तास-न्-तास एकाच जागी बसून काम करताय का, हृदयाची काळजी कशी घ्यावी?

Spread the love

​तरुणांमध्ये वाढतोय हृदयविकारांचा धोका

पूर्वीच्या काळात वयाच्या ५५ व्या वर्षी होणारे हृदय आणि रक्तवाहिन्याशी संबंधित आजार हल्ली २५ वर्षांच्या तरुणमंडळीमध्येही अधिक प्रमाणात दिसू लागले आहेत. ही बाब अतिशय गंभीर आहे. इतकेच नव्हे तर आपल्या देशात ५० वर्षे वयोगटाखालील लोकांचे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक आहे. यामध्ये ४० वर्षे वयोगटातील लोकांची संख्या २५ टक्के एवढी आहे. या आकडेवारीवरून हृदयविकाराचे प्रमाण किती वेगाने वाढते आहे, याचा अंदाज आपण लावू शकतो.

(Health Care Tips इवल्याशा पारिजात फुलाचे मोठे फायदे माहिती आहेत का?)

​बैठ्या स्वरुपातील जॉब करणाऱ्यांनी कशी घ्यावी काळजी?

एकाच ठिकाणी कित्येक तास बसून काम करणाऱ्या लोकांनी आपल्या दैनंदिन जीवनातील काही गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे. जेणेकरून हृदयाचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळेल. वर्ल्ड हार्ट फेडरेशनच्या #UseHeart या मोहिमेशी जोडल्या गेलेल्या अधिकारी अंजली मल्होत्रा या आपल्याला कार्डिओव्हॅस्क्युलर आजारांवर मात कशी करावी, याबाबत काही खास पद्धती सांगत आहेत. ज्या आपल्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून महत्त्वाच्या आहेत.

(Yoga Benefits कमरेच्या स्नायूंसाठी करा हे आसन, जाणून घ्या योग्य पद्धत)

​सोपे व्यायाम करा

बैठ्या स्वरुपातील जॉब आणि लॉकडाउनमुळे दैनंदिन जीवनात व्यायाम करणं अनेकांना शक्य होत नाहीय. अशा परिस्थितीत शरीर सक्रिय ठेवण्यासाठी सोप्या व्यायामांबाबतची माहिती जाणून घ्या. कामातून दोन ते तीन मिनिटांचा वेळ काढून सोपे व्यायाम प्रकार करावे. यामुळे आपल्या शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत आणि संतुलित प्रमाणात सुरू राहील. जेणेकरून हृदयाकडून संपूर्ण शरीराला योग्य पद्धतीने रक्त पुरवठा होण्यास देखील मदत मिळेल.

(मधुमेह होण्याची नवी कारणे? जाणून घ्या डॉक्टरांनी सांगितलेली संशोधनातील महत्त्वाची माहिती)

​आहारामधील आवश्यक बदल

एकाच ठिकाणी भरपूर वेळ बसून काम करणाऱ्यांनी आपल्या आहाराकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ मसालेदार पदार्थांचे सेवन करणं टाळावे. म्हणजे तुमचे जेवण जास्त प्रमाणात तिखट नसावे. आहारामध्ये जास्त प्रमाणात तेलकट पदार्थांचाही समावेश नसावा. याऐवजी फळे, कोशिंबीर, सुकामेवा आणि उकडलेल्या भाज्या खाव्यात. डबाबंद खाद्यपदार्थ शक्यतो स्वतःपासून दूर ठेवावे. कारण यामध्ये चरबीयुक्त पदार्थ अधिक प्रमाणात असतात.

(Health Care Tips दर आठवड्याला किती वेळ सायकलिंग करावे?)

​पुरेशी झोप घ्या

डोळ्यांव्यतिरिक्त मेंदू, हृदय तसंच आपलं संपूर्ण शरीर निरोगी राहण्यासाठी योग्य प्रमाणात झोप घेणे अतिशय आवश्यक आहे. कारण झोपेत असताना आपले शरीर नुकसान झालेल्या पेशी दुरुस्त करण्याचे कार्य करत असते. यासाठी नियमित सात ते आठ तासांची झोप घेणे गरजेचं आहे. अन्यथा अपुऱ्या झोपेमुळे शरीर कमकुवत होते आणि आजारांची लागण होण्याचीही शक्यता असते.

(Amla Health Benefits आरोग्यासाठी कसे आणि का करावे आवळ्याचे सेवन?)

​आनंदी राहणं आवश्यक

आनंदी राहण्यासाठी तुम्ही तणावमुक्त असणं आवश्यक आहे. हृदय आणि मेंदूशी संबंधित कित्येक आजारांमागील मुख्य कारण म्हणजे ताणतणाव. शांती आणि आनंद हे जीवन जगण्याची गुरुकिल्ली आहे. आपण सर्वांनी आनंदी आणि निरोगी आयुष्य जगणे आवश्यक आहे. कारण ताण-तणावाचे आयुष्य जगणं जडच ठरते आणि यामुळे कोणत्याही प्रकारे आनंद मिळत नाही, हे लक्षात घ्यावे.

(Herbal Tea चहाप्रेमींनो तुम्हाला या पाच हर्बल टी माहीत आहेत का?)

NOTE आरोग्याशी संबंधित कोणत्याही समस्या उद्भवल्यास किंवा आहारामध्ये बदल करावयाचे असल्यास आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *