डिलिव्हरीनंतर शिल्पा शेट्टीसारखी आकर्षक फिगर हवी असल्यास फॉलो करा तिच्याच डाएट टिप्स!

Spread the love

वेट ट्रेनिंग

शिल्पा शेट्टी आपल्या फिटनेस प्लान मध्ये वेट ट्रेनिंगचा जरूर समावेश करते. अनेक स्त्रियांना वाटते की वेट ट्रेनिंग केवळ पुरूषांसाठी असून त्याचा वापर मसल्स बनवण्यासाठीच केला जातो. तर नाही तसे अजिबात नसून वेट ट्रेनिंग ही स्त्रियांसाठी सुद्धा अत्यंत उपयोगी ठरू शकते. ज्या स्त्रियांना वर्कआउट करायला वेळ मिळत नाही किंवा ज्या स्त्रिया अत्यंत बिझी असतात त्यांच्यासाठी शिल्पाने दोन उत्तम पर्याय सुचवले आहेत. तिच्या मते अशा स्त्रियांनी रोज शिड्या चढून वर जावे आणि खूप चालावे. या दोन गोष्टी स्त्रीच्या फिटनेस मध्ये मोठा हातभार लावू शकतात.

(वाचा :- डिलिव्हरीनंतर हार्मोन्स संतुलित होण्यासाठी किती वेळ लागतो व संतुलित झाले नाही तर काय करावं?)

किती आहार घ्यावा?

शिल्पा शेट्टी ही अत्यंत फुडी आहे. तिला खूप खायला आवडते. पण सोबतच तिचे लक्ष आपल्या आहारावर सुद्धा असते. काय खावे आणि किती खावे याबद्दल ती अत्यंत सजग असते. शिल्पा व्हाईटच्या जागी ब्राऊन ब्रेड आणि ब्राऊन राईस खाते. सकाळ सकाळी आवळ्याचा आणि कोरफडीचा ज्यूस पिते. नाश्त्याला ब्राऊन शुगर सह चहा आणि लापशी खाते. दुपरच्या खाण्यात ब्राऊन राईस आणि रोटीसह डाळीचा अवश्य समावेश करते. शिवाय फायबर युक्त आहार सुद्धा तिच्या खाण्याचा अविभाज्य भाग आहे. दिवसातून एकदा ग्रीन टी, रात्री सूप हे तिला हवेच असते.

(वाचा :- Karwa chauth and pregnancy : एक्सपर्ट्सकडून जाणून घ्या प्रेग्नेंट महिला करवा चौथचं व्रत ठेऊ शकतात की नाही?)

गरोदरपणानंतर वेट लॉस

डिलिव्हरी नंतर चार महिन्यांनी शिल्पाने आपले वजन कमी करायला सुरुवात केली. तिने सर्वात प्रथम चालणे आणि सायकलिंग करणे यावर जास्त भर दिला. यामुळे तिचा स्टेमीना हळूहळू वाढू लागला आणि तिचे स्नायू मजबूत झाले. आठवड्यातून तीन वेळा 25 मिनिटे चालणे आणि सायकलिंग केल्यानंतर तीन आठवड्यात शिल्पाने प्रोपर वेट ट्रेनिंग वर भर द्यायला सुरुवात केली व पुन्हा एकदा तिचे शरीर आकार घेऊ लागले.

(वाचा :- वयाच्या चाळीशीत करीना कपूर बनते आहे आई! या वयात प्रेग्नेंट राहिल्यास काय धोके उद्भवतात?)

कधीच हार मानू नका

शिल्पा म्हणते की ही सर्वात मोठी टीप आहे त्या स्त्रियांसाठी ज्या वजन कमी करण्याचा निर्णय घेतात आणि काही महिन्यांतच हा विचार सोडून देतात. वजन कमी करणे ही एका दिवसांत घडणारी प्रक्रिया नाही. त्यासाठी खूप मोठा काळ लागतो. पण एकदा का तो काळ सुरु झाला की वजन हे कमी होऊ लागते. गरोदरपणा नंतर शिल्पाने जेव्हा आपले वाढलेले वजन पाहिले तेव्हा तिला सुद्धा एवढे वजन कमी करणे अशक्य वाटले होते. मात्र तिने आपले ध्येय सोडले नाही आणि मेहनत करत राहिली व आज पुन्हा एकदा तिने आपली फिगर परत मिळवली आहे.

(वाचा :- प्रेग्नेंसीतील लठ्ठपणामुळे ‘या’ अभिनेत्री झाल्या होत्या ट्रोल! कशी केली या परिस्थितीवर मात?)

जाणकारांचा सल्ला घ्या

अनेकांना वाटते की व्यायाम करणे हे खूप सोपे असते. आपण कसाही व्यायाम केला तरी आपले वजन कमी होईल. पण असे मुळीच नसते. प्रत्येकाची शारीरिक स्थिती वेगळी असते व त्यानुसारच त्या व्यक्तीने व्यायाम करणे अपेक्षित असते. त्यामुळे गरोदरपणा नंतर वजन कमी करणाऱ्या स्त्रियांनी व्यायाम करताना पर्सनल ट्रेनरचा किंवा एखाद्या जाणकाराचा सल्ला काही काळ जरूर घ्यावा. त्यांनी दिलेला आहार फॉलो करावा. यामुळे कोणत्याही प्रकारचा धोका उद्भवत नाही व शरीरावर विपरीत परिणाम होत नाही.

(वाचा :- डिलिव्हरीनंतर उद्भवली शरीरावर सूज येण्याची समस्या तर ट्राय करा ‘हे’ घरगुती रामबाण उपचार!)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *