डिलिव्हरीनंतर प्या हर्बल होममेड ड्रिंक्स, कमजोरी दूर होण्यासोबतच ब्रेस्ट मिल्क वाढेल!

Spread the love

आहारावर विशेष लक्ष

डिलिव्हरी नंतर स्त्रीने आपल्या आहारावर विशेष लक्ष देणे अत्यंत गरजेचे होते. कारण यामुळे तिला ताकद तर मिळतेच, पण ती जे काही खाते ते तिच्या दुधावाटे बाळापर्यंत पोहोचते. जन्मानंतर पाहिले सहा महिने बाळ केवळ आईच्याच दुधावर असते. त्यामुळे या सहा महिन्यात आई जो काही आहार घेते तो अप्रत्यक्षपणे बाळाला सुद्धा मिळतो. या आहारात आज आम्ही ज्या घरगुती पेयांबद्दल सांगणार आहोत त्यांचा समावेश आवर्जून करा कारण या पेयांमधून आईच्या शरीराला आवश्यक असणारी सर्व पोषक तत्वे मिळतात आणि हीच पोषक तत्वे बाळाच्या शरीराला सुद्धा उपयुक्त ठरतात.

(वाचा :- प्रेग्नेंट महिलांसाठी अमृत आहेत आयरनने परिपूर्ण असलेले ‘हे’ पदार्थ!)

घरगुती पेये

घरगुती पेये म्हणजे घरात उपलब्ध असणाऱ्या वस्तूंपासून बनवली जाणारी पेये होय. ज्यात रोजच्या आहारात वापरल्या जाणाऱ्या फळ, भाज्या आणि औषधी वनस्पतींचा समावेश होतो. बाहेरील शक्तिवर्धक औषधे घेण्यापेक्षा अशा घरगुती पेयांचे सेवन कधीही चांगलेच असते. भारतीय संस्कृतीमध्ये सुद्धा औषधी वनस्पती आणि घरगुती पदार्थांपासून तयार केल्या जाणाऱ्या पदार्थांचे शरीराला होणारे फायदे सांगितले गेले आहेत. त्यामुळे प्रत्येक गरोदर स्त्रीने आवर्जून या पेयांचा वापर डिलिव्हरी तर केला पाहिजे.

(वाचा :- डिलिव्हरीनंतर का येते महिलांना डिप्रेशन? जाणून घ्या रामबाण घरगुती उपाय!)

लसणाचे दूध

लसूण हे स्तनांतील दूध वाढवण्यासाठी अत्यंत उपयुक्त मानले जाते. लसूण केवळ शरीराला ताकद देत नाही तर जखम भरण्यासाठी सुद्धा मदत करते. एका भांड्यात लसणाच्या 3 पाकळ्या एक कप पाण्यात उकळून घ्या. तोवर हे पाणी उकळू द्या जोवर ते अर्धे होत नाही. आता यामध्ये एक ग्लास दूध टाका आणि ते सुद्धा उकळू द्या. गॅस बंद करून दूध थंड होऊ द्या आणि या दुधात अर्धा चमचा मध मिसळ मध उपलब्ध नसल्यास तुम्ही साखर किंवा गुळाचा वापर सुद्धा करू शकता. जाणकार सुद्धा हे पेय डिलिव्हरी नंतर आवर्जून पिण्याचा सल्ला स्त्रियांना देतात.

(वाचा :- बॉलीवूड अभिनेत्रींच्या ‘या’ खास टिप्स वापरून प्रेग्नेंसीमध्ये करा योगाभ्यास!)

बडीशेपचे पाणी

बडीशेप सुद्धा स्तनांमधील दूध वाढवण्यास मदत करते. शिवाय डिलिव्हरी नंतर शरीरावर आलेली सूज कमी करते. बडीशेपच्या पाण्याने आई व बाळ दोघांच्या शरीरातील पचन सुधारते. आता हे पाणी कसे तयार करावे हा प्रश्न तुमच्या मनात आलाच असेल, चला तर जाणून घेऊया. यासाठी एक भांडे घ्या. त्यामध्ये प्रथम एक लिटर पाणी ओता. आता त्यात दोन चमचे बडीशेप टाकून ती त्या पाण्यात उकळू द्या. पाणी थोडे थंड झाले की तुम्ही हे पाणी पिऊ शकता. जर चव वाढवायची असेल तर त्यात मध आणि गुळ टाकल्यास हरकत नाही. रोज ताज्या बडीशेपचेच पाणी बनवून प्यावे. ज्या दिवशी बडीशेपचे पाणी बनवणे शक्य नसेल त्या दिवशी बडीशेप चावून खावी.

(वाचा :- हाय ब्लड प्रेशरमुळे का करावी लागते सिझेरियन डिलिव्हरी? जाणून घ्या नॉर्मल डिलिव्हरीसाठी उपाय!)

ओव्याचे पाणी

डिलिव्हरीनंतर वजन वाढते, पोट सुटते. याशिवाय प्रसूती नंतर अनेक समस्या सुद्धा निर्माण होतात. पोटाशी निगडीत या समस्यांना दूर करण्यासाठी तुम्ही ओव्याचे पाणी पिऊ शकता. सर्वप्रथम एक भांडे घ्यावे आणि त्यात अर्धा चमचा तूप टाकून गरम करून घ्यावे. त्यानंतर अर्धा चमचा ओवा पावडर टाकावी. शेवटी एक एक पाणी टाकून हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यावे. पाणी उकळू लागल्यावर यात गुळ टाकावा. जेव्हा गुळ मिक्स होईल तेव्हा गॅस बंद करून मिश्रण थंड होऊ द्यावे. नंतर पाणी गाळून या पाण्याचे सेवन करावे.

(वाचा :- सिझेरियन डिलिव्हरीनंतर टाक्यांमध्ये होऊ शकतं इन्फेक्शन, या गोष्टींची घ्या काळजी!)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *