डिलिव्हरीनंतर मजबूत शरीर व सुदृढ आरोग्य हवे असल्यास करा ‘या’ पदार्थांचे सेवन!

Spread the love

चिकन सूप

डिलिव्हरी नंतर आपल्या आहारात स्त्रीने आवर्जून चिकन सूपचा समावेश करावा. डिलिव्हरीच्या वेळेस स्त्रीला सलाईनच्या माध्यमातून फ्ल्यूइड दिले जाते. तर स्तनपान करणाऱ्या स्त्रियांना इतर स्त्रियांच्या तुलनेमध्ये एक लिटर जास्त फ्ल्यूइडची आवश्यकता असते. अशावेळी चिकन सूप ती कमतरता भरून काढण्यात महत्त्वपूर्ण योगदान देते. म्हणून डिलिव्हरी नंतर स्त्रीने आवर्जून चिकन सुपचे सेवन सुरु करावे. चिकन सुपर हे शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सची गरज भागवते. शिवाय चिकन सूप हे शरीरात उष्णता देखील टिकवून ठेवते.

(वाचा :- सावधान! गर्भधारणेमध्ये अडथळा येण्यास असू शकतो ‘हा’ आजार कारणीभूत)

तूप आणि हळदीचे दूध

तूप हे अतिशय पौष्टिक असते आणि यात खूप जास्त प्रमाणात कॅल्शियम आणि कॅलरीज असतात. बाळाला जन्म दिलेल्या स्त्रीने खास करून बाळाला स्तनपान करणाऱ्या स्त्रीच्या शरीराला जास्तीत जास्त कॅल्शियमची आवश्यकता असते. तुपा व्यतिरिक्त हळदीचे दूध सुद्धा स्त्रीच्या शरीराला उर्जा देण्यासाठी साहाय्य करते. म्हणून डिलिव्हरी नंतर रोज स्त्रीने आवर्जून एक ग्लास हळदीचे गरम दूध प्यायला हवे. यामुळे डिलिव्हरी वेळी झालेल्या जखमा भरून निघण्यास सुद्धा मदत होते. दुधामध्ये असलेली कॅल्शियम आणि प्रोटीनची मात्रा या काळात स्त्रीसाठी अत्यंत गरजेची असते.

(वाचा :- प्रेग्नेंसीच्या पहिल्या तिमाहीत चुकूनही करु नका ‘या’ पदार्थांचे सेवन!)

खजूर

एका संशोधनामध्ये दिसून आले आहे की डिलिव्हरी नंतर लगेच खजूर खाण्यास सुरुवात केल्यास कमी रक्तस्त्राव होतो. याचाच अर्थ शरीरातून कमी प्रमाणात रक्त बाहेर पडते. खजूर हा शरीराला आवश्यक असणाऱ्या साखरेचा सुद्धा उत्तम स्त्रोत मानला जातो. कमजोर शरीरामधील साखरेचे संतुलन योग्य झाल्यास शरीराला उर्जा मिळते आणि खजुराच्या सेवनाने अशाच प्रकारे स्त्रीच्या शरीराला उर्जा मिळते. खजुरामध्ये कॅलरी आणि कार्बोहाइड्रेट सारखे महत्त्वाचे घटक सुद्धा असतात.

(वाचा :- प्रेग्नेंसीमधील लघुशंका समस्यांवर करिना कपूरच्या डाएटिशियनने सांगितले घरगुती उपाय!)

फळांसोबत ओटमिल

डिलिव्हरीनंतर जेव्हा स्त्री पहिल्यांदा शौचास जाते तेव्हा त्यातून रक्त बाहेर पडते.पण ही एक सामान्य गोष्ट आहे यामुळे घाबरण्याची गरज नाही. काही स्त्रियांना प्रेग्नन्सी हार्मोन्समुळे बद्धकोष्ठतेची समस्या सुद्धा सतावते. ज्या स्त्रियांचे सिझेरियन होते त्यांना काही काळ शौचास होत नाही कारण पचन तंत्राची प्रक्रिया काहीशी संथ झालेली असते. डिलिव्हरी नंतर बद्धकोष्ठतेसरखी समस्या दूर करण्यासाठी वा पचन तंत्र नीट करण्यासाठी फायबरयुक्त आहाराची शरीराला गरज असते. ओट्स मध्ये मोठ्या प्रमाणावर फायबर असते. यातील पोषकता वाढवण्यासाठी तुम्ही फळांसोबत ओटमिल खाऊ शकता. ओटमिलमुळे स्तनांतील दुधाची मात्रा सुद्धा वाढते. यात कार्बोहायड्रेट, लोह आणि कॅलरी असते. हे सर्व घातक दुध उत्पादनात योगदान देतात.

(वाचा :- डिलिव्हरीनंतर पहिली मासिक पाळी किती दिवसांत यायला हवी?)

अंडी

अंडी हा प्रोटीन अर्थात प्रथिनांचा एक उत्तम स्त्रोत आहे आणि याच्या सेवनामुळे स्नायूंच्या वेदनांपासून आराम मिळतो. डिलिव्हरी नंतर स्त्रीला मांसपेशीच्या वेदनांना सामोरे जावे लागते. गरोदरपणानंतर ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिडच्या कमतरतेमुळे पोस्‍टपार्टम डिप्रेशन होऊ शकते आणि संशोधनात सुद्धा या दोघांच्या मधील संबंध आढळून आला आहे. अंड्यांमध्ये ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड असते जे पोस्‍टपार्टम डिप्रेशनचा धोका कमी करते. तर या सर्व पदार्थांचा डिलिव्हरी नंतर स्त्रीने आहारात अवश्य समावेश करावा आणि सुदृढ राहावे.

(वाचा :- बॉलीवूडमधील या अभिनेत्रींना प्रेग्नेंसीमध्ये योगाभ्यास केल्याने झाले होते भरपूर लाभ!)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *