जेव्हा करीना कपूरवर भारी पडली होती या टीव्ही अभिनेत्रीची स्टाइल, पाहा फोटो

Spread the love

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये अभिनेत्रींनी एकसारखे कपडे परिधान करणं किंवा एकसारखीच स्टाइल फॉलो करणं, ही नवीन गोष्ट नाही. बी-टाउनमधील मोठमोठ्या अभिनेत्री असे करताना दिसतात. पण जेव्हा बी-टाउनमध्ये फॅशनिस्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोठ्या अभिनत्रीवर टीव्ही अभिनेत्रीची स्टाइल भारी पडते तेव्हा नक्कीच आश्चर्य व्यक्त केले जाते.

असेच काहीसे करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) आणि ‘सुपर ३०’ ची अभिनेत्री मृणाल ठाकूरसोबत (mrunal thakur) घडलेले पाहायला मिळाले. या दोघींनीही एकसारखा लेहंगा परिधान केल्याचे पाहायला मिळालं पण फॅशन फेसऑफ पेक्षा दोन्ही अभिनेत्रींची स्टाइल एकमेकांवर भारी झाल्याचे दिसले होतं. बॉलिवूडची बेगम करीना कपूर खानची ड्रेसिंग स्टाइल सर्वांनाच माहिती आहे.
(करीना कपूर आणि मलायकाने पुन्हा एकसारखेच कपडे केले परिधान, पाहा फोटो)

​करीना कपूरची स्टाइल

करीना कपूर पारंपरिकपासून ते वेस्टर्न स्टाइल सहजरित्या कॅरी करते. तिचा फॅशन सेन्स अप्रतिम आहे. पण बेबोकडून स्टाइलमध्ये एक अशी चूक झाली होती की हीच गोष्ट तिच्याकडून पुन्हा घडणार नाही. करीना कपूर बॉलिवूडमधील एक अशी अभिनेत्री जी कोणत्या-न्-कोणत्या गोष्टीवरून नेहमीच चर्चेत असते. अभिनेता कार्तिक आर्यनसोबतचा तिचा रॅम्प वॉक देखील लोकांच्या चांगलाच लक्षात राहिला होता.

(सैफीनाच्या लग्नाचे कळताच अमृताने या व्यक्तीला केला होता फोन,खुद्द साराने दिली ही माहिती)

​करीना आणि कार्तिकचा रॅम्प वॉक

प्रसिद्ध फॅशन डिझाइनर मनीष मल्होत्राच्या शोमध्ये कार्तिक आणि करीनाने एकत्र रॅम्प वॉक केला होता. कार्तिक आणि करीनाला एकत्र पाहून त्यांच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता. या शोसाठी कार्तिकने शेरवानी परिधान केली होती. या पेहरावामध्ये तो नेहमी प्रमाणे हँडसम दिसत होता. तर दुसरीकडे करीना कपूरने आयव्हरी रंगाचा लेहंगा परिधान केला होता.

(करीना कपूरचा हा अवतार पाहून सर्व झाले स्तब्ध, इव्हेंट संपल्यानंतर लक्षात आली चूक)

​करीना कपूरचा स्टायलिश लुक

करीना कपूरच्या लुकबाबत सांगायचे झाले तर तिनं आपली परफेक्ट फिगर फ्लॉन्ट करण्यासाठी व्ही शेपमधील लेहंग्याची निवड केली. या लेहंग्यावर धाग्यांच्या मदतीने सुंदर विणकाम केल्याचे दिसत आहे. या डिझाइन लेहंग्यामुळे करीनाच्या सौंदर्यामध्ये अधिक भर पडली होती. लेहंग्याला आकर्षक लुक देण्यासाठी फर्श-स्वीपिंग ट्रेनसह एका स्कर्टचा समावेश होता. ज्यामध्ये पांढऱ्या रंगाची बॉर्डर आणि झगमगत्या पॅटर्नमध्ये धाग्यांनी विणकाम करण्यात आले होतं.

(तैमूरच्या कपड्यांसंदर्भात करीनाचे नियम; कधीच केला जात नाही बदल)

​फॅशनेबल सील्व्ह्ज

एवढंच नव्हे तर बेबोनं परिधान केलेल्या ब्लाउजची नेकलाइन आणि स्लीव्ह्ज प्रचंड स्टायलिश होते. यावर तिने एक स्टेटमेंट नेकपीस परिधान केला होता. करीनानं डोळ्यांच्या पापण्यांना गुलाबी रंगाच्या आयशॅडोसह स्मोकीलुक,गुलाबी रंगाचे ब्लशश, पीच रंगाची न्यूड लिपस्टिक असा मेक अप केला होता. पण बेबोची हेअर स्टाइल मात्र चाहत्यांना आवडली नाही. बेबोने आपला लुक एका बाजूने फ्लिकसह स्टाइल केला होता.

(करीना कपूरनं नणंदेच्या कार्यक्रमात परिधान केला बोल्ड ड्रेस,लोकांच्या रागाचा चढला होता पारा)

​मृणाल ठाकुरचा लुक

जेव्हा टीव्ही अभिनेत्री मृणाल ठाकुरचे अशाच प्रकारच्या लुकमधील काही फोटो समोर आले तेव्हा तिने आपल्या मोहक सौंदर्याने सर्वांची मने जिंकली. मृणाल ठाकुरने कमीत कमी मेकअप आणि मेसी बन हेअर स्टाइल कॅरी केली होती. तिचा लुक अतिशय आकर्षक दिसत होता. स्टेटमेंट नेकपीसह मृणालला एकदम परफेक्ट लुक मिळाला होता. दरम्यान, मृणाल आणि करीनाने आपापल्या स्टाइलने लुक कॅरी केला होता. पण केशरचनेमुळे मृणाल ठाकुरचा लुक एकदम परफेक्ट दिसत होता. या दोघींपैकी तुम्हाला कोणाचा लुक सर्वात बेस्ट वाटला?

(एक असा फोटो जो कायमचा विसरणं पसंत करेल करीना कपूर)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *