जर प्रेग्नेंसीआधीच शरीराला केली ‘या’ व्हिटॅमिन्सची पूर्ती, तर आई बनण्यात येणार नाही बाधा!

Spread the love

प्रेग्नेंसी दरम्यान महिलांना गर्भातील बाळाच्या विकासासाठी संतुलित, सात्विक व पौष्टिक आहार घेणं व स्वस्थ राहणं अनिवार्यच असतंं. पण कंसीव (conceive) करण्याआधीच याची तयारी सुरु करावी लागते. जर तुम्ही सहजपणे कंसीव करु इच्छिता व गर्भावस्थेच्या नऊ महिन्यांमध्ये तुम्हाला स्वत:चं व बाळाचं आरोग्य निरोगी हवं असेल तर याची तयारी तुम्हाला प्रेग्नेंसीच्या आधीपासूनच करणं भाग आहे. हो मंडळी, बॉलीवूड अभिनेत्री करीना कपूरने (kareena kapoor) देखील सांगितलं की, ती ३९ इतक्या मोठ्या वयात आई बनू शकली कारण ती पहिल्यापासूनच निरोगी व सुदृढ होती. शिवाय ती आपल्या डाएटवर (healthy diet in pregnancy) पूर्णत: लक्ष देत होती.

कंसीव करु इच्छिणा-या महिलांनी व पुरुषांनी आपल्या डाएटमध्ये काही बदल करुन काही पोषक तत्वांचा समावेश असलेल्या पदार्थांचा व व्हिटॅमिन्सचा (vitamins) समावेश करणं अत्यंत आवश्यक असतं. हे व्हिटॅमिन्स कंसीव करण्यास मदत तर करतातच, शिवाय गर्भावस्थेच्या नऊ महिन्यांत येणा-या अनेक समस्या व आजारांपासून आई व बाळाचं रक्षण करतात. चला तर जाणून घेऊया त्या व्हिटॅमिन्सची माहिती!

व्हिटॅमिन ‘बी’

व्हिटॅमिन’ बी’ एग्जला हेल्दी ठेवण्यास मदत करतं आणि ओव्युलेट्री इनफर्टिलिटीपासून बचाव करते. व्हिटॅमिन ‘बी’ मुळे पुरुषांच्या स्पर्मची क्वालिटी सुधारते. प्रेग्नेंसीच्या आधी व गर्भावस्थेच्या दरम्यान व्हिटॅमिन ‘बी’९ म्हणजेच फोलिक अ‍ॅसिड जरुरी असतं. पण इतर प्रकारचे व्हिटॅमिन देखील फर्टिलिटी मजबूत करण्यास महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात. नर्सिस हेल्थ स्टडी २ मध्ये दिसून आलं की, व्हिटॅमिन बी१, बी२, बी३, बी४ आणि बी१२ अधिक प्रमाणात घेतल्याने ओव्युलेट्री इनफर्टिलिटीचा धोका कमी होतो.

(वाचा :- डिलिव्हरीनंतर शिल्पा शेट्टीसारखी आकर्षक फिगर हवी असल्यास फॉलो करा तिच्याच डाएट टिप्स!)

व्हिटॅमिन ‘सी’

लवकरात लवकर कंसीव करण्यासाठी मेल पार्टनरचं हेल्दी असणं देखील गरजेचं असतं. व्हिटॅमिन ‘सी’ स्पर्म काऊंड आणि त्याची क्षमता वाढवते. व्हिटॅमिन ‘सी’ एक शक्तिशाली अ‍ॅंटिऑक्सिडंट आहे जे शरीरातील पेशींना नुकसान होण्यापासून वाचवते. यामुळे शरीरात लोहाच्या अवशोषणासही मदत होते. २०१६ साली केलेल्या अनेक अध्ययनांमध्ये असे दिसून आले की, व्हिटॅमिन ‘ई’ सोबतच व्हिटॅमिन ‘सी’ घेतल्याने पुरुषांमध्ये स्पर्मची संख्या, गतिशीलता व कधी कधी डीएनए इंटिग्रेटीमध्ये सुधारणा होते. पुरुषांना रोज ९० मिलीग्रॅम आणि स्त्रियांनी ७५ मिलीग्रॅम व्हिटॅमिन ‘सी’ घेणं आवश्यक असतं.

(वाचा :- डिलिव्हरीनंतर हार्मोन्स संतुलित होण्यासाठी किती वेळ लागतो व संतुलित झाले नाही तर काय करावं?)

कॅल्शियम

कॅल्शियम महिलांसोबतच पुरुषांची फर्टिलीटी देखील मजबूत करते. २०१९ मध्ये झालेल्या एका अभ्यासानुसार कॅल्शियमच्या कमतरतेमुळे पुरुषांमध्ये नपुसंकता होऊ शकते, कारण कॅल्शियम स्पर्मची संख्या वाढवण्यास मदत करते. पुरुष आणि महिलांना दररोज १००० मिलीग्रॅम कॅल्शियम घेणं आवश्यक असते. कॅल्शियम हे गर्भात वाढणाऱ्या बाळाच्या विकसित होणाऱ्या दातांना आणि हाडांना मजबूत ठेवण्याचे काम करते. या शिवाय स्नायू, हृदय आणि नसांच्या विकासात सुद्धा चालना देतात. गरोदरपणाच्या तिसऱ्या तिमाहीती विशेषतः आई आणि बाळ दोघांना कॅल्शियमची मोठ्या प्रमाणात गरज असते. कारण या काळात बाळाच्या हाडांचा अंतिम विकास सुरु असतो. जर गरोदर स्त्रीने कॅल्शियमची गरज भरून काढली नाही तर तिच्यात आणि बाळात हाडांशी संबंधीत आजार म्हणजेच ऑस्टियोपोरोसिसचा धोका वाढत जातो.

(वाचा :- Karwa chauth and pregnancy : एक्सपर्ट्सकडून जाणून घ्या प्रेग्नेंट महिला करवा चौथचं व्रत ठेऊ शकतात की नाही?)

व्हिटॅमिन ‘डी’ व व्हिटॅमिन ‘ई’

कित्येक अध्ययना दरम्यान व्हिटॅमिन ‘डी’ च्या कमतरतेमुळे महिलांमध्ये इनफर्टिलिटी उद्भवत असल्याची गोष्टी समोर आली आहे. २०१९ च्या एका अभ्यासात असं दिसून आलं की, ज्या महिला पॉलिसिस्टिक ओवरी सिंड्रोममुळे आई बनू शकत नाहीत त्यांच्यामध्ये व्हिटॅमिन ‘डी’ ची कमी होती. पुरुष व महिला दोघांच्या प्रजनन कार्यासाठी व्हिटॅमिन ‘डी’ महत्त्वपूर्ण भूमिका निभावते. व्हिटॅमिन ‘ई’ मध्ये अ‍ॅंटीऑक्सिडंट गुणधर्म असतात जे पुरुषांमधील स्पर्मची संख्या वाढवतात आणि महिलांची प्रजनन क्षमता उत्तम करतात. पण यावर अजून काही रिसर्च होण्याची आवश्यता आहे. तर वयस्कर लोकांनी दररोज १५ मिलीग्रॅम व्हिटॅमिन ‘ई’ घ्यायला हवे.

(वाचा :- वयाच्या चाळीशीत करीना कपूर बनते आहे आई! या वयात प्रेग्नेंट राहिल्यास काय धोके उद्भवतात?)

फोलिक अ‍ॅसिड

प्रेग्नेंसी दरम्यानच नाही तर कंसीव करण्यासाठी देखील फोलिक अ‍ॅसिड गरजेचं असतं. यामुळे फर्टिलीटी ट्रिटमेंट यशस्वी होण्याची शक्यताही वाढते आणि बाळामध्ये न्यूरल ट्यूब डिफेक्टचा धोकाही कमी होतो. प्रेग्नेंट महिलांना दररोज ६०० मायक्रो ग्रॅम इतक्या फॉलिक अ‍ॅसिडची आवश्यकता असते. तर सहज व यशस्वीरित्या कंसीव करण्यासाठी महिलांना कमीत कमी दररोज ४०० ते ८०० मायक्रो ग्रॅम फोलिक अ‍ॅसिडची आवश्यकता असते.

(वाचा :- प्रेग्नेंसीतील लठ्ठपणामुळे ‘या’ अभिनेत्री झाल्या होत्या ट्रोल! कशी केली या परिस्थितीवर मात?)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *