ट्रेनने प्रवास करताना आरोग्यासाठी अशी घ्या खबरदारी, वाचा तज्ज्ञांनी दिलेली माहिती

Spread the love

लवकरच सर्वसामान्‍यांना लोकलने प्रवास करण्‍याची परवानगी देण्‍यात येईल. सध्याच्या करोना काळात कामावर जाताना आणि कामावरून घरी परत येताना सुरक्षित प्रवासासाठी खबरदारी घेणं आवश्यक आहे. रेल्‍वेने सुरक्षितपणे प्रवास करताना लक्षात ठेवायचे मुद्दे पुढीलप्रमाणे…

० प्रवासापूर्वी…
– रेल्‍वे वेळापत्रक आधीच तपासून घ्‍या. यामुळे तुम्‍ही गर्दी नसलेल्‍या वेळेमध्‍ये आणि तुमच्‍या सोयीच्‍या वेळेनुसार प्रवासाची वेळ ठरवू शकता.
– शक्‍यतो ई-पास/ ई-तिकिट मिळवा. ज्‍यामुळे तुम्‍हाला प्रवासादरम्‍यान लांब रांगांमध्‍ये उभं राहण्‍याची गरज लागणार नाही.
– तुमच्‍यासोबत तीन पदरी फेस मास्‍क, हँड सॅनिटायझर आणि काही निर्जंतुक करता येण्यासारखे वाइप्‍स ठेवा. एका सीलबंद बॅगेमध्‍ये काही अतिरिक्‍त मास्‍क्‍स सोबत ठेवा. ज्‍यामुळे मास्‍क खराब झाल्‍यास त्‍याच्‍याऐवजी दुसरा मास्‍क वापरता येऊ शकतो.
– कामाला जाण्‍यापूर्वी साबणाने हात स्‍वच्‍छ धुवा आणि त्‍यानंतर मास्‍क घाला. मास्‍क घातल्‍यानंतर कामाच्‍या ठिकाणी पोहोचेपर्यंत मास्‍कला स्‍पर्श करू नका किंवा काढू नका. बाहेर पडण्‍यापूर्वी ग्‍लोव्‍हज घाला. हँडल्‍स, रेलिंग्‍ज इत्‍यादींना स्‍पर्श केला तर ग्‍लोव्‍हज तुमच्‍यासाठी संरक्षक म्‍हणून काम करतील. कामाच्‍या ठिकाणी पोहोचल्‍यानंतर ग्‍लोव्‍हजची योग्‍यरित्‍या विल्‍हेवाट लावा. तुमच्‍याकडे ग्‍लोव्‍हज नसतील तर प्रवासादरम्‍यान तुमच्‍या चेहऱ्याला हात न लावण्‍याची काळजी घ्‍या आणि कामावर पोहोचल्‍यानंतर हात स्‍वच्‍छ धुवा.
(शरीर फिट ठेवायचंय? प्या १ ग्लास तुळस व ओव्याचं पाणी, जाणून घ्या लाभ)
० प्रवासादरम्‍यान…
– तिकिट मशिन्‍स, हँडरेल्‍स, लिफ्टची बटणं आणि बाक अशा वारंवार स्‍पर्श केल्या जाणाऱ्या पृष्‍ठभागांना स्‍पर्श करणं टाळा. या पृष्‍ठभागांना स्‍पर्श केला तर त्‍वरित साबण आणि पाण्‍याने हात स्‍वच्‍छ धुवा किंवा ६० टक्‍के अल्‍कोहोल असलेल्‍या सॅनिटायझरचा वापर करा.
– इतर प्रवाशांपासून किमान ६ फूटाचं अंतर ठेवा आणि गर्दी करणं टाळा. तुम्‍ही स्‍वत: आणि इतर प्रवाशांमध्‍ये काही आसनं रिक्‍त सोडा. कुठे उभं राहावं किंवा बसावं, कुठे रांगेत उभं राहावं आणि बाहेर पडण्‍याची चिन्‍हं यासंदर्भात दिलेल्‍या सूचनांचं पालन करा.
– सार्वजनिक शौचालयाचा वापर केल्‍यानंतर साबणाने हात स्‍वच्‍छ धुवा.
– स्‍वत:ची पाण्‍याची बाटली आणि फूड पॅकेट्स सोबत ठेवा. इतर प्रवाशांकडून पाण्‍याची बाटली मागू नका किंवा त्‍यांना देऊ नका. रेल्‍वे स्‍थानकावर खाद्यपदार्थ किंवा पाणी खरेदी केल्‍यास ऑनलाइन पेमेंटच्या पर्यायांचा वापर करा किंवा सुट्टे पैसे द्या. प्रवासादरम्‍यान खाण्‍यासाठी आणि पिण्‍यासाठी मास्‍क काढणं टाळा. त्‍याऐवजी कामाच्‍या ठिकाणी पोहोचण्‍याची वाट पाहा.
– सार्वजनिक ठिकाणी थुंकणं टाळा.
(रात्री गाढ झोप मिळण्यासाठी लक्षात ठेवा या ७ गोष्टी)
० कामावर पोहोचल्‍यानंतर…
– प्रवास पूर्ण केल्‍यानंतर हात सॅनिटाइज करा आणि कामाच्‍या ठिकाणी पोहोचल्‍यानंतर किमान २० सेकंद साबणाने हात स्‍वच्‍छ धुवा.
– प्रवासादरम्‍यान घातलेला मास्‍क काढून टाका आणि त्‍याच्‍याऐवजी दुसरा नवीन मास्‍क घाला. अगोदर वापरलेला मास्‍क धुण्‍यासाठी किंवा विल्‍हेवाट लावण्‍यासाठी सीलबंद बॅगेमध्‍ये ठेवता येऊ शकतो.
– कामाच्‍या ठिकाणी जेवणाच्‍या वेळी एकत्र भोजन करणं टाळा आणि कॅफेटेरियामध्‍ये सुरक्षित अंतर ठेवा.
(Health या गोष्टींमध्ये दडलीय तुमच्या आरोग्याची गुरुकिल्ली, तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती)
खबरदारी घेत आणि स्‍वच्‍छताविषयक नियमांचं पालन करत तुम्ही सुरक्षित प्रवास करू शकता.


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *