चारचौघात मुलांवर हात उगारताय? मग थांबा, नाहीतर मुलांवर होतील ‘हे’ वाईट परिणाम!

Spread the love

मुलंही तशीच वागतात

जेव्हा पालक मुलाला सार्वजनिकपणे ओरडतात किंवा त्यांच्यावर हात उचलतात तेव्हा मुलही तसेच वागण्याचा प्रयत्न करते. त्याच्या मते आपले पालक असे वागतात म्हणजे हा मार्ग योग्य आहे असे त्यांना वाटते. मुल हे आपल्या पालकांचेच अनुकरण करते हे तर आजवर अनेकदा सिद्ध झालेले आहे. कधी कधी मुले या अपमानाचा बदला इतरांवर काढतात आणि आपल्या पेक्षा कमी ताकदवान मुलांना लक्ष्य करून जे पालक चार चौघात त्यांच्याशी वागले अगदी तसेच वागतात. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांशी असे वागणे सहसा टाळावे.

(वाचा :- अयोग्य बेबी प्रोडक्ट्समुळे मुलांचं होऊ शकतं नुकसान, कशी व काय काळजी घ्यावी?)

लाज वाटते

आपल्या आई वडिलांनी सगळ्यांसमोर आपल्याला मारल्याने किंवा ओरडल्याने त्याचा सर्वात मोठा परिणाम मुलांवर होतो तो म्हणजे त्यांना त्या गोष्टीची खूप शरम वाटते. या गोष्टीमुळे हसत्या खेळत्या मुलाच्या वागणुकीत देखील फरक दिसून येऊ शकतो. आपल्या आई वडिलांनी सगळ्यांसमोर आपला अपमान केला ही भावना लहान मुलाच्या मनात सुद्धा घर करू शकते आणि सतत तेच विचार मनात येत असल्याने मुलाच्या मनात न्यूनगंड निर्माण होऊ शकतो. त्याच्या मनावर मोठा मानसिक परिणाम होऊ शकतो. अशा स्थितीत अनेकदा मानसोपचारतज्ञाची देखील मदत घ्यावी लागू शकते.

(वाचा :- मुलांना दिवसभर ठेवायचं आहे एनर्जेटिक? मग खाऊ घाला ‘ही’ खास डिश!)

विश्वास संपतो

अशा गोष्टींमुळे मुलाच्या मनात आई वडिलांबाबत असलेला विश्वास संपून जातो आणि ही गोष्ट कोणत्याही नात्यासाठी घातक ठरू शकते. त्यामुळे सहसा मुलांना चार चौघांत ओरडणे टाळावे. जर मुलाचा या नात्यातील विश्वास संपला तर तो कधीच पुन्हा तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही. हा एक प्रसंग तुम्हाला कायमचा त्याच्यापासून दूर करू शकतो. त्यामुळे या गोष्टीची काळजी घ्या आणि त्याला समजून घेऊ सार्वजनिकपणे त्याच्यावर ओरडणे, हात उगारणे टाळा.

(वाचा :- मुलांना टिव्ही व मोबाईलपासून ठेवायचं आहे दूर? मग खालील टिप्स नक्की ट्राय करा!)

मानसिक परिणाम

या प्रसंगामुळे कोणत्याही मुलावर मानसिक परिणाम हा सहज होऊ शकतो. अनेकदा असेही होऊ शकते की दुसऱ्याच्या चुकीमुळे किंवा गैरसमजामुळे मुलाला या प्रसंगाला सामोरे जावे लागते आणि ही गोष्ट अधिक घातक ठरते कारण आपण जे केलंच नाही त्याबद्दल आपला अपमान झाला ही भावना मुलाच्या मनात सतत सलत राहते. यामुळे मुलाच्या मनात आई वडिलांविरुद्ध अनेक वाईट विचार येऊ शकतात. जर मुलं आधीपासूनच मानसिकदृष्ट्या कमजोर असतील तर ती अधिकच खचून जाऊ शकतात. अपमान ही अशी गोष्ट आहे जी अनेकांना आत्महत्येस प्रवृत्त करू शकते व लहान मुले सुद्धा यातून सुटलेली नाहीत. अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेतज्यात लहान मुलांनी अपमान सहन न झाल्याने आत्महत्येचे किंवा घरातून पळून जाण्याचे पाऊल उचलले आहे. त्यामुळे मुलाशी सहसा या प्रकारे वागू नये.

(वाचा :- मुलांना कोणत्या वयात व कशा पद्धतीने खाऊ घालावेत कांद्याचे पदार्थ?)

अशावेळी काय करावे?

अशावेळी फार काहीही न करता पालकांनी शक्य तितके शांत राहावे आणि समजूतदारपण दाखवून मुलाला समजावे किंवा शांत राहून मग घरी गेल्यावर कठोर भाषेत त्याची कानउघडणी करावी. घरात मुलांना ओरडा खायची सवय असतेच त्यामुळे त्या गोष्टीचा त्यांच्या मनावर जास्त परिणाम होत नाही. पालकांनी सार्वजनिकपणे आणि चार चौघात मुलांना ओरडणे टाळावे. जुने जाणते लोक नेहमी म्हणतात की मुलांच्या कलाने घ्यावे आणि ही गोष्ट खरी आहे. लहान मुलांच्या कलानेच घ्यावे एका विशिष्ट वयापर्यंत त्यांना गोष्टी कळू लागल्यावर ती स्वत:च शहाण्यासारखी वागू लागतात.

(वाचा :- मुलांना हेल्दी सवयी कशा लावाव्यात याविषयी ऋजूता दिवेकरने दिला सल्ला!)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *