डिलिव्हरीनंतर का येते महिलांना डिप्रेशन? जाणून घ्या रामबाण घरगुती उपाय!

Spread the love

पोस्टमार्टम डिप्रेशन (tips for postpartum depression) ही एक अशी समस्या आहे जी अनेक स्त्रियांच्या वाट्याला येते पण त्याबद्दल त्यांना काहीच माहिती नसते. पोस्टमार्टम डिप्रेशन बद्दल असलेले अज्ञान अनेकदा आरोग्याला आणि जीवाला मोठा धोका निर्माण करू शकते. डिलिव्हरीनंतर शरीरात अनेक बदल दिसून येतात. हार्मोनल बदल आणि आणि ताण यासाठी कारणीभूत असतात. यामुळे त्वचेमध्ये मोठ्या प्रमाणात वाईट बदल घडतो. केस सुद्धा झडू लागतात. त्वचेवर स्ट्रेच मार्क्स दिसल्याने बाहेर लोकांमध्ये वावरण्यास लाज वाटते.

डिलिव्हरी नंतर वाढलेले वजन पाहून अनेकल जण त्याची खिल्ली उडवतात आणि या सर्व गोष्टींमुळे स्त्री डिप्रेशन मध्ये जाऊ शकते. यालाच पोस्टमार्टम डिप्रेशन असे म्हणतात. याच डिप्रेशनची शिकार बॉलीवूड अभिनेत्री समीरा रेड्डी (sameera reddy) झाली होती. याचा मोठा परिणाम तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनावर झाला होता. आज आपण याच पोस्टमार्टम डिप्रेशन बद्दल अधिक माहिती घेऊया.

पोस्टमार्टम डिप्रेशनची कारणे

अशी अनेक कारणे आहेत जी पोस्टमार्टम डिप्रेशनला कारणीभूत ठरू शकतात. यात पहिल्या गरोदरपणानंतर किंवा गरोदरपणात डिप्रेशन मध्ये राहणे, कमी वयात आई होणे, गरोदर न राहण्याची इच्छा होणे, जास्त मुलांना जन्म देणे, प्रीमेंस्‍ट्रुअल डिस्‍फोरिक डिस्‍ऑर्डर किंवा डिप्रेशनची हिस्ट्री असणे, कोणाचाच मानसिक आधार नसणे, एकटेपणाची भावना आणि पती पत्नीमध्ये मतभेद असणे यांसारख्या कारणांचा समावेश होतो. अशा प्रकारची कारणे गरोदर स्त्रियांमध्ये दिसण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे आणि ही अतिशय चिंतेची बाब असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.

(वाचा :- बॉलीवूड अभिनेत्रींच्या ‘या’ खास टिप्स वापरून प्रेग्नेंसीमध्ये करा योगाभ्यास!)

हार्मोन्स सुद्धा आहेत कारणीभूत

गरोदरपणामध्ये आणि गरोदरपणानंतर निर्माण होणाऱ्या अनेक समस्यांचे आणि शारीरिक बदलांचे मूळ हे हार्मोन्स मध्येच सापडते. डिलिव्हरी नंतर एस्‍ट्रोजन आणि प्रोजेस्‍टेरोन हार्मोन मध्ये कमतरता निर्माण झाल्यास सुद्धा पोस्‍टपार्टम डिप्रेशनची समस्या उद्भवू शकते. थायरॉइड ग्रंथी मधून स्त्रवणारे इतर हार्मोन्स सुद्धा वेगाने कमी होत असतात आणि यामुळे स्त्रीला थकवा येतो, तिची सतत चिडचिड होते आणि तुला आपण डिप्रेशन मध्ये असल्याची भावना सतावत राहते.

(वाचा :- हाय ब्लड प्रेशरमुळे का करावी लागते सिझेरियन डिलिव्हरी? जाणून घ्या नॉर्मल डिलिव्हरीसाठी उपाय!)

कमी झोप आणि चिंता

मुल जन्माला आल्यानंतर त्याचे संगोपन करण्यात स्त्रिया व्यस्त होतात. याशिवाय जन्मांनंतर बाळ दूध पिण्यासाठी रात्रीचे कधीही उठते कारण हाच तो काळ असतो ज्यात बाळ हे पूर्णपणे आईच्या दुधावर अवलंबून असते आणि जोवर त्याला दूध मिळत नाही तोवर बाळ शांत होत नाही. मात्र अनेक स्त्रियांना यामुळे त्रास होऊ शकतो कारण या गोष्टीमुळे सतत झोपमोड होते आणि झोप पूर्ण होत नाही. झोप जर जास्त दिवस सतत पूर्ण झाली नाही तर त्यामुळे पुढे ताण तणाव वाढून डिप्रेशन निर्माण होते. अनेकदा स्त्रियांना बाळाच्या संगोपनाबद्दल सतत चिंता भासत असते. जर हि चिंता वेळीच नियंत्रणात आणली नाही तर त्यातून डिप्रेशन निर्माण होऊ शकते.

(वाचा :- सिझेरियन डिलिव्हरीनंतर टाक्यांमध्ये होऊ शकतं इन्फेक्शन, या गोष्टींची घ्या काळजी!)

शरीरातील बदल

डिलिव्हरी नंतर स्त्रीच्या शरीरात अनेक प्रकारचे बदल घडतात. पोट जास्त सुटते, वजन अतिशय जास्त वाढते, केस गळतात, त्वचेत बदल होतात. यांसारखे बदल स्वत:ला गरोदरपणापूर्वी मेंटेन ठेवणाऱ्या स्त्रीला अजिबात सहन होत नाहीत. तिला स्वत:च्या शरीराकडे पाहवत नाही आणी सतत त्याबद्दल विचार करून ती चिंताग्रस्त होते. आपण पूर्वी सारखे सुंदर दिसणार नाही हि भावना मनात घर करते. तिचा आत्मविश्वास तुटू लागतो आणि ती सतत दु:खी राहते. हीच गोष्ट अभिनेत्री समोर रेड्डी सोबत झाली होती.

(वाचा :- थंडीत प्रेग्नेंट महिलांनी अशी घ्यावी स्वत:ची काळजी! जाणून घ्या काय करावं व काय टाळावं?)

पोस्‍टपार्टम डिप्रेशनवर उपाय काय आहेत?

जर स्त्रीला पोस्‍टपार्टम डिप्रेशन पासून स्वत:चा बचाव करायचा असेल आणि तिला आई होण्याचा हा काळ एन्जोय करायचा असेल तर गरोदरपणावेळी आणि त्यानंतर सुद्धा तिने व्यायाम आणि मेडिटेशन वा योग जरूर केला पाहिजे. स्वत:च्या आणि बाळाच्या संगोपनावर जास्तीत जास्त लक्ष दिले पाहिजे. आपल्या पतीसह जास्तीत जास्त वेळ घालवावा कारण तोच अशा काळात मानसिक आधार देऊ शकतो. जास्तीत जास्त सकस आहार घ्यावा आणि मद्य व धुम्रपानापासून दूर रहावे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा मुल झोपेल तेव्हा एक झोप आईने सुद्धा काढली पाहिजे.

(वाचा :- डिलिव्हरीनंतर रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी जीवनशैलीत करा ‘हे’ खास बदल!)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *