डिलिव्हरीनंतर हार्मोन्स संतुलित होण्यासाठी किती वेळ लागतो व संतुलित झाले नाही तर काय करावं?

Spread the love

गरोदरपणाच्या काळात स्त्रीच्या शरीरात अनेक बदल घडतात आणि त्यातील एक महत्त्वपूर्ण आणि परिणामकारक बदल म्हणजे हार्मोन्स मध्ये निर्माण होणारे असंतुलन (hormonal imbalance) होय. हे असंतुलन अजिबात फायदेशीर नसते. तर उलट अधिक त्रासदायक ठरते आणि विविध समस्यांना आमंत्रण देते. त्यामुळे कधी एकदा हे हार्मोनल संतुलन पूर्ववत होते याची स्त्री वाट पाहत असते. हार्मोन्स असंतुलनामुळे नैराश्य, चीडचीड, मन न लागणे, थकवा, मासिक पाळीमध्ये समस्या निर्माण होणे असे त्रास उद्भवतात.

मात्र एका विशिष्ट काळानंतर हे हार्मोन्स संतुलन स्वत:हून नीट होते आणी या सर्व समस्या दूर होतात. पण हे हार्मोनल संतुलन कधी नीट होणार ते स्त्रीच्या शारीरिक स्थितीवर अवलंबून असते. आता वैद्यकीय क्षेत्र पुढारले असल्याने गोळ्यांच्या सहाय्याने हे हार्मोनल संतुलन नियंत्रणात आणता यते. चला आज आपण याबद्दलच सर्व माहिती जाणून घेऊया.

डिलिव्हरीनंतर हार्मोनल असंतुलन निर्माण होण्याचे कारण

डिलिव्हरी नंतर हार्मोनल असंतुलन हे एस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरोन नावाच्या दोन प्रजनन हार्मोन्स मधील बदलांमुळे होतात. गरोदरपणाच्या काळात डिलिव्हरी नंतर हे दोन हार्मोन्स मुख्य भूमिका बजावतात. यात जर असंतुलन निर्माण झाले तर अनेक मानसिक आणि शारीरिक बदल दिसून येतात आणि हे बदल पुढे त्रासामध्ये परावर्तीत होतात. मात्र ही एक नैर्सगिक समस्या असून जस जसा डिलिव्हरीचा काळ संपतो तस तसे हे हार्मोन्स सुद्धा पूर्ववत होतात आणि स्त्रीला कोणताही त्रास होत नाही.

(वाचा :- Karwa chauth and pregnancy : एक्सपर्ट्सकडून जाणून घ्या प्रेग्नेंट महिला करवा चौथचं व्रत ठेऊ शकतात की नाही?)

डिलिव्हरीनंतर हार्मोन्स सोबत काय काय होते?

बाळाची डिलिव्हरी आणि प्लेसेंटा बाहेर आल्यानंतरच प्रोजेस्‍टेरोन आणि एस्‍ट्रोजनचे प्रमाण कमी होऊ लागते. या दोन हार्मोन्स मध्ये घट झाल्याने लगेच ऑक्‍सिटोसिनचे प्रमाण वाढते. ऑक्‍सीटोसिन हार्मोन स्त्रीला आई होण्याची जाणीव करून डेट असते. प्रोलेक्टीन हार्मोन ब्रेस्ट मिल्क वाढवण्यासाठी लागते. प्रत्येक स्त्रीला गरोदरपणापासूनच या बदलांना सामोरे जावे लागते. डिलिव्हरी होईपर्यंत आणि डिलिव्हरी झाल्यावर सुद्धा हे बदल तसेच राहतात. त्यामुळेच डिलिव्हरी नंतरही स्त्रीला हार्मोनल असंतुलनाच्या त्रासाला सामोरे जावे लागते.

(वाचा :- वयाच्या चाळीशीत करीना कपूर बनते आहे आई! या वयात प्रेग्नेंट राहिल्यास काय धोके उद्भवतात?)

डिलिव्हरीनंतर हार्मोनल असंतुलनाचे लक्षण

डिलिव्हरी नंतरही हार्मोनल संतुलन पूर्ववत झाले नाही तर अशी काही लक्षणे आहेत ज्यावरून ओळखता येते की स्त्रीच्या शरीरात अजूनही हार्मोनल असंतुलन आहे. जसे की थकवा, वजन कमी होणे, मूड स्विंग्स, नैराश्य, भीती, निद्रानाश, केस गळणे, एलर्जी, बद्धकोष्ठता, अनियमित मासिक पाळी, ब्रेस्ट मिल्क तयार न होणे, योनी कोरडी राहणे यांसारखी लक्षणे डिलिव्हरी नंतरही दिसून लागली तर हे हार्मोनल असंतुलनामुळे होत असल्याचे समजून जावे.

(वाचा :- प्रेग्नेंसीतील लठ्ठपणामुळे ‘या’ अभिनेत्री झाल्या होत्या ट्रोल! कशी केली या परिस्थितीवर मात?)

कधी संतुलित होतात हार्मोन्स?

आता आपण ती गोष्ट जाणून घेऊया जी स्त्रीच्या मनात वारंवार येत असते की हा त्रास कधी संपणार? हे हार्मोनल संतुलन नीट कधी होणार? तर मंडळी गरोदरपणा आणि डिलीव्हारीचा काळ संपल्यावर हार्मोनल संतुलित होण्यासाठी अजून 6 महिन्यांचा काळ जाऊ शकतो. या सहा महिन्यात हार्मोन संतुलित होतात. हार्मोन्स संतुलित झाल्याचे सर्वात मोठे लक्षण म्हणजे मासिक पाळी वेळेवर येऊ लागते. त्यामुळे डिलिव्हरी नंतर जेव्हा मासिक पाळी वेळेवर येऊ लागेल तेव्हा हार्मोनल संतुलन नीट झाल्याचे समजावे.

(वाचा :- डिलिव्हरीनंतर उद्भवली शरीरावर सूज येण्याची समस्या तर ट्राय करा ‘हे’ घरगुती रामबाण उपचार!)

हार्मोन्स संतुलित कसे करावे?

डिलिव्हरीनंतर काही साध्या सोप्प्या उपायांनी सुद्धा हार्मोन्स संतुलित होण्याच्या प्रक्रियेला तुम्ही गती देऊ शकता. तांदूळ, ब्रेड, दुध, पास्ता आणि वेफर्स जास्त खाऊ नका कारण यात कॉम्‍प्‍लेक्‍स कार्बोहाइड्रेट्स मोठ्या प्रमाणावर असतात. व्यायाम केल्याने तणाव कमी होतो आणि शरीरावर असलेला दाब सुद्धा कमी होतो. खास करू न शक्य तितके जास्त चालावे. फाइबरमुळे एस्‍ट्रोजनची मात्रा निघून जाते. त्यामुळे जास्त फायबर असणारा आहार घ्या. योग केल्याने निराशा, तणाव दूर होती. तसेच हार्मोन्स संतुलित करण्यास सुद्धा सहाय्य होते. याशिवाय अधिक व्हिटॅमिन युक्त पदार्थांचे सेवन केल्याने सुद्धा हार्मोन्स लवकर संतुलित होतात.

(वाचा :- मीरा राजपूतने डिलिव्हरीनंतर अवघ्या तीन महिन्यांत अशी केली लठ्ठपणावर मात!)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *