जेनेलियाचे ग्लॅमरस फोटो पाहून चाहते झाले घायाळ, पती रितेशनंही व्यक्त केली अशी प्रतिक्रिया

Spread the love

​जेनेलियाचा सुंदर ब्लेझर ड्रेस

जेनेलिया डिसुझाने इन्स्टाग्राम अकाउंटवर आपले स्टायलिश अवतारातील फोटो शेअर केले आहेत. या फोटोशूटद्वारे जेनेलियाचा ग्लॅमरस लुक चाहत्यांना पुन्हा पाहायला मिळाला. यामध्ये तिनं पिवळ्या आणि काळ्या रंगांचा टु-टोन डबल ब्रेस्टिड ब्लेझर ड्रेस परिधान केल्याचे तुम्ही पाहू शकता. या ड्रेसमध्ये टिपिकल ब्लेझर प्रमाणेच बटण आणि पुढील बाजूस पॉकेट्सचे डिझाइन होतं. हे आउटफिट Selectandyou या फॅशन कंपनीतून खरेदी करण्यात आलं होतं. या कंपनीचं अधिकृत इन्स्टाग्राम पेज पाहिल्यास आपल्याला ट्रेंडी आणि कम्फर्टेबल कपड्यांचे सुंदर कलेक्शन पाहायला मिळेल.

(सारा अली खानवर भारी पडली करीना कपूरची स्टाइल, या ड्रेसमुळे मिळाला मोहक लुक)

​आउटफिटवर मॅच केले स्ट्रॅप हील्स

जेनेलिया डिसुझानं आपल्या सुपर स्टायलिश लुकवर काळ्या रंगाचे स्ट्रॅप हाय हील्स मॅच केले होते. सिंगापूरमधील फास्ट-फॅशन फुटवेअर आणि अ‍ॅक्सेसरीज रिटेलर CHARLES & KEITH कंपनीतून हे हील्स खरेदी करण्यात आले होते. या ब्रँडचे आशिया, युरोप आणि आफ्रिकामध्येही कित्येक स्टोअर्स आहेत. जेनेलियाने या ब्लेझर ड्रेस लुकसाठी मल्टीलेअर्ड चेन विद पेंडेंटची निवड केली होती. तर लाइट टोन मेकअप करत तिनं गालांचा भाग हायलाइट केला होता आणि पोनी टेल हेअरस्टाइल केली होती.

(रब ने बना दी जोडी! विराटच्या वाढदिवशी अनुष्काने परिधान केला होता ‘हा’ सर्वात सुंदर ड्रेस)

​पतीसह चाहते देखील झाले घायाळ

जेनेलियाचे स्टायलिश अवतारातील फोटो पाहून पती रितेश देशमुख (Riteish Deshmukh) देखील घायाळ झाला. अभिनेत्याने आपल्या पत्नीच्या प्रत्येक फोटोवर इमोजी पोस्ट करत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. यासाठी त्यानं हार्ट आणि फायर इमोजीचा वापर केला.

(Stylish Bag वेस्ट बॅग्सचा ट्रेंड भन्नाट)

चाहत्यांनाही जेनेलिया डिसुझा हा लुक प्रचंड आवडला. त्यांनीही फोटोवर फायर इमोजी पोस्ट करत जेनेलियासाठी ‘सो हॉट’, ‘स्टनिंग’, ‘लुकिंग प्रिटी’, ‘खूप सुंदर दिसत आहेस’ यासारख्या कमेंट्स केल्या आहेत.

(ऐश्वर्या राय-बच्चन आणि करीना कपूरने नेसली एकसारखीच साडी? स्टाइलमध्ये कोणी मारली बाजी)

​या अभिनेत्रीसोबत कोणीही स्पर्धा करू शकत नाही

बदलत्या फॅशन ट्रेंडनुसार जेनेलिया डिसुझाच्या (Genelia D’souza Style) स्टाइलमध्येही आकर्षक बदल पाहायला मिळत आहेत. स्टायलिश अवतारातील कित्येक फोटो ती सोशल मीडियाद्वारे आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. फॅशन व्यतिरिक्त खास गोष्ट म्हणजे जेनेलियाचा कूल अ‍ॅटीट्यूड, ज्यामुळे तिची स्टाइल हटकेच दिसते. तिची वेशभूषा आकर्षक आणि कम्फर्टेबल असते.

(आलिया भटने शेअर केले ग्लॅमरस लुकमधील फोटो, चाहत्यांनी केला कौतुकाचा वर्षाव)

जेनेलिया डिसुझाचा हा स्टायलिश लुक तुम्हाला आवडला का?

(सारा अली खान व कृति सेनॉनने परिधान केलं एकसारखं आउटफिट? कोणाचा लुक आहे सुपर स्टायलिश)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *