जुन्या कपड्यांचा असा करा वापर आणि घराला द्या नवा लुक

Spread the love

रामेश्वर जगदाळे
लॉकडाउनमुळे सर्वजण घरी आहेत. या काळात अनेक जण काहीना काही तरी नवीन गोष्टी शिकण्यास प्राधान्य देत आहेत. तर वेळेचा सदुपयोग करण्यासाठी आणि आपल्यातील कल्पकतेला वाव देण्यासाठी जुन्या कपड्यांपासून, आई-आजीच्या साड्या, ड्रेस, दुपट्टे, जीन्सचा वापर करू शकता. यामुळे तुमचा वेळही जाईल आणि क्रिएटीव्ही गोष्टी केल्याचा आनंदही मिळेल.

टाकाऊपासून टिकाऊ

सध्या सगळीकडे मास्कची मोठ्या प्रमाणावर कमतरता आहे. तसंच पुढे कित्येक महिने आपल्याला मास्क वापरणं बंधनकारक असेल. त्यामुळे पुनर्वापर करता होईल आणि घरच्या घरी बनतील असे मास्क बनवू शकता. जुन्या साड्यांचे, टी-शर्ट किंवा इतर कपड्यांचे योग्य प्रमाणात तुकडे करून ट्रेंडी किंवा वेगवेगळ्या प्रकारचे मास्क तयार करू शकता. सध्या बाजारात किंवा ऑनलाइन एकसारखे दिसणारे मास्क उपलब्ध आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या रंगांच्या कपड्याचा वापर करून छान ट्रेंडी आणि वापरण्यास सोयीचे मास्क घरीचं तयार करू शकता.
(KBC १२च्या सेटवरील बिग बी अमिताभ बच्चन यांचा कूल लुक)

घराला द्या वेगळा लूक

गेली अनेक वर्षं किंवा अनेक महिने घरात काही बदल केला नसेल किंवा नवीन गोष्टीची भर घातली नसेल तर मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करत घराला नवा लूक देऊ शकता. आपल्या घरातील वस्तूंमध्ये, वातावरणामध्ये बदल आणल्यास सकारात्मक राहण्यास मदत होते आणि आता त्याची फार गरज आहे. त्यामुळे तुम्ही पडदे, लॅम्प शेल्टर, टेबल कव्हर किंवा टिपॉयचा कपडा अशा अनेक गोष्टी घरच्या घरी डिझाइन करु शकता. वापरात नसलेल्या काठापदराच्या, सिल्क किंवा पैठणी साड्यांचा वापर करुन पडदे बनवू शकता. तसंच घरासाठी छोट्या-मोठ्या गोष्टी तयार करु शकता. अशा रितीनं तुमच्या घराला नवीन लूकही मिळेल आणि बदलामुळे नवीन ऊर्जा मिळण्यासाठी उपयोगी पडेल.
(Fashion Tips जुन्या कपड्यांना नवा लुक द्यायचाय? जाणून घ्या या सोप्या टिप्स)

सुती कापडाचा वापर अधिक


सध्या दिवसागणिक तापमानाचा पार वाढत आहे. घरात असतानासुद्धा हवा खेळती राहावी आणि उन्हाळ्याचा त्रास होऊ नये म्हणून सुती कपड्यांचा वापर करावा. जुन्या सुती कपड्यांवर वेगवेगळ्या प्रकारची कलाकुसर करता येईल. उन्हाळ्यात साधारणपणे लाइट रंगाचे कपडे वापरावे. त्यामुळे गर्मीचा त्रास होत नाही आणि शरीराभोवती हवा खेळती राहते. सुतीच्या कपड्यांनासुद्धा वेगवेगळ्या प्रकारे वापरता येऊ शकतं. सदरे आणि शर्टावर कलाकुसर करु शकता.

घरातल्या लहानग्यांना कपडे

इतरवेळी धावपळीमुळे आणि इतर कामांमुळे आपल्याला घरातल्या पाळीव प्राण्यांकडे लक्ष देता येत नाही. आता मिळालेल्या अनपेक्षित वेळेत तुम्ही त्याच्यासाठी काहीतरी करू शकता. जुने ड्रेस, साडी, शर्ट, टी-शर्ट यांचा वापर करून शेपूटवाल्यांसाठी कपडे डिझाइन करु शकता. यासाठी वेगवेगळ्या रंगाचा आणि प्रकारच्या कापडांचा वापर करु शकता.

पॅचवर्कची कमाल

पॅचवर्कचा वापर हट के डिझाइन करण्यासाठीसुद्धा केला जाऊ शकतो. जुन्या साड्यांना डाग पडला असेल किंवा फाटले असतील तर पॅचवर्क कामाला येऊ शकतं. रंगसंगती बघून साडी, ड्रेस, शर्ट यांच्यामध्ये बदल करू शकता.

(पावसाळ्यात कपाटातील कपड्यांना वास येतो? समस्या दूर करण्यासाठी ७ सोपे उपाय)

लॉकडाउन असलं तरीही घरात उपलब्ध असलेल्या गोष्टी वापरून स्वतःसाठी आणि आपल्या घरच्यांसाठी डिझायनर गोष्टी तयार करू शकतो. यासाठी शिलाई यंत्र हवंच, असं काही नाही. घरी असलेल्या सुई-धागा आणि इतर गोष्टी वापरून तुम्ही डिझाइनर वस्तू बनवू शकता. केला जोपासण्याची आणि नवीन काही तरी करण्याची हीच ती वेळ आहे. ऑनलाइन व्हिडीओ आणि बऱ्याच गोष्टींची मदतसुद्धा घेऊ शकता. – सोनिया सांची, सेलिब्रिटी फॅशन डिझायनर


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *