जाणून घ्या प्रेग्नेंसीत योनीमध्ये होणा-या वेदनांमागील कारणे व घरगुती उपाय!

Spread the love

योनीत वेदना होण्याची कारणे

गरोदरपणात अनेक कारणांमुळे योनीमध्ये हलक्या ते तीव्र स्वरूपाच्या वेदना दिसू शकतात. त्यापैकी महत्त्वाचे कारण म्हणजे गर्भाशय वाढल्याने योनीमध्ये वेदना होतात आणि ही गरोदरपणातील सामान्य गोष्ट आहे. गर्भात बाळासाठी जागा करण्याच्या उद्देशाने गर्भाशय प्रसरण पावते, आणि त्याचाच दाब आसपासच्या स्नायूंवर पडून वेदना सुरु होतात. गरोदरपणात हार्मोनल बदल दिसून येतात ज्यामुळे योनीत कोरडेपणा निर्माण होतो. याच कोरडेपणामुळे खास करून संभोग करताना वेदना जाणवू शकतात. गर्भात बाळाचा आकार वाढल्याने पेल्विक भागाच्या लिगामेट्समध्ये आकुंचन निर्माण होते. बाळाच्या वजनाचा भार पेल्विकवर पडतो आणि यामुळे योनीत हलक्या वेदना सुरु होतात.

(वाचा :- डिलिव्हरीनंतर प्या हर्बल होममेड ड्रिंक्स, कमजोरी दूर होण्यासोबतच ब्रेस्ट मिल्क वाढेल!)

इतर कारणे

याशिवाय गरोदरपणात योनिच्या बाहेरील बाजूस सुद्धा वेदना निर्माण होऊ शकतात. याचे कारण संक्रमण असू शकते. या व्यतिरिक्त गर्भाशय ग्रीवा उघडल्यावर सुद्धा योनीत जोरदार वेदना सुरु होतात. प्रसूती कळा सुरु होण्याच्या काही आठवडे आधी गर्भाशय ग्रीवा उघडण्यास सुरुवात होते. पेल्विक ऑर्गन पोलेप्समुळे देखील गरोदर स्त्रियांना योनीत वेदना सुरु होतात. यात पेल्विकच्या आतील आणि आसपासचे अंग सुद्धा कधीकधी योनी व गुद्द्द्वाराच्या दिशेने खेचले जातात.

(वाचा :- प्रेग्नेंट महिलांसाठी अमृत आहेत आयरनने परिपूर्ण असलेले ‘हे’ पदार्थ!)

यावर काय उपाय आहेत?

गरोदरपणात योनीमध्ये वेदना सुरु झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घेण्या व्यतिरिक्त असे काही उपाय आहेत जे गरोदर स्त्री वापरू शकते. वेदना सुरु झाल्यास गरोदर स्त्रीने थोडा वेळ खाली बसावे आणि पाय थोडे वर उचलून घ्यावेत. यामुळे योनीवर कमी दाब पडतो. कोमट पाण्याने अंघोळ केल्याने देखील योनीतील वेदना कमी होण्यासोबत अन्य अवयवांच्या वेदना देखील कमी होतात. स्विमिंग आणि योग केल्याने रक्ताभिसारण नीट राहते आणि स्नायू मजबूत होतात. यामुळेच गरोदरपणात स्त्रियांना योग व व्यायाम करण्यास सांगितले जाते.

(वाचा :- डिलिव्हरीनंतर का येते महिलांना डिप्रेशन? जाणून घ्या रामबाण घरगुती उपाय!)

अजून काही उपाय

योनीतील वेदना सतत वाढतच असेल तर डॉक्टरांच्या आणि तज्ञांच्या सल्ल्याने प्रोफेशन व्यक्तीकडून पेल्विकच्या भागाची मालिश करून घ्यावी. यामुळे पेल्विक आणि योनीचे स्नायू मजबूत होतात यामुळे डिलिव्हरी सुद्धा सहज होते. किगेल व्यायाम रोज केल्याने योनीत कमी दबाव पडून वेदना देखील कमी होतात. गरोदरपणात रोज कमीत कमी 30 मिनिटे व्यायाम करावा. या काळात जास्त एक्टीव्ह राहणे गरजेचे असते. गरोदर स्त्री शक्य असल्यास प्रेग्‍नेंसी सपोर्ट बेल्‍ट सुद्धा परिधान करू शकते. यामुळे सुद्धा योनी आणि पेल्विक जवळच्या वेदनेपासून आराम मिळतो.

(वाचा :- बॉलीवूड अभिनेत्रींच्या ‘या’ खास टिप्स वापरून प्रेग्नेंसीमध्ये करा योगाभ्यास!)

काय खबरदारी घ्यावी?

गरोदरपणात अनेक स्त्रियांना घरची कामे करण्याची सवय असते. मात्र यामुळे योनीमधील आणि आसपासच्या भागातील वेदना वाढून अधिक त्रास होऊ शकतो. यासाठीच गरोदरपणात स्त्रील शक्य तितका आराम करण्यासाठी सांगितले जाते. ती जेवढा आराम करेल तेवढ्या तिला वेदना कमी होतील. या काळात जास्त कष्टाचे, ओझे वाहण्याचे काम तर अजिबातच करू नये. असे करून स्त्री स्वत:च वेदनेला आमंत्रण देत असते. कारण अशा कामांमुळे थेट योनी आणि आसपासच्या भागांवर अधिक दाब पडतो. तर मंडळी हा लेख जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून तो स्त्रियांपर्यंत पोहोचेल आणि या कठीण स्थितीला त्या धीराने सामोऱ्या जातील.

(वाचा :- हाय ब्लड प्रेशरमुळे का करावी लागते सिझेरियन डिलिव्हरी? जाणून घ्या नॉर्मल डिलिव्हरीसाठी उपाय!)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *