चेहऱ्यावर हवंय नैसर्गिक तेज? जाणून ग्वा-शा मसाजचं तंत्र आणि फायदे

Spread the love

सध्या पारंपरिक मसाज पद्धतींचं महत्त्व वाढत चाललंय. यात विशिष्ट आकार असणाऱ्या दगडांच्या मदतीनं मसाज केला जातो. ग्वा-शा मसाज पद्धत अनेकांसाठी गुणकारी ठरतेय. गेल्या काही महिन्यांत ग्वा-शा मसाज रोलर्सनं मसाज करणाऱ्यांचा आकडा वाढल्याचं तज्ज्ञ सांगतात.

ग्वा-शा थेरपी म्हणजे काय?

जगभरातील प्रसिद्ध डॉक्टरआणि आरोग्यतज्ज्ञ ग्वा-शा थेरपीची शिफासर करतात. पारंपरिक पद्धतीनुसार मान, पाठ, कंबर आणि पायांच्या स्नायूंना आराम मिळण्यासाठी ग्वा-शा तंत्र वापरलं जातं. पण, नजीकच्या काळात चेहऱ्याचा मसाज करण्यासाठी देखील ही पद्धत वापरली जातेय, असं तज्ज्ञ सांगतात. ग्वा-शा मसाजसाठी विविध प्रकारचे खडे, दगड आणि दुर्मिळ स्फटिक वापरले जातात. ग्वा-शा मसाजसाठी आवश्यक असणारे टुल्स बाजारात सहजरित्या उपलब्ध असतात. शिवायऑनलाइन खरेदीही करू शकता.

काय आहेत फायदे ?

 • तज्ज्ञांच्या मते, ग्वा-शा टूल्सचे अनेक फायदे आहेत. या टुल्सचा नियमित वापर केल्यानं चेहऱ्याची त्वचा निरोगी राहण्यास मदत होते.
 • रक्ताभिसरण देखील सुधारतं.
 • त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी ग्वा-शा टुल्स उपयुक्त ठरतं.
 • चेहऱ्याची त्वचा अत्यंत नाजूक असते. अतिरिक्त स्क्रीनटाइममुळे डोळ्यांसोबतच चेहऱ्यावर सुद्धा ताण येतो. तो ताण हलका करण्याचं काम हे तंत्र करतं.
 • त्वचेच्या आतील भागात असणाऱ्या उतींना अडथळा निर्माण करणाऱ्या घटकांना सुरळीत करण्यासाठी ग्वा-शा थेरपीची मदत होते.
 • चेहऱ्याची त्वचा तजेलदार दिसते.

(Winter Hair Tips थंडीमध्ये केस होतात जास्त कोरडे? अशी सात प्रकारे घ्या योग्य काळजी)

काय आहेत फायदे ?

 • तज्ज्ञांच्या मते, ग्वा-शा टूल्सचे अनेक फायदे आहेत. या टुल्सचा नियमित वापर केल्यानं चेहऱ्याची त्वचा निरोगी राहण्यास मदत होते.
 • रक्ताभिसरण देखील सुधारतं.
 • त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी ग्वा-शा टुल्स उपयुक्त ठरतं.
 • चेहऱ्याची त्वचा अत्यंत नाजूक असते. अतिरिक्त स्क्रीनटाइममुळे डोळ्यांसोबतच चेहऱ्यावर सुद्धा ताण येतो. तो ताण हलका करण्याचं काम हे तंत्र करतं.
 • त्वचेच्या आतील भागात असणाऱ्या उतींना अडथळा निर्माण करणाऱ्या घटकांना सुरळीत करण्यासाठी ग्वा-शा थेरपीची मदत होते.
 • चेहऱ्याची त्वचा तजेलदार दिसते.

(Winter Hair Tips थंडीमध्ये केस होतात जास्त कोरडे? अशी सात प्रकारे घ्या योग्य काळजी)

​ग्वा-शा मसाज थेरपीचं वाढतंय महत्त्व

सध्याच्या काळात चेहरा आणि त्वचेच्या आरोग्याकडे अधिक लक्ष पुरवलं जातंय. लॉकडाउनमध्ये कित्येकांना नेहमीप्रमाणे त्वचारोग तज्ज्ञांना भेटता येणं शक्य झालं नाही. कामाचा ताण इत्यादी कारणांमुळे त्वचेकडे दुर्लक्ष झाल्याचं अनेकांनी सांगितलं. टुल्सच्या मदतीनं घरच्या घरी मसाज करणं सोपं असल्यानं बऱ्याच जणांनी या थेरपीचा आधार घेतला. लॉकडाउन काळात बऱ्याच त्वचारोग तज्ज्ञांनी, मेकअप आर्टिस्ट, ब्लॉगर्स यांनी ग्वा-शा थेरपीचं महत्त्व आणि फायदे अधोरेखित केले.

(Papaya For Skin चेहऱ्याचा रंग उजळण्यासाठी असा करा पपईचा वापर, दिसतील आश्चर्यकारक बदल)

​चेहऱ्याचा मसाज करण्यासाठी काही ग्वा-शा थेरपी टुल्स

 • फेस स्कल्पटिंग रोलर
 • जेड फेस रोलर
 • फेस स्कल्पटिंग बार
 • लिफ्ट अँड कॉन्टोर रोलर
 • फेशियल रोलर

(Skin Care Tips तारक मेहतामधील ‘बबीता’ त्वचेची अशी घेते काळजी, शेअर केलं ब्युटी सीक्रेट)

​असा करा मसाज

नैसर्गिक आणि वेदनारहित उपचार अशी या थेरपीची ओळख असून ती घेण्यासाठी वयोगटाची कोणतीही अट नसल्याचं त्वचा तज्ज्ञ सांगतात. टुल्सनं मसाज करण्याआधी चेहऱ्याला सीरम (Skin Care Tips) किंवा एसेंशियल ऑइल लावा. मॉइश्चरायझर आणि शीट मास्क लावून त्यावर ग्वा-शा टुल्स फिरवल्यास अधिक चांगला गुण येईल. लक्षात घ्या चेहऱ्यावर टुल्स फिरवताना दोन्ही बाजूला खालून वरच्या दिशेला (हनुवटीपासून कपाळाकडे) सावकाशपणे पाच वेळा फिरवा.

(कोपराच्या रूक्ष व कोरड्या त्वचेपासून कशी मिळवावी सुटका, जाणून घ्या हे ७ नैसर्गिक उपाय)

​हे देखील लक्षात ठेवा

ग्वा-शा पद्धत गुणकारी असली तरीही टुल्स अथवा रोलर्स चेहऱ्यावर फिरवताना घाई करू नका. चुकीच्या पद्धतीनं रोलर वापरल्यानं चेहऱ्याला इजा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. टुल्स वापरण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. त्वचा आणि चेहऱ्यासाठी कोणत्याही प्रकारचे उपचार घेण्यासाठी अ‍ॅक्युपंक्चर थेरपी देणारे तज्ज्ञ अथवा डॉक्टरांची मदत घ्या. मसाज करण्याचं योग्य तंत्र अवगत असणाऱ्या तज्ज्ञांकडून ग्वा-शा थेरपी घेतल्यास नक्कीच फायदा होईल.

संकलन – तेजल निकाळजे, साठये कॉलेज

(चेहऱ्यावर का लावू नये बॉडी लोशन, काय होऊ शकते नुकसान? जाणून घ्या)

NOTE त्वचेशी संबंधित कोणतेही उपचार करण्यापूर्वी आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

Video : आयुर्वेदिक मुलतानी फेस पॅक


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *