे’ ६ प्रकारचे भजी, चटपटीत असण्यासोबतच पचनक्रियाही करतात सुरुळीत!)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *