चालण्याचा व्यायाम कोणत्या वेळेस करणं आरोग्यास असते अधिक फायदेशीर? जाणून घ्या

Spread the love

चालण्याचा व्यायाम योग्य पद्धतीने केल्यास आपल्या आरोग्याला कित्येक लाभ मिळतात. तुम्ही देखील चालण्याचा व्यायाम करता का? नाही… तर मग हा साधा आणि सोपा व्यायाम नियमित करण्यास सुरुवात करा. या व्यायामामुळे मधुमेह आणि हृदय विकार यासारखे गंभीर आजार दूर ठेवण्यास मदत मिळते. या एक्सरसाइजमुळे आपले शरीर फिट राहते. काही कारणास्तव लोकांना जीममध्ये जाऊन वर्कआउट करणं शक्य नसते.

अशा लोकांसाठी ‘चालणे’ हा एक उत्तम व्यायाम प्रकार आहे. जेवणानंतर काही अंतर चालल्यास शारीरिक आणि मानसिक आरोग्याला कित्येक लाभ मिळतात, अशी माहिती नुकत्याच करण्यात आलेल्या एका संशोधनाद्वारे समोर आली आहे. चालण्याचे फायदे, दररोज किती चालणे आवश्यक आहे आणि महत्त्वाचे म्हणजे चालण्यासाठी सर्वात योग्य वेळ कोणती? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया.
(अक्षय-ट्विंकलच्या घराला दिलेली डिंपल यांची पहिली भेट ‘या’ पदार्थामुळे चांगलीच राहिली आठवणीत)

​चालण्याच्या व्यायामासाठी सर्वात योग्य वेळ

दिवसभरात कोणत्याही वेळी चालण्याचा व्यायाम करणं शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी चांगलेच असतं. पण विशेषत: जेवणानंतर चालणे फिटनेस आणि मधुमेह नियंत्रणात राहण्यासाठी अधिक चांगले मानले जाते. तसंच ज्यांना कोणताही आजार नाही, अशा व्यक्तींनी भविष्यात आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ नये; यासाठी खबरदारी म्हणून नियमित चालावे.

(Navratri 2020 उपवासाच्या फराळामध्ये ‘या’ खिरीचा करा समावेश, जाणून घ्या मोठे फायदे)

​फिटनेससाठी चालण्याचा व्यायाम

योग्य पद्धतीने चालण्याचा व्यायाम (Walking Exercise Benefits) केल्यास आपल्या शरीराची चयापचयाची क्षमता सुरळीत सुरू राहते. नियमित जितका वेळ तुम्ही चालता तितक्या जलद गतीने कॅलरी घटण्यास मदत मिळते. शरीर फिट ठेवण्यासाठीचा हा सोपा व्यायाम प्रकार आहे. याव्यतिरिक्त तुमच्या रक्तातील शर्करा देखील नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.

(मधुमेह होण्याची नवी कारणे? जाणून घ्या डॉक्टरांनी सांगितलेली संशोधनातील महत्त्वाची माहिती)

​संशोधनातील माहिती

२०१६ मधील एका अभ्यासानुसार, जेवणानंतर किमान १० मिनिटांसाठी चालण्याचा व्यायाम करावा. यामुळे टाइप 2 मधुमेहाने ग्रस्त असणाऱ्या रुग्णांच्या रक्तातील शर्करेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. दिवसभरात अर्धा तास चालण्याचा व्यायाम करण्यापेक्षा जेवणानंतर केवळ १० मिनिटे चालणे शरीरासाठी अधिक फायदेशीर असते, असे तज्ज्ञांचं म्हणणे आहे.

(इंटरव्ह्यू आणि परीक्षेला जाण्यापूर्वी तुम्हालाही ‘हा’ त्रास होतो का? जाणून घ्या कारण)

​चालण्यामुळे रक्तातील शर्करा कशी नियंत्रणात राहते?

जेव्हा तुम्ही चालता किंवा अन्य कोणतेही एक्सरसाइज करता, त्यावेळेस तुमचा हार्ट रेट वाढतो आणि स्नायू शरीरातील कार्बोहायड्रेट आणि शर्करेचा ऊर्जेच्या स्वरुपात उपयोग करण्यास सुरुवात करतात. कार्बोहायड्रेटयुक्त भोजनाच्या सेवनामुळे रक्तातील शर्करेचे प्रमाण वाढते. ही शर्करा रक्तातून बाहेर काढण्याचे कार्य इंसुलिन करते. रक्त शर्करा नियंत्रणात असल्यास शरीर फिट राहण्यास मदत मिळते.

(Global Hand Washing Day शेकडो वर्षांपूर्वी सुरू झाली होती स्वच्छतेची मोहीम, आजही ठरते)

​नियमित किती तास व्यायाम केला पाहिजे?

नियमित किती आणि कोणत्या प्रकारचे व्यायाम करावे, याच्याशी संबंधित अनेक नियम आहेत. तज्ज्ञमंडळींकडून याबाबतची योग्य माहिती आणि मार्गदर्शन घ्यावे. त्यांच्या मार्गदर्शनानुसार व्यायामांचा सराव करावा. कारण आपल्या आरोग्याच्या समस्या आणि गरजांनुसारच कोणते एक्सरसाइज करावेत, याचा सल्ला ट्रेनर देतात.

(Health Care Tips न्युट्रिशनिस्टकडून जाणून घ्या कोणते डाएट फॉलो केल्याने दूर)

नियमित व्यायाम करावा

अमेरिकन हार्ट असोसिएशननुसार, दर आठवड्याला १५० मिनिटे एरोबिक एक्सरसाइज करावे. प्रत्येक दिवशी कमीतकमी २० मिनिटे चालण्याचा व्यायाम करावा. यामुळे हृदय विकार आणि टाइप २ मधुमेहाचा धोका कमी होण्यास मदत मिळते. सोबतच हाडे देखील बळकट होतात. चालण्यासोबतच नियमित पौष्टिक आहाराचेही सेवन करावे.

(अंडे की पनीर, कोणता पदार्थ आहे प्रोटीनचा उत्तम स्रोत? जाणून घ्या माहिती)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *