जॅकेट्सचा स्टायलिश पर्याय, जाणून घ्या हे चार प्रकार

Spread the love

तेजल निकाळजे, साठये कॉलेज
स्टायलिंग करताना तरुणींची पहिली पसंती जॅकेटला असते. जॅकेट तरुणांना भुरळ घालणाऱ्या प्रकारांपैकी एक आहे. सण-उत्सव आणि ऋतूंनुसार जॅकेट्सची फॅशन बदलत असते. फ्रेश फॅशन आणि कूल पेहराव करणाऱ्यांसाठी जॅकेट्समध्ये अप्रतिम व भन्नाट डिझाइन्स बाजारात उपलब्ध असतात. जॅकेट्समध्ये कॅज्युअलपासून ते प्रोफेशनल, ड्रेसी इत्यादी प्रकार असतात. लूकमध्ये कमालीची भर घालणाऱ्या जॅकेट्समध्ये सध्या कोणते प्रकार तरुणांना भुरळ घालत आहेत, याविषयी…

डेनिम जॅकेट्स
डेनिम जॅकेट कायमच ट्रेंडमध्ये असणारा प्रकार आहे. डेनिम जॅकेट्समध्ये असंख्य रंग, नक्षीकाम, पॅचवर्क, पॉम-पॉम, लेस वर्क तरुणींना आकर्षित करतात. फॅशनप्रेमी असणाऱ्या प्रत्येकाकडे किमान एक तरी डेनिम जॅकेट असायलाच हवं, असं फॅशनतज्ज्ञ सांगतात. उठावदार आणि हट के लूकची आवड असणाऱ्यांसाठी डेनिम जॅकेटचा उत्तम पर्याय आहे. डेनिम जॅकेटमधील खालील प्रकार लूकमध्ये भर घालतात.
– क्रॉप डेनिम जॅकेट, अॅसिड वॉश डेनिम जॅकेट, सिक्विन जॅकेट, जर्सी स्लीव्ह जॅकेट, बटरफ्लाय स्लीव्ह जॅकेट, एंजल स्लीव्ह जॅकेट, फर कॉलर जॅकेट, हुडेड डेनिम जॅकेट.
(Traditional Saree पाच प्रकारच्या सुंदर पारंपरिक साड्या)

पारंपरिक जॅकेट्स

ट्रेंडी जॅकेट्समध्ये पारंपरिक भारतीय प्रिंट्स आणि नक्षीकाम असणाऱ्या जॅकेट्सना देखील विशेष मागणी असते. सणसमारंभ अथवा छोट्या-मोठ्या कार्यक्रमांसाठी पारंपरिक जॅकेट्सचा भन्नाट पर्याय आहे. पारंपरिक जॅकेट्ससाठी भारतीय प्रिंट्सना प्राधान्य दिलं जातं. स्टेटमेंट जॅकेटमध्ये पारंपरिक प्रिंट्सची चलती पाहायला मिळते. खालील पारंपरिक कापड प्रकारांमध्ये तयार होणाऱ्या जॅकेट्सना आवर्जून खरेदी केलं जातं.
– सिल्क, कलमकारी, चिकनकारी, वेलवेट, फुलकारी, जयपुरी, खादी, इक्कत, पश्मिना, बांधनी, अज्रक, लेपचा.
(मायलेकीची जोडी! मिशापासून ते आराध्याने परिधान केला होता आईसारखाच पोषाख)

लोकरीचे जॅकेट्स


थंडीसोबतच इतर ऋतूंमध्येही लोकरीचे जॅकेट्स वापरले जातात. लोकरीच्या धाग्यांनी तयार केलेले जॅकेट फॅशनप्रेमींसाठी आकर्षणाचा बिंदू ठरतात. असंख्य प्रकार आणि डिझाइन्सचे भरभरून पर्याय असल्यानं हे जॅकेट्स तरुणांना विशेष आकर्षित करून घेतात. लोकरीच्या जॅकेट्समध्ये लहान मुलामुलींसाठी देखील भरपूर पॅटर्न उपलब्ध असतात. विशेषतः हातानं विणलेले जॅकेट्स परिधान केल्यानं हट के लूक तर येतो. लोकरीच्या जॅकेट्समध्ये पीप्लम आणि पुलोव्हर जॅकेटला विशेष पसंती आहे.
(Radhika Merchant नीता अंबानींच्या होणाऱ्या सूनेचे हे पाच डिझाइनर लेहंगे पाहिले का?)

लाँग श्रग्स जॅकेट्स पर्याय

इतर जॅकेट्सला पर्याय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रग जॅकेट्स या प्रकारचीसुद्धा तरुणींमध्ये विशेष क्रेझ पाहायला मिळते. टू-पीस पेहरावासोबत लाँग श्रग जॅकेट्स घातल्यानं तुमच्या लूकला नक्कीच चार चांद लागतील. याशिवाय जीन्स, स्किन फिट जीन्स, क्रॉप टॉप्स, शॉर्ट पँट्स, प्लाझो, धोती पँट्स यासोबत लाँग श्रग जॅकेट्सच्या स्टायलिंगचं उत्तम गणित जुळतं. श्रग जॅकेट्सला मॅचिंग असे ऑक्सिडाइज्ड अथवा नाजूक नेकपीस किंवा कानातलं घालून आणखी उठावदार लूक करता येतो. श्रग जॅकेट्समध्ये खालील प्रकारांचा जास्त वापर केला जातो.

– साइड स्लिट लाँग श्रग जॅकेट्स, वॉटरफॉल पॅटर्न श्रग जॅकेट्स, लाँगलाइन श्रग जॅकेट्स, कफ्तान श्रग जॅकेट्स, बोलेरो श्रग जॅकेट्स

टिप्स

– जॅकेट आणि श्रग जॅकेट हे एकमेकांना पुरक असे पर्याय आहेत. आऊटफिटचं पॅटर्न आणि गरज लक्षात घेऊन जॅकेट की श्रग जॅकेट घालावं हे ठरवा.

– ओढणी किंवा स्कार्फला विशिष्ट पद्धतीनं गुंडाळून देखील जॅकेटसारखा लूक करता येतो. या प्रकारचे असंख्य व्हिडीओज युट्यूबवर उपलब्ध आहेत.

– लाँग जॅकेट्स स्ट्रेट आणि ए-लाइन कुर्त्यांसोबतही स्टायलिंग करू शकता.

– तुमच्या कपाटात किमान एक तरी स्टेटमेंट जॅकेट असायला हवं. मल्टिकलर्ड स्टेटमेंट जॅकेटची अनेक आउटफिटसोबत मॅच करता येऊ शकतं.

– जुन्या साड्या अथवा ओढण्यांचेही जॅकेट्स शिवून घेण्याचा पर्याय निवडू शकता.


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *