ड्रेस पाहिल्यानंतर लोक म्हणाले, अनुष्का शर्मानंतर आता पक्का प्रियंका चोप्राचा नंबर

Spread the love

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने (Anushka Sharma) आपल्या प्रेग्नेंसीबाबतची माहिती २७ ऑगस्टला चाहत्यांसोबत शेअर केली. यानंतर सोशल मीडियावर काही दिवस केवळ अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीचीच भरपूर चर्चा होती. या सेलिब्रिटी कपलवर जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. यादरम्यान ‘विरुष्का’ला शुभेच्छा देण्यासह लोकांनी सोशल मीडियावर लग्न झालेल्या अन्य अभिनेत्रींबाबतही पोस्ट करण्यास सुरुवात केली. काही लोकांनी तर प्रियंकाचे फोटो पोस्ट करत म्हटलं की,’आता अनुष्कानंतर पक्का प्रियंका चोप्राचाच (Priyanka Chopra) प्रेग्नेंसीचा नंबर आहे’.

अनुष्का आणि नताशाचा ड्रेस
प्रेग्नेंसीची माहिती आपल्या चाहत्यांसोबत शेअर करताना अनुष्का शर्माने काळ्या रंगाचा पोल्का डॉट्स डिझाइनमधील ड्रेस परिधान केला होता. अनुष्कापूर्वी अशाच प्रकारच्या ड्रेसमध्ये नताशा स्टेनकोविकचा सुद्धा फोटो सोशल मीडियावर दिसला होता. दोघींचाही ड्रेस एकसारखाच होता आणि विशेष म्हणजे दोघींनीही प्रेग्नेंसीदरम्यान हा ड्रेस परिधान केला होता.
(सैफीनाच्या लग्नाचे कळताच अमृताने या व्यक्तीला केला होता फोन,खुद्द साराने दिली ही माहिती)

​लोकांनी शोधून काढलं भलतंच कनेक्शन

यानंतर लोकांनी प्रियंका चोप्राचे फोटो शोधून काढले. यामध्ये ती देखील काळ्या रंगाच्या पोल्का डॉट्स प्रिंट असणाऱ्या ड्रेसमध्ये दिसतआहे. हे फोटो शेअर करत ड्रेसच्या डिझाइनमधील साम्य पाहून लोकांनी प्रियंकावर मीम्स करण्यास सुरुवात केली. कमेंटमध्ये लोकांनी असंही म्हटलं की ‘आता पुढील नंबर प्रियंका चोप्राचा आहे.’

(करीना कपूर दुसऱ्यांदा होणार आई, गुड न्यूज शेअर केल्यानंतर समोर आली पहिली झलक)

​हार्दिक पांड्याने शेअर केला होता फोटो

काही दिवसांपूर्वी हार्दिक पांड्याने नताशा स्टेनकोविकसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. यामध्ये नताशाने पोल्का डॉट्स ड्रेस परिधान केल्याचे दिसत आहे. हे दोघंही एका कारमध्ये असल्याचे या फोटोमध्ये दिसत आहे. दोघांच्या चेहऱ्यांवर सुंदर हास्य आणि आनंद दिसत होता. काळ्या रंगाच्या पोल्का शीयर ड्रेसमध्ये नताशा सुंदर दिसत होती. नॅचरल ब्युटी असलेल्या नताशाने यावेळेस जास्त मेकअप देखील केला नसल्याचे दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावर नॅचरल ग्लो दिसत होता.

(शिल्पा शेट्टीनं आपल्या ६ महिन्यांच्या लेकीसाठी तयार करून घेतला स्पेशल ड्रेस)

​अनुष्का शर्माचा महागडा पोल्का ड्रेस

अनुष्का शर्माने जो ड्रेस परिधान करून आपल्या प्रेग्नेंसीबाबतची माहिती चाहत्यांसोबत शेअर केली, त्या ड्रेसची संपूर्ण माहिती लोकांनी शोधून काढली. अनुष्काचा या क्युट शीयर ड्रेसमध्ये रफल्ड आणि प्लीट्स पॅटर्न होतं, ज्यामुळे ड्रेस अतिशय स्टायलिश दिसत होता. हा शॉर्ट ड्रेस LA बेस्ड डिझाइनर लेबल Nicholas यांच्या कलेक्शनमधून घेण्यास आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अनुष्काच्या या ड्रेसची किंमत जवळपास ४५ हजार रुपये एवढी आहे.

(अनुष्का शर्मा आणि कियाराचे एकसारखेच जम्पसूट, कोणी कोणाला केलंय कॉपी?)

​प्रियंका चोप्राचा ड्रेस

काळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या पोल्का डॉट्स प्रिंट ड्रेसमध्ये प्रियंका चोप्राचे कित्येक फोटो आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळाले आहेत. दरम्यान, लोक तिच्या ज्या फोटोंचे अनुष्का शर्मांसह कनेक्शन जोडत आहेत, त्या फोटोतील ड्रेस सब्यसाची आणि Philosophy di Lorenzo Serafini यांनी डिझाइन केलेला आहे.

(विद्या बालनला प्रसिद्ध डिझाइनर सब्यसाची मुखर्जीचा चेहरा सुद्धा पाहण्याची इच्छा का नाही?)

​चर्चा प्रियंकाच्या आउटफिटची

सब्यसाची यांनी डिझाइन केलेल्या ड्रेसला पोल्का डॉट्स म्हणणं योग्य ठरणार नाही, कारण हे आउटफिट शीयर मटेरियलमध्ये आहे. या ड्रेसवर पांढरे डॉट्स नाही तर बांधनी प्रिंट होतं. तर दुसरा ड्रेस पूर्णतः सी-थ्रू मटेरियलपासून डिझाइन करण्यात आला होता, ज्यावर पोल्का डॉट्स प्रिंट दिसत आहेत.

(मलायका अरोरा ते करीना कपूर, प्रेग्नेंट असताना या अभिनेत्रींनी केलं शानदार रॅम्प वॉक)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *