जया बच्चन का म्हणते ऐश्वर्याला बेस्ट मॉम? ऐश्वर्याच्या टिप्स नवोदीत मातांच्या येऊ शकतात कामी!

Spread the love

खरी आई तीच जी आपल्या मुलांचं संगोपन स्वत: करते. त्यासाठी ती इतरांवर अवलंबून राहत नाही आणि ना आपल्या काळजाच्या तुकड्याला दुसऱ्यांच्या हवाली करते. याला बॉलीवूडची स्वप्नसुंदर ऐश्वर्या राय ((Aishwarya rai bachchan) सुद्धा अपवाद नाही. अभिषेक बच्चन (abhishek bachchan) याच्याशी लग्न झाल्यावर ऐश्वर्याने करियर पेक्षा संसाराला जास्त प्राधान्य देण्याचं ठरवलं आणि आराध्याचा (aradhya bacchan) जन्म झाल्यावर तिचा सांभाळ करण्यात ती अधिकच गुंतली. एका मुलाखतीमध्ये तिला हा प्रश्न विचारण्यात आला की, एवढी मोठी अभिनेत्री असून देखील एकट्याने मुलीचा सांभाळ करण्यात तिला कमीपणा वाटत नाही का? आराध्याची जबाबदारी दुसऱ्यावर का सोडत नाही?

तर याला उत्तर देताना ऐश्वर्या राय म्हणते, “आई झाल्यावर या सगळ्या गोष्टी शुल्लक वाटतात. आपलं मुल हेच आपल्यासाठी सर्वस्व असतं आणि आपणच त्याचा सांभाळ केला पाहिजे कारण ते मुल आपली जबाबदारी असतं आणि त्या मुलाला एक चांगली व्यक्ती म्हणून घडवायचं असेल तर ते केवळ त्या मुलाची आईच करू शकते.” तिचं हे उत्तर आजची सर्वच आधुनिक स्त्रियांसाठी आदर्श आहे. ऐश्वर्या स्वत:च आराध्याचा सांभाळ का करते यामागच्या काही टिप्स आपण जाणून घेऊया. ज्या आजच्या आई वर्गाला उपयुक्त ठरू शकतात.

उत्तम संस्कार व्हावे

कोणी कितीही काही म्हणो पण हि गोष्ट तर खरी आहेच की मुलगी हि आपल्या आईकडूनच सगळं शिकते. ऐश्वर्याला हि गोष्ट चांगलीच ठावूक आहे. तिच्यावर चांगले संस्कार व्हावेत हि तिची भावना आहे म्हणून नेहमी तिला स्वत: सोबत फिरवून ती तिला चांगल्या गोष्टी शिकवते. आधुनिक स्त्रियांनी सुद्धा ऐश्वर्यासारखा असा विचार केला पाहिजे.

(वाचा :- ऐन करोनामध्ये आपल्या मुलांचा नाताळ सण असा बनवा खास!)

आराध्याला एकटं वाटू नये

अभिषेक आणि ऐश्वर्या आणि दोघं सेलिब्रिटी आहेत. ते सतत मीडीया आणि चाहत्यांच्या गराड्यात असतात. अशावेळी आपल्या ह्या प्रसिद्धीमुळे आपलं आपल्या मुलीकडे दुर्लक्ष होऊ नये हा ऐश्वर्याचा विचार आहे. जर दुर्लक्ष झालं तर तिच्या मनात एकटेपणाची भावना निर्माण होऊ शकते म्हणून ती नेहमी तिला स्वत: जवळच ठेवते. ऑफिसला जाणाऱ्या पालकांनी याचं महत्त्व समजून आपल्या मुलांनाही असाच शक्य तितका वेळ दिला पाहिजे.

(वाचा :- मुलांचं सर्दी-पडसं व खोकला दूर करण्यासाठी असा बनवा घरगुती काढा!)

आराध्यावरचं प्रेम

आम्ही मगाशीच सांगितलं की आराध्याचे पालक हे सेलिब्रिटी आहेत, त्यामुळे साहजिक त्याचं शेड्युल बिझी असतं. अशावेळेस अभिषेकला शक्य नसल्याने ऐश्वर्या आराध्याला नेहमी स्वत:सोबत नेऊन तिला दाखवून देते की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, काही झालं तरी आम्ही तुला एकटीला सोडणार नाही. हा कोणत्याही पालक आणि मुलाचं नात अधिक घट्ट करणारा सर्वात महत्त्वपूर्ण नियमच आहे अस समजा आणि प्रत्येक पालकाने तो पाळायलाच हवा, कारण तेव्हाच तुमचं मूलं तुमच्याबद्दल मनात सदैव प्रेम बाळगून असतं.

(वाचा :- मुलांना जंक फुड खाऊ घालण्याआधी जाणून घ्या त्याचे गंभीर दुष्परिणाम!)

फॅशन सेन्स

आराध्या हि एक मुलगी आहे ती सुद्धा बच्चन घराण्यातील, त्यामुळे साहजिक तिने कसंही राहिलेलं कोणालाच रुचणार नाही. त्यात तिची आई म्हणजे स्वत: विश्वसुंदरी, म्हणून ऐश्वर्या नेहमी आराध्याला सोबत नेऊन तिच्या मनावर स्टाईल व फॅशनच्या वेगवेगळ्या गोष्टी बिंबवत असते. साहजिक ती उद्या बॉलीवूड पदार्पण करेल त्यामुळे याचा तिला फायदाच होणार आहे. समान्य पालकांनी सुद्धा खास करून आपल्या मुलीला हि गोष्ट शिकवायला हवी. जग बदलतंय त्यानुसार तिला राहायला शिकवलं तर तिच्या मनात कधी न्यूनगंड व भीती निर्माण होणार नाही.

(वाचा :- काही मुलं आईच्या गर्भातच पडतात ‘या’ हृदय रोगाला बळी! बचावासाठी काय काळजी घ्यावी?)

सतत लक्ष असते

ऐश्वर्या आराध्याला स्वत:सोबत नेहमी घेऊन फिरते यामागे तिचा एक छोटा स्वार्थ देखील आहे तो म्हणजे तिला आपल्या मुलीवरचं आपलं नियंत्रण कमी होऊ द्यायचं नाही. याचा अर्थ असा नाही की तिला आराध्याला मुठीत ठेवायचं आहे. पण तिला असं वाटतं की जर माझं माझ्या मुलीवर लक्ष नसेल आणि उद्या ती चुकीच्या गोष्टी शिकली तर? लहान मुलं वाईट गोष्टी पटकन आत्मसात करतात हे सत्य तर कोणीच नाकारू शकत नाही. म्हणून आराध्याने एक चांगली व्यक्ती बनावं यासाठी ऐश्वर्या तिच्यावर नेहमी लक्ष ठेवून असते. मंडळी हि गोष्ट कोणत्याही मुलाच्या बाबतीत किती महत्त्वाची आहे हे तुम्हाला वेगळ्याने सांगायची गरज नाही. तर तुम्ही देखील हि टीप आवर्जून आजपासूनच पाळा.

(वाचा :- मुलांना प्लास्टिकच्या भांड्यात खाऊ घालताय जेवण? मग आरोग्यास होतील ‘हे’ दुष्परिणाम!)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *