डिलिव्हरीनंतर उद्भवली शरीरावर सूज येण्याची समस्या तर ट्राय करा ‘हे’ घरगुती रामबाण उपचार!

Spread the love

सूज निर्माण होण्याची कारणे

गरोदरपणात आई आणि बाळ दोघांना योग्य पोषण मिळण्यासाठी जास्त रक्ताची गरज असते. प्रोटीनची कमतरता आणि रक्त पातळ असल्या कारणाने शरीरात हिमोग्लोबिन कमी होऊ शकते आणि फ्लूइड जमा होते. डिलिव्हरी नंतर शरीरातील सर्व अधिकचे रक्त निघू शकत नाही आणि अधिक रक्त, हार्मोनल बदल आणि फ्लुईड रीटेंशन मुळे डिलिव्हरी नंतर सूज निर्माण होऊ शकते. जर सूज स्वत:हून कमी होत नसेल तर तुम्ही खालीलपैकी घरगुती उपायांचा अवश्य वापर करून पहा. तुम्हाला नक्कीच फरक दिसेल.

(वाचा :- मीरा राजपूतने डिलिव्हरीनंतर अवघ्या तीन महिन्यांत अशी केली लठ्ठपणावर मात!)

सूज कमी करण्यासाठी प्या पाणी

तुम्हाला या गोष्टीवर विश्वास बसणार नाही पण ही गोष्ट खरी आहे की शरीराला तुम्ही जेवढे हायड्रेट ठेवाल तेवढे पाण्यात जमा फ्लूइड बाहेर काढण्यास मदत मिळू शकते. डिहाइड्रेशन मध्ये शरीर अधिक पाणी रोखून धरते यामुळेच हायड्रेट राहणे खूप गरजेचे आहे. पाणी हे किडनीला सुद्धा साफ करून विषयुक्त पदार्थांना बाहेर काढते. यामुळे शरीर स्वस्थ राहते. म्हणून डिलिव्हरी नंतर शक्य तितके जास्त पाणी प्या आणि सूज स्वत:च कमी होईल. शिवाय जास्त पाणी प्यायल्याने खूप फायदे सुद्धा शरीराला मिळतील.

(वाचा :- प्रेग्नेंसीमध्ये अचानक मासिक पाळी येण्यामागची कारणे, अर्थ व दुष्परिणाम काय?)

हलका व्यायाम

सूज आणि त्यांच्या लक्षणांना कमी करण्यासाठी हलका व्यायाम सुद्धा फायदेशीर ठरू शकतो. पायी चालल्याने आणि हालचाल केल्याने शरीरात रक्त आणि पाण्याचा प्रवाह वाढतो आणि ते शरीरात साठून राहत नाही. परंतु जर तुम्हाला व्यायाम करण्यात वेदना जाणवत असतील तर मात्र व्यायाम करू नये. अमेरिकन कॉलेज ऑफ ऑब्‍स्‍टेट्रिशियन अँड गायनेकोलोजिस्‍ट यांच्या म्हणण्यानुसार पायी चालणे आणि योग करणे व स्विमिंग करणे यामुळे शरीरावरची सूज मोठ्या प्रमाणात काही होऊ शकते व हळूहळू नाहीशी होते.

(वाचा :- प्रेग्नेंसीमध्ये का गरजेचं असतं कोवळं ऊन घेणं? अनुष्का शर्माही जाते उन्हात फिरायला!)

कमी मीठ

शरीराला सोडियम आणि पाणी यांमध्ये संतुलन राखण्याची गरज असते. खूप जास्त सोडियम किंवा मीठ खाल्ल्याने पाणी शरीरातच साचून राहते. केक, चिप्स आणि सॉफ्ट ड्रिंक्स सारखे प्रक्रिया केलेले पदार्थ सुद्धा जास्त खाऊ नये कारण यांमध्ये मिठाची मात्रा अधिक असते. जर डिलिव्हरी नंतर शरीरावरची सूज अजिबात कमी होत नसेल तर आहारातील मिठाचे प्रमाण आवर्जून कमी करा. तुम्हाला त्याचा फरक नक्की दिसेल आणि तुमच्या शरीरावरची सूज कमी होईल.

(वाचा :- Navratri Foods : इतरांसाठी आरोग्यवर्धक ठरणा-या ‘या’ पीठाचे पदार्थ प्रेग्नेंट महिलांसाठी आहेत का सुरक्षित?)

रामबाण उपाय आहे पोटॅशियम

सोडियम आणि पोटॅशियम एकत्र काम करतात आणि शरीरात या दोघांमध्ये संतुलन राहणे खूप आवश्यक आहे. पोटॅशियम जास्त प्रमाणात घेतल्याने नैसर्गिक रुपात शरीरातील सोडियमची मात्र कमी होत जाते. याचाच अर्थ शरीरात जास्त काळ पाणी व रक्त साचून राहत नाही आणि सूज कमी होत जाते. केळी, अव्हाकॅडो, पालक, कडधान्ये, दही आणि पिनट बटर यांचे मोठ्या प्रमाणात सेवन करावे कारण यांच्यात खूप पोटॅशियम असते. तर मंडळी हे आहेत अगदी साधे सोपे उपाय जे डिलिव्हरी नंतर शरीरावरची सूज कमी करण्यात सहाय्य करतात. ही माहित आपल्या ओळखीच्या लोकांसोबत सुद्धा शेअर करा म्हणजे त्यांनाही याचा फायदा होईल.

(वाचा :- इच्छित वेळेत आई-बाबा बनायचं असेल तर ट्राय करा ‘या’ टिप्स!)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *