चेहऱ्यावर येईल इन्स्टंट ग्लो, मऊ व चमकदार त्वचेसाठी घरच्या घरी असं तयार करा फेस वॉश

Spread the love

DIY फेस वॉश तयार करण्यासाठी सामग्री

  • कोरफड जेल – एक चमचा
  • बदाम तेल – अर्ध चमचा
  • एसेंशिअल ऑइल – दोन थेंब
  • कॅस्टिल (Castile) लिक्विड सोप – १५ एमएल
  • पाणी – १५ एलएल

(Skin Care Tips तारक मेहतामधील ‘बबीता’ त्वचेची अशी घेते काळजी, शेअर केलं ब्युटी सीक्रेट)

​फेस वॉश तयार करण्याची विधि –

  • एका स्वच्छ बाउलमध्ये पाणी घ्या. त्यामध्ये कॅस्टिल लिक्विड सोप मिक्स करा.
  • यानंतर पाण्यामध्ये एक चमचा कोरफड जेल आणि अर्धा चमचा बदामाचे तेल मिक्स करा.
  • सर्वात शेवटी एसेंशिअल ऑइलचे दोन थेंब पाण्यात टाकावेत.
  • तुमचे घरगुती फेस वॉश तयार आहे.
  • हे फेस वॉश एका स्प्रे बॉटलमध्ये भरा आणि त्याचा वापर करा.

(घरात राहूनही चेहरा टॅन झाल्यासारखा वाटतोय? जाणून घ्या दालचिनी फेस पॅकचा कसा करायचा वापर)

​होममेड फेस वॉशमुळे त्वचेला कसा होतो फायदा?

कॅस्टिल सोप वनस्पती तेलापासून तयार केलं जातं. हे लिक्विड सोप संवेदनशील त्वचेसाठी लाभदायक असते. तर कोरफड जेलमुळे आपल्या चेहऱ्यावरील डाग, मुरुम कमी होण्यास मदत मिळते. या फेस वॉशच्या वापरामुळे आपली त्वचा मऊ आणि चमकदार होते. फेस वॉशमधील एसेंशिअल ऑइलमुळे या घरगुती प्रोडक्टला छान सुगंध मिळतो.

(कोपराच्या रूक्ष व कोरड्या त्वचेपासून कशी मिळवावी सुटका, जाणून घ्या हे ७ नैसर्गिक उपाय)

​कोरफड जेल

कोरफड जेलमुळे आपल्या त्वचेला खोलवर मॉइश्चराइझर मिळते. तेलकट त्वचेची समस्या दूर करण्यासाठी कोरफड जेल लाभदायक मानले जाते. यातील पोषण तत्त्वांमुळे वृद्धत्वाची लक्षणे देखील कमी होण्यास मदत मिळते. कोरफडमध्ये बीटा कॅरोटीन, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई यासारखे अँटी ऑक्सिडंट्स आहेत. हे घटक आपली त्वचा नैसर्गिक स्वरुपात तरुण ठेवण्याचे कार्य करतात. कोरफड जेलच्या वापरामुळे चेहऱ्यावरील मुरुम आणि मुरुमांची समस्याही दूर होण्यास मदत मिळते.

(Natural Remedies चेहऱ्यावरील डागांमुळे आहात त्रस्त? जाणून घ्या या ७ नैसर्गिक सामग्रींची माहिती)

​बदाम तेल

बदामाच्या तेलामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन डी, कॅल्शिअम, पोटॅशिअम, झिंक, लोह, मॅगनिज, फॉस्फोरस आणि ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिडचं प्रमाण भरपूर असते. ही सर्व पोषक घटक आपली त्वचा निरोगी आणि नितळ ठेवण्यास मदत करतात.

(केसगळती रोखण्यासाठी करा हा रामबाण उपाय, महिन्याभरात केसांमध्ये दिसेल आश्चर्यकारक फरक)

NOTE त्वचेशी संबंधित कोणतेही उपाय करण्यापूर्वी किंवा एखादे ब्युटी प्रोडक्ट वापरण्यापूर्वी तज्ज्ञमंडळींचा सल्ला घेणे आवश्यक आहे.


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *