डायबेटिक फुट म्हणजे नेमके काय? जाणून घ्या आजाराची कारणे व धोका

Spread the love


डॉ. वैभव लेंडे,
रक्तवाहिनी शल्यचिकित्सक, नागपूर
बदलत्या जीवनशैलीमुळे मधुमेहग्रस्त रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. डोळे, मुत्रपिंड, मेंदू या अवयवांसह पायांवरही मधुमेहाचा विपरित परिणाम होतो. सोप्या भाषेत सांगायचे तर, ज्या व्यक्तीला मधुमेह आहे, त्या व्यक्तीच्या पायास ‘डायबेटिक फुट’ () असे म्हणतात. ज्यांना पाच वर्षांहून अधिक काळ मधुमेहाचा आजार आहे, त्यांच्या पायात समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे रक्तशर्करा नियंत्रणात ठेवण्यासोबत पायांची विशेष काळजी घेणे देखील आवश्यक आहे.

नेमके काय होते
डायबेटिक फुट या विकारात मधुमेहामुळे पायाच्या संवेदना कमी होऊ लागतात. एरवी आपल्याला जखम झाली तर कळते. मात्र, संवेदना कमी झाल्यावर जखम झाली की, त्याबद्दल कळतच नाही. त्यामुळे ती अधिक चिघळते. कालांतराने अल्सर होऊन त्यातून पाणी निघू लागल्यावर जखमेची जाणीव होते. कधी कधी पायांमध्ये आग होऊ शकते, ती दीर्घकालापर्यंत राहू शकते. वेळीच उपचार झाले नाही तर पाय कापावा लागू शकतो. सोबतच मधुमेह केवळ रक्तवाहिन्यांनाच नव्हे तर स्नायुंना व सांध्यांना देखील इजा पोहोचवतो. त्यामुळे पायाचा आकार सामान्यतः बदलतो. अशा वे‌ळी अल्सर होण्याचा धोका संभवतो.

( )कारणे व धोका
दीर्घकालापासून असलेला आणि अनियंत्रित मधुमेह, त्यासोबत उच्चरक्तदाब आणि धुम्रपानाचे व्यसन, आणि वाढते वय यामुळे ‘डायबेटिक फुट’चा धोका निर्माण होतो. पायाच्या संवेदना गेल्यानंतरही योग्य ती काळजी न घेतल्याने जखम झाल्यास डायबेटिक फुट विकारात गुंतागूंत र्निमाण होऊ शकते. कारण संवेदनेअभावी जखम झाली, हे ठाऊकच नसते. त्यामुळे पायात प्रादुर्भाव वाढत जातो. पाय हे सतत जमिनीच्या संपर्कात असल्या कारणाने तळपायांच्या जखमांमध्ये प्रादुर्भाव होणाचा धोका अधिक असतो.

()

रोगनिदान
साधारण काम करताना किंवा अगदी चप्पल घालताना देखील पायांमध्ये जखम होते; एवढे पाय नाजूक झाले असतात. अनवाणी पायाने उन्हात चालल्यास पायाची कातडी भाजते. फोड येतात. पायाच्या संवेदना हळू-हळू कमी होऊ लागतात. ही लक्षणे घेऊन व्हॅस्कुलर सर्जनकडे गेलात की, तो पायाचा आकार बदलला आहे का, त्यास सूज आली आहे का, जखम तर नाही ना झाली इ. बाबी शारीरिक तपासणी करून बघतो. याशिवाय एक्स-रे द्वारे हाडं आणि सांध्यांच्या तपासण्या करतो. जखम भरत नसेल तर रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा तर नाही याचीही तपासणी केली जाते आणि संपूर्ण तपासणीच्या आधारावर ‘डायबेटिक फुट’ची तीव्रता ठरविली जाते.

उपचार पद्धती
प्राथमिकतः लक्षणांना बघून औषधे दिली जातात. जर जखम भरत नसेल तर रक्तवाहिन्यांच्या अडथळ्यामुळे आहे का, यासाठी तपासणी केली जाते. जर रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा असेल तर त्यासाठी अ‍ॅन्जिओप्लास्टी व स्टेंटिंग अथवा बायपासद्वारे रक्तपुरवठा सुरळीत करण्यासाठी व्हॅस्कुलर सर्जन शस्त्रक्रिया करतात. या प्रक्रियेद्वारे पाय कापण्यापासून वाचविता येऊ शकते.

()
प्रतिबंधात्मक उपाय
मधुमेह आहे, हे तर पूर्वीच कळालेले असेल तर आपण डायबेटिक फुटच्या संभाव्य धोके असलेल्या लोकांमध्ये येतो. मग अशा वेळी प्रतिबंधात्मक काळजी घेणे कधीही उत्तम होय. रोज सकाळी उठल्यावर पाय पूर्णपणे पडताळून पहावेत. त्यात अल्सर तर नाहीय्, भेगा किती झाल्यात, बोटांच्या फटीमध्ये फंगल इंन्फेक्शन दिसतेय का, या सगळ्यांची तपासणी करावी. कारण येथूनच प्रादुर्भाव होण्यास सुरुवात होते. मधूमेह असल्यास पायाची त्वचा अधिक कोरडी पडते. त्यामुळे पायाला मॉईस्चरायजर लावणे केव्हाही उत्तम आहे. यासोबत घरात असताना देखील चपला आणि मोजे वापरावेत. बाहेर जाताना आरामदायी पादत्राणांचा वापर करावा. विशेष म्हणजे प्रत्येक मधुमेहग्रस्त रुग्णाने व्हॅस्कुलर सर्जनला (रक्तवाहिनी शल्यचिकित्सक) एकदा दाखवायला हवे.


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *