डिटॉक्स डाएट म्हणजे काय? याचे शरीरावर होणारे महत्त्वाचे परिणाम जाणून घ्या

Spread the love

‘दिवाळीत इतकं खाणं झालंय, आता पुन्हा डाएट करायला हवं’, ‘पाच दिवसात पाच किलो वजन वाढलं’ असे संवाद दिवाळीनंतर हमखास कानावर पडतात. किंबहुना दिवाळीनंतर गुगल सर्चवर देखील ट्रेंड म्हणून ‘पोस्ट दिवाळी डिटॉक्स’ हे शब्द हमखास शोधले जातात. यावर्षी अनेक घरांमध्ये साधारण मे महिन्यापासूनच घरी फराळ केलेले दिसत होते. पण, दिवाळीत लाडू, चिवडा याव्यतिरिक्त अनारसे, कडबोळी, शंकरपाळे यांचं महत्त्व आणि प्रमाण जास्त असतंच!

त्यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबीचं प्रमाण वाढणं (अर्थात फॅट्स वाढणं) ओघाने आलंच. शिवाय, ‘दिवाळीत डाएट होत नाही. त्यामुळे दिवाळीनंतरच करू सुरुवात’ असा संकल्प करणाऱ्यांची संख्यादेखील कमी नाही. तर अशा सगळ्यांसाठी दिवाळीनंतर आहार नियमन (म्हणजे डाएट) करणाऱ्यांसाठी आजचा लेख उपयुक्त ठरावा अशी आशा आहे.


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *